myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

हायपरपॅराथायरॉइडिझम म्हणजे काय?

पॅराथायरॉइड ग्रंथी ही थायरॉईड ग्रंथीच्या जवळ स्थित असलेली लहान ग्रंथी आहे. चार पॅराथायरायड ग्रंथी आहेत, जे प्रामुख्याने रक्तातील कॅल्शियम केंद्रीकरण नियमन करण्यासाठी कार्य करतात. हायपरपॅराथायरॉइडिझम म्हणजे शरीरात एक किंवा एकापेक्षा जास्त पॅराथायराइड ग्रंथीचा अतिक्रियाशील झाल्यामुळे पॅराथायरॉइड हार्मोनचा जास्त प्रमाणात स्राव होतो. 50 आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांमध्ये ही स्थिती अधिक सामान्य आहे. पॅराथायरॉइड हार्मोनची तयार करण्याची क्षमता वाढल्याने रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढते ज्यामुळे हाडांमध्ये कॅल्शियम केंद्रीकरण कमी होते.

त्याचे मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

 • सौम्य हायपरपॅराथायरॉइडिझम शी खालील लक्षणं संबंधित असू शकतात:

 1. वेदनादायक जॉईंट आणि हाडे.
 2. कमकुवत स्नायू.
 3. थकवा.
 4. नैराश्य.
 5. भूक न लागणे.
 6. एकाग्रता मध्ये अडचण.
 • गंभीर हायपरपॅराथायरॉइडिझमच्या खालील लक्षणं संबंधित असू शकतात:
 1. मळमळ आणि उलटी.
 2. गोंधळ.
 3. जास्त तहान आणि वारंवार लघवी.
 • खालील इतर लक्षणं असू शकतात:
 1. पातळ /बारीक हाडे (ऑस्टियोपोरोसिस).
 2. मूत्रपिंड कार्य क्षमता कमी होणे.
 3. मूतखडे.
 4. उच्च रक्तदाब.

त्याचे मुख्य कारण काय आहेत?

दोन प्रकारचे हायपरपॅराथायरॉइडिझम, जसे कि :

 • प्राथमिक हायपरपॅराथायरॉइडिझम: या अवस्थेत, एक किंवा एकापेक्षा जास्त पॅराथायरॉइड ग्रंथी अतिक्रियाशील झाल्यामुळे पॅराथायरॉइड हार्मोनचा जास्त प्रमाणात स्राव होणे. हा रोग प्रामुख्याने 'प्राथमिक' म्हणून ओळखला जातो कारण या  विकाराचा आरंभ पॅराथायरॉइड ग्रंथीमध्ये होतो. पॅराथायरॉइड ग्रंथीवरील ट्यूमर किंवा सौम्य वाढ हा संप्रेरक अधिक प्रमाणात स्रावित करण्यासाठी योगदान देऊ शकतो (अँडोनेमा हा जवळजवळ 80% रुग्णांमध्ये प्राथमिक हायपरपॅराथायरॉइडिझमचे मुख्य कारण असते). वाढलेले किंवा हायपरप्लास्टिक पॅराथायरॉइड ग्रंथीमुळे पॅराथॉर्मोनचे जास्त प्रमाणात उत्पादन होऊ शकते.
 • दुय्यम हायपरपॅराथायरॉइडिझम: हे एखाद्या अंतर्गत वैद्यकीय स्थितीमुळे होते ज्यामुळे पॅराथायरॉइड ग्रंथीं हे अतिक्रियाशील होते आणि पॅराथायरॉइड हार्मोनचा जास्त प्रमाणात स्राव होऊ शकतो.
 1. मूत्रपिंड अपयश, जेथे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी असते.
 2. वंशानुगत किंवा अनुवांशिक घटक.
 3. व्हिटॅमिन डी चा विकार.
 4. अन्न शोषण करण्यात अपयशी.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

रुग्णांचा वैद्यकीय इतिहास आणि संबंधित लक्षणांचे मूल्यांकन हायपरपॅराथायरॉइडिझमचे निदान करण्यासाठी आवश्यक चाचण्यांबद्दलचा सल्ला देण्यासाठी डॉक्टरांना मार्गदर्शन करते.

 • तपासणीमध्ये हे समाविष्ट आहे:
 1. रक्तातील कॅल्शियम आणि पॅराथायरॉइड हार्मोन पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी रक्त तपासणी.
 2. डिईक्सए स्कॅन नावचे बोन डेन्सीटी(घनता) स्कॅन.
 3. अंतर्गत किडनी रोग ओळखण्यासाठी सीटी स्कॅन आणि अल्ट्रासोनोग्राफी.
 4. व्हिटॅमिन डी पातळी.

प्राथमिक हायपरपॅराथायरॉइडिझमला शस्त्रक्रिया आवश्यक असते. अतिक्रियाशील  पॅराथायरॉइड ग्रंथी किंवा ट्यूमर काढून टाकणे प्राथमिक हायपरपॅराथायरॉइडिझमच्या प्रकरणांमध्ये चांगले परिणाम दर्शवते.

 • सर्जिकल पर्यायांमध्ये समाविष्ट आहे:
 1. मिनिमीली इनवेसिव्ह पॅराथायराइडडेक्टॉमी: केवळ ग्रंथी जी  अति-सक्रिय होण्याची शक्यता असते तिला काढून टाकण्यात येते.  
 2. नेक एक्सप्लोरेशन: सर्व चार पॅराथायरॉइड ग्रंथी शस्त्रक्रिया करून शोधल्या जातात आणि अतिक्रियाशील ग्रंथी  काढून टाकण्यात येते.
 • सौम्य हायपरपॅराथायरॉइडिझम रक्त तपासणीसह परीक्षण केले जाते आणि औषधोपचार व व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम पूरकांसोबत उपचार केले जाते. आहार, पोषण आणि शारीरिक उपचार देखील हायपरपॅराथायरॉइडिझम नियंत्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
 • माध्यमिक हायपरपॅराथायरॉइडिझमला अंतर्भूत स्थितीचे उपचार आवश्यक आहे. कॅल्सीमेटीटिक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधेंचा समूह ॲडजेक्टिव्ह थेरपी म्हणून सुचवली जाऊ शकतो.

 

 1. हायपरथायरॉडिझम साठी औषधे

हायपरथायरॉडिझम साठी औषधे

हायपरथायरॉडिझम के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
GemcalGEMCAL 120ML LIQUID158.0
CalcirolCalcirol 600000 IU Capsule165.0
Calcium + Calcitriol TabletCalcium 500 Mg + Calcitriol 0.25 Mg Tablet5.0
Calcitriol + Calcium Carbonate + ZincCalcium Carbonate 500 Mg + Calcitriol 0.25 Mcg + Zinc 7.5 Mg Tablet6.0
AuxitrolAuxitrol Capsule112.0
DevitaDevita 6 Lac Injection0.0
LaretolLaretol 1 Mcg Injection92.0
OstriolOstriol Capsule40.0
PsorafusePsorafuse 3 Mcg Cream289.0
Sorvate CSORVATE C OINTMENT 10GM347.0
CalintaCalinta Kit359.0
CeracalCeracal 30 Mg Tablet0.0
MimciparMimcipar 30 Mg Tablet563.0
SenaceptSenacept 60 Mg Tablet0.0
SetzSetz 30 Mg Tablet479.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Cleveland Clinic. [Internet]. Euclid Avenue, Cleveland, Ohio, United States; Hyperparathyroidism: Management and Treatment.
 2. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Primary Hyperparathyroidism.
 3. State of Victoria. [Internet]. Department of Health & Human Services. Parathyroid glands.
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Hyperparathyroidism.
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Parathyroid Disorders.
और पढ़ें ...