हर्निया - Hernia in Marathi

हर्निया
हर्निया

सारांश

हर्निआ शरीराची अशी  अवस्था आहे ज्यात शरीराचा एक  अवयव किंवा भाग दुसऱ्या एखाद्या नाजूक अवयवातून किंवा असामान्य उघड्या जागेतून त्याच्या भोवतीच्या स्नायूमध्ये किंवा मऊ तंतूमध्ये ढकलला जातो. सर्वसाधारणपणे हर्निआचे मुख्य प्रकार इंग्वीनल हर्निआ व त्याचे उप प्रकार आढळतात, जसे आतील मांडीच्या सांध्याचा (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ही), चिरामुळे असलेले किंवा उदरस्थ (शस्त्रक्रियेनंतर पोटाच्या चिरामुळे किंवा व्रणामुळे), मांडीच्या हाडाचा / फेमोरल (मांडीचा वरचा भाग/मांडीच्या सांध्याच्या बाहेरील भाग), नाभिसंबंधीचा (बेंबी), आणि हॅटल (पोटाचा वरचा भाग/ पातळ पडदा) अशा अवयवांचा हर्निआ यांचा समावेश आहे. लक्षणांमधे हर्निआ झालेल्या ठिकाणी टेंगुळ येणे, सुजणे, किंवा, वेदना होणे अशी लक्षणेदिसतात. काही लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. हर्निआच्या उपचारांमधे शस्त्रक्रिया करणे आहे, ज्यामुळे प्रभावित तंतू सुस्थितीत आणतात आणि उघडा पडलेला भाग बंद करतात. शस्त्रक्रियेच्या ठिकाणातून स्त्राव होणे, सूज येणे, किंवा वेदना होणे या सारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. हर्निआमध्ये शस्त्रक्रिया यानंतरचे परिणाम खात्रीशीरपणें खूप उत्तम आहेत, बहुतेक बाबतीत आजार परतून येत नाही. प्राथमिक अवस्थेत उपचार न केल्यास क्वचित् रुग्णाचा मृत्यू ही संभवू शकतो.

What is a Hernia

हर्निआ म्हणजे सभोवतालच्या तंतू किंवा स्नायूच्या दुर्बळ ठिकाणातून, अवयवाचे किंवा चरबी युक्त तंतूचे पसार होय. हर्निआ पुरुष, स्त्रिया, तसेच लहान मुलांनासुद्धा होऊ शकतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये हा आजार सामान्यतः आढळतो. हर्निआ तेव्हा होतो जेव्हा पोटातील संचित/साठलेल्या (पेरीटोनिअम) जागेभोवतीचे आतडे किंवा पिशवीचा भाग उदराच्या भिंतींमधे शिरून त्या भागाला पीळ बसतो. पसरलेल्या भागाला हर्निआ सॅक म्हणतात आणि त्यात आतडे, पेरीटोनीयम, किंवा पोटाच्या, उदराच्या, किंवा/आणि बेंबीच्या चरबीच्या बाहेरील कडा समविष्ट असू शकतात.

Hernia symptoms

हर्निआची चिन्हे व लक्षणे विस्तृत पणे भिन्न असतात, जसे:

 • वेदनारहित मास ते शारीरिक अवयव जसे की, पोटाच्या किंवा ओटीपोट क्षेत्राच्या तीव्र वेदना, सूज, हलक्या फुगवट्याच्या रुपात तो भाग दिसतो जो पोटात ढकलता येतो किंवा ढकलता येत नाही. पोटाच्या किंवा ओटीपोटाच्या भागात तीव्र वेदना ही हर्निआ आजाराची नेहमीची लक्षणे आहेत.
 • सर्वच प्रकारचे हर्निआ त्रासदायक नसतात. कधी कधी वेदना, जळजळीची जाणीव, दाब,  विशेष करून तीव्र शारीरिक हालचाल करते वेळी ताणल्याच्या संवेदनांचा अनुभव होतो. पोटाच्या ताणलेल्या स्नायूच्या वेदनांना हर्निआ रोग कारणीभूत असतो.
 • हॅटल प्रकारच्या हर्निआमधे, पोट रिकामे असल्यास रुग्णाच्या पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवतात. हर्निआ वाढत असल्यास आणि वेळीच उपचार न केल्यास उलट्यादेखील होतात. (अधिक माहितीसाठी वाचा – पोटदुखी - कारणे व उपचार)
 • इंग्वीनल हर्निआमध्ये मांडीच्या सांध्यांमधे फुगवटा तयार होतो. इंग्वीनल नलिकेतील दाहकतेमुळे तीव्र वेदना, जळजळ, किंवा दोन्ही जाणवतात. हर्निआ वाढल्याने मृतावस्थेतील आतड्यांना फास बसतो , ज्यामुळे मळमळ वाटते, उलट्या होतात आणि ताप येतो.
 • लहान मुलांना होणाऱ्या बेंबीच्या हर्निआमधे नाभीच्या ठिकाणी रडण्यामुळे सूज येते. प्रौढांमध्ये, त्यांच्या नाभीच्या ठिकाणी सूज दिसते. ही सूज खोकताना किंवा पोट ताणल्या गेल्याने वाढते. कधी कधी दाबून ओढल्यामुळे होतात तशा वेदना सुद्धा असतात.
 • शस्त्रक्रियेच्या चौथ्या दिवशी शिवण असलेल्या ठिकाणी स्त्राव होत असल्यास तो इंसीशनल हर्निआ आहे असे समजावे. शस्त्रक्रियेच्या वेळी संसर्गाचा पूर्व इतिहास आजाराचे चिन्ह म्हणून ओळखता येईल. व्रणाच्या जागेवर सूज किंवा टेंगुळ देखील दिसते.

Hernia treatment

शस्त्रक्रिया

हर्निआच्या उपचारांवर शस्त्रक्रिया हा एक मुख्य उपचार आहे. यात हर्निआतील संचित पोटात ढकलतात किंवा पूर्ण पणे काढतात आणि फट शिवतात. एक जाळी (कृत्रिम किंवा प्राणिजन्य) वापरून, संचित किंवा साठवण पसरून  गेलेल्या, कमजोर तंतूंना किंवा स्नायुंना आधार देतात.

शस्त्रक्रिया दोन प्रकारे करता येते: खुल्या किंवा पारंपारिक पद्धतीने आणि कमीत कमी चीर देऊन किंवा लेपरोस्कोपिक पद्धतीने. खुल्या शस्त्रक्रियेच्या प्रकारात, हर्निआ असले त्या ठिकाणी मोठा आणि लांब चीर देतात आणि क्षीण झालेल्या स्नायूंची दुरुस्ती करतात. लेपरोस्कोपिक किंवा कि-होल शस्त्रक्रियेत, पोटात अनेक छोटे छिद्र किंवा चीर करतात, आणि शल्यक्रिया छोट्या नळी सदृश उपकरणांच्या मदतीने पूर्ण करतात. सर्जनला मॉनीटरवर तपशील दिसावे व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी कॅमेरा लावलेला असतो.

इंग्वीनल हर्निआ या प्रकारामध्ये हर्नियोटोमी, हर्नियरहेफी किंवा हर्निओप्लास्टी या मुख्य प्रक्रिया करतात. कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीवरून आणि सर्जनच्या सल्ल्यानुसार इतर शस्त्रक्रिया जसे कुंट्झकुन्त्झ शल्यक्रिया, अँड्रेव इम्ब्रीकेशन, किंवा मॅकव्हे किंवा नायहस रिपेअर, करून घेतात. भिन्न प्रकारचे हर्निआ हाताळता यावेत या करिता अनेक पद्धतीच्या शस्त्रक्रिया करतात.

हर्निआच्या उपचारांसाठी शस्त्रक्रिया ही एकच उपचारपद्धत आहे, असे काही नाही. आणि व्यक्तीच्या प्रकृतीच्या अडचणी नसल्यास, प्रकार कुठलाही असो, शस्त्रक्रिया करावीच लागते असेही नाही. वृद्ध आणि गंभीर आजार असणाऱ्यांमधे शस्त्रक्रिया टाळतात.

औषधोपचार

कधीकधी, तुमचे डॉक्टर हॅटल प्रकारच्या हर्निआमधे, पोटातील आम्ल कमी करण्यासाठी दुकानात न मिळणारी व इतर औषधे निर्धारित करतात. या औषधांनी तुम्ही इतर लक्षणे आणि अस्वस्थता कमी झाल्याचे अनुभवाल. यात काही वेदनाशामक औषधी, एच-२ रिसेप्टर ब्लॉकर जी हेस्टामैन विरोधात काम करतात, एंटासिड, आणि प्रोटोन पंप इनहीबीटर (औषधे जी पोटातील आम्ल कमी करतात).

जीवनशैली व्यवस्थापन

आहारातील बदलांनी हॅटल हर्निआ रोगातील बरीच शी लक्षणे कमी होतात परंतु हर्निआ आजार समूळ बरा होत नाही. गुणवत्तेत आणि मापात अधिक असलेले अन्न टाळा. व्यक्तीने जेवण होताच आडवे होणे आणि भारी शारीरिक क्रिया टाळाव्यात. हॅटल प्रकारच्या हर्निआच्या रुग्णांनी आम्लाच्या ओहोटीची समस्या टाळण्यासाठी तिखट आणि आंबट असलेले पदार्थ, जे अम्लांची ओहोटी सुरु करतात, टाळावे. लक्षणे असे पर्यंत धूम्रपान टाळावे. शरीराचे वजन कमी ठेवावे आणि उंचीनुसार साधारण श्रेणीचे ठेवावे.

हर्निआ झालेल्या भागातील स्नायूंना बळकटी येण्यासाठी व्यायाम करावा ज्याने लक्षणे कमी होण्यास मदत होते. तरीही, अधिक व्यायाम केल्याने व तज्ञांच्या मार्गदर्शनात व्यायाम न केल्याने लक्षणे वाढीस लागून परिस्थिती चिघळू शकते. त्यामुळे फिजिओथेरपिस्ट याला भेटा आणि त्यांच्या देखरेखीखाली पुढे व्यायाम करा.

सगळ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीनेही लक्षणे जात नसल्यास, हर्निआ बरा करण्यास शस्त्रक्रिया करवून घ्यावी. संदर्भ

 1. InformedHealth.org. Hernias: Overview. Cologne, Germany: Institute for Quality and Efficiency in Health Care (IQWiG); 2006-. Hernias: Overview. 2016 Oct 6.
 2. United Consumer Financial Services.[internet]. University of California San Francisco, UCSF Medical Center, UCSF Department of Surgery, UCSF School of Medicine. Overview of Hernias.
 3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Hernia
 4. US Food and Drug Administration (FDA) [internet]; Hernia Surgical Mesh Implants: Information for Patients
 5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Hernias