वारंवार मूत्रविसर्जन - Frequent Urination in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

November 30, 2018

March 06, 2020

वारंवार मूत्रविसर्जन
वारंवार मूत्रविसर्जन

वारंवार मूत्रविसर्जन म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही सामान्य प्रमाणापेक्षा जास्त वेळा तुम्हाला मूत्रविसर्जन करण्याची गरज भासते तेव्हा ते संसर्ग किंवा मूतखडा यांसारख्या रोगांमुळे असू शकते.

वारंवार मूत्रविसर्जनामुळे अनेक संबंधित समस्या होऊ शकतात आणि एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होऊ शकतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

 • सरासरी, बहुतेक लोक 24 तासांत 7 ते 8 वेळा लघवी करतात. ते सामान्य नसू शकते तरी यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ही समस्या असू शकते.
 • फ्रिक्वेन्सी विशेषतः रात्री जास्त असू शकते ज्यामुळे तुमच्या झोपेत अडथळा येतो आणि यामुळे दिवसा सुस्ती आणि झोपेची गुंगी राहते.
 • वारंवार मूत्रविसर्जनामुळे, साधारणपणे तहान वाढते.
 • काही असामान्य लक्षणे खालीलप्रमाणे:

याची मुख्य कारणं काय आहेत?

 • खूप द्रवपदार्थ पिणे किंवा अत्यंत थंड परिस्थिती यासारखे शारीरिक बदल यामुळे वारंवार मूत्रविसर्जन होऊ शकते.
 • डायबेटीस मेलिटस किंवा डायबेटिस इन्सिपिडस असलेले रुग्ण सुद्धा वारंवार लघवी करतात.
 • वारंवार मूत्रविसर्जन हे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि ओव्हरॅक्टीव ब्लॅडर याचे एक लक्षण आहे.
 • स्त्रियांमध्ये, असंतुलित मेनोपॉज किंवा ॲस्ट्रोजन यामुळे वारंवार मूत्रविसर्जन करण्याची इच्छा होऊ शकते.
 • युरिनरी ब्लॅडर स्टोन्स हे वारंवार मूत्रविसर्जनाचे दुसरे कारण आहे.
 • कधीकधी, ॲन्टी-एपिलेप्टीक्स सारखी औषधे अशी लक्षणे दिसून येतात.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

जेव्हा तुम्ही वारंवार लघवीची तक्रार करता तेव्हा तुमचे डाॅक्टर लक्षणांची सुरुवात आणि कालावधी यांचा इतिहास घेतात. जर तुम्हाला वारंवार मूत्रविसर्जनाशिवाय इतर काही समस्या असतील तर ते सुद्धा तुमच्या डाॅक्टरांना समजणे आवश्यक आहे.

 • लघवीतील रक्त, ग्लुकोज, प्रोटिन्स किंवा इतर विकृती यासाठी सामान्यतः सकाळच्या लघवीचा नमुना प्रयोगशाळेत तपासला जातो.
 • मूत्रविसर्जनानंतर मूत्राशय पूर्णपणे मोकळा होत असल्याचे पाहण्यासाठी मूत्राशयाचे अल्ट्रासाऊंड केले जाते. ओटीपोटीचा सीटी स्कॅन किंवा एक्स-रे सुद्धा घेतला जातो.
 • जर डाॅक्टरांना डायबेटिस सारख्या इतर कोणत्याही परिस्थितीवर संशय असेल तर संबंधित चाचण्या आणि रक्त तपासणीचा सल्ला दिला जातो.

वारंवार मूत्रविसर्जनाची उपचार पद्धत लक्षणाच्या कारणांवर अवलंबून असते.

 • जर वारंवार मूत्रविसर्जन संसर्गामुळे असेल तर ॲन्टीबायोटीक्स उपयुक्त ठरतात.
 • डायबेटिस मेलिटस इन्सुलिन थेरपी किंवा औषधं, काही जीवनशैलीमधील बदलांसह नियंत्रणाखाली आणले जाते.
 • जर कारण अति सक्रीय मूत्राशय असेल तर मूत्राशय स्नायूंना आराम देणारी औषधे दिली जातात. मूत्राशय प्रशिक्षण व्यायाम सुद्धा उपयुक्त असतात.संदर्भ

 1. Ju J et al. Levetiracetam: Probably Associated Diurnal Frequent Urination.. Am J Ther. 2016 Mar-Apr;23(2):e624-7. PMID: 26938751
 2. Yeong-Woei Chiew et al. The Case ∣ Disabling frequent urination in a young adult. July 1, 2009 Volume 76, Issue 1, Pages 123–124
 3. Dwyer, Peter L et al. Recurrent urinary tract infection in the female. Wolters Kluwer Health; October 2002 - Volume 14 - Issue 5 - p 537-543
 4. Wrenn K. Dysuria, Frequency. Dysuria, Frequency, and Urgency. Clinical Methods: The History, Physical, and Laboratory Examinations. 3rd edition. Boston: Butterworths; 1990. Chapter 181.
 5. Stormorken H, Brosstad F. [Frequent urination--an important diagnostic marker in fibromyalgia].. Tidsskr Nor Laegeforen. 2005 Jan 6;125(1):17-9. PMID: 15643456

वारंवार मूत्रविसर्जन चे डॉक्टर

Dr. Virender Kaur Sekhon Dr. Virender Kaur Sekhon Urology
14 वर्षों का अनुभव
Dr. Rajesh Ahlawat Dr. Rajesh Ahlawat Urology
44 वर्षों का अनुभव
Dr. Prasun Ghosh Dr. Prasun Ghosh Urology
26 वर्षों का अनुभव
Dr. Pankaj Wadhwa Dr. Pankaj Wadhwa Urology
26 वर्षों का अनुभव
डॉक्टरांचा सल्ला घ्या

वारंवार मूत्रविसर्जन साठी औषधे

वारंवार मूत्रविसर्जन के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

वारंवार मूत्रविसर्जन की जांच का लैब टेस्ट करवाएं

वारंवार मूत्रविसर्जन के लिए बहुत लैब टेस्ट उपलब्ध हैं। नीचे यहाँ सारे लैब टेस्ट दिए गए हैं: