Irritable Bowel Syndrome (IBS) - Irritable Bowel Syndrome (IBS) in Marathi

Irritable Bowel Syndrome
Irritable Bowel Syndrome

सारांश

हा विकार वैद्यकीय चिन्हांचा आणि लक्षणांचाअसा एक समूह आहे जी एकमेकांशी संबंधित असतात आणि बऱ्याचदा एका विशिष्ट आजारासोबत किंवा विकारासोबत जोडलेली असतात.त्रासिक आतड्यांचे विकार (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) हा मोठ्या आतड्याचा विकार आहे ज्यामुळे आतड्यांच्या सामान्य कार्यशैलीत बदल होतो.याचे अचूक कारण अज्ञात आहे, परंतु काही तज्ञ मानतात की ते शारीरिक ऐवजी मनोवैज्ञानिक अधिक आहे. पोटातील वेदनांसोबत होणाऱ्या बद्धकोष्ठतेपासून ते जुलाबापर्यंत भिन्न करणं यामागे असतात आणि रक्त तपासणी किंवा इमेजिंग चाचण्यांद्वारे कोणतेही निदान नाही. उपचारांचे पर्याय, लक्षणांनुसार बदलू शकतात आणि प्रत्येक रुग्णाच्या प्रतिसादाचे परिणाम भिन्न असतात कारण ते लक्षणांवर आणि त्याच्या प्रतिसाद क्षमतेवर अवलंबून असतात.

Irritable Bowel Syndrome (IBS) symptoms

आयबीएसचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे पोटातील वेदना हे होय. पोटाच्या खालच्या भागातील पोटातील मुरडीच्या रुपात या वेदना होतात.हा त्रास सामान्यत: मल विसर्जनानेजातो.पोट फुगते (अति प्रमाणात वायूमुळे पोट पूर्ण भरलेले असल्याचा भास होणे), अस्पष्ट कारणाने दिवसभर हा बिघाडवाढत राहतो.(अधिक वाचा - पोटफुगीची कारणे आणि घरगुती उपचार).

आयबीएस-सी असलेल्या लोकांना कठोर गोट्यांच्या आकाराचे शौच होते,जे बहुतेक वेळा कठोर असते व सोबतच पोटात वेदना होतात.शौचाच्या वेळी भरपूर ताण येतो. आयबीएस-डीग्रस्त लोकांमध्ये जलयुक्त व कमी शौच येते.पोट साफ न झाल्याची भावना सतत असते.श्लेष्माचे पाझरणे देखील सामान्य आहे परंतु रक्तस्त्राव नसतो. वजन कमी झाल्याचे कुठेही नोंदवले गेले नाही.पोस्ट-डायव्हर्टिक्युलिटिस आयबीएसमुळे मुख्यतः डाव्या बाजूला वेदना होतात वताप येतो.आयबीएस-एम असलेल्या रुग्णांनी आयबीएस-एम आणि आयबीएस-डी दोन्हीची पर्यायी लक्षणे दर्शविली आहेत. (अधिक वाचा - पोटदुखीचे कारण आणि उपचार)

Irritable Bowel Syndrome (IBS) treatment

रुग्णाला आश्वस्त करावे आणि लक्षणांबद्दल स्पष्टीकरण द्यावे.आयबीएसचा उपचार व्यक्तीच्या आयबीएसच्या प्रकारावर अवलंबून असतो.

 • वेदना
  जरवेदनास्वतःहून कमी होत नसतील तर कॉलिनर्जिकरोधक घटक (डाईसायक्लोमाइन 10 mg) किंवा स्पास्मोडिकरोधक (मेबिव्हेरीन 135 mg) दिवसातून तीनदा दिले जाऊ शकते.
 • आयबीएस-डी
  आहारातील तंतूमय पदार्थ वाढविली जतात आणि आवरणासोबतची फळे, भाज्या, मेथिल सेलुलोज किंवा इसबगोल/ ह्यासारखे पाचक पदार्थ मोठ्या प्रमाणात घेतली जातात. लक्षणे कायम राहिल्यास लोपरामाइड (2-4 mg दिवसात 4 वेळा) किंवा कोलेस्टेरॅमिन (दररोज 1 पिशवी) किंवा कोडेन फॉस्फेट (30- 90 mg दररोज) औषधं निर्धारित केली जाऊ शकतात. गंभीर घटनांमधे रात्रीच्या वेळी अॅमीट्रीप्टायलीन (10-25 mg) सारख्या मानसिक आजारांना संबंद्ध औषधं देखील दिली जाऊ शकतात.
 • आयबीएस-सी
  सौम्य शौच तयार होण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि आहारात ओट्स, डाळी, गाजर, सोललेले बटाटे यांसारखे विरघळणारे तंतूमय पदार्थ वाढवा. तंतूमय पदार्थ लक्षणे दूर करण्यात अयशस्वी झाल्यास उपचार योजनांमध्ये दुधातील मॅग्नेशिआ जोडले जाऊ शकते.
 • संक्रमणानंतरचे आयबीएस
  संसर्गग्रस्त आयबीएसनंतर संक्रमणास प्रतिबंध करण्यासाठी अचूक प्रतिजैविके नियमीत घ्या आणि त्या लक्षणांचे निर्मूलन करा. 
 • आयबीएस मध्ये नैराश्यरोधक
  ट्रायसीक्लिक नैराश्यरोधक उपचार त्रस्त आतड्याच्या रुग्णाची स्थिती सुधारते. ज्या रुग्णांना मुख्य लक्षण म्हणून वेदना, अतिसार आणि बद्धकोष्ठता आहे त्यांना सर्वात जास्त फायदे होतात.

जीवनशैली व्यवस्थापन

आयबीएस पूर्णपणे बरे करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल किंवा औषधे नाहीत. तथापि, रोजच्या आहारात आणि जीवनशैलीत योग्य बदल करून लक्षणे टाळता येऊ शकतात.घरगुती शिजवलेले पदार्थ व सर्वोत्तम दर्जाचे साहित्य वापरून केलेला आहार निवडा आणि डायरी तयार करून आहाराच्या प्रकारामुळे झालेल्या लक्षणातील बदलाच्या नोंदी घ्य,ज्याने लक्षण कमी करण्यात मदत होते.

 • नियमीत व्यायाम करण्याचे नियोजन देखील संपूर्ण लक्षणे सुधारण्यात मदत करते. बद्धकोष्ठता असल्यास पुरेसे पाणी पिणे, अतिसारात आहारामध्ये तंतूमय पदार्थ घेणे, आणि काही निरोगी प्रोबिओटिक पेय वापरून आतड्यांमधे उपयोगी जिवाणू वाढल्याने चांगले पचन होण्यास मदत होते.
 • आयबीएस असलेल्या लोकांना सल्ला दिला जातो की,त्यांनी उपाशी राहणे टाळावे, कमी जेवण घ्यावे, चरबीयुक्त आणि डबाबंद पदार्थ जसे चिप्स आणि बिस्किटे टाळावेत,धूम्रपान, मद्यपान आणि कॅफीन घेणे(चहा आणि कॉफीमधले) इ. टाळावे.
 • ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी खेळाचे उपक्रम आणि शिथिलीकरणाचे उपक्रम करा, जसे ध्यान करणे आवश्यक आहे जेणेकरून तणावांमूळे लक्षणे वाढू नयेत.

What is Irritable bowel syndrome (IBS)

त्रासदायक आतड्यांचे विकार (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) किंवा आयबीएस, दीर्घकालीन विकार आहे जे पचनतंत्राचे (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मार्ग – जठर व आतडे मार्ग), विशेषकरून मोठ्या आतड्यांचे (स्वल्पविराम-सदृश भाग) कार्य प्रभावित करते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मार्ग ही संज्ञा संपूर्ण मार्गासाठी वापरली जाते ज्याद्वारे अन्नपदार्थ जातात (तोंड, अन्ननलिका, पोट, लहान आतडे आणि मोठे आतडे) आणि संबंधित अवयव जसे यकृत, पित्ताशय आणि स्वादुपिंड जे एंजाइम्स तयार करतात. आयबीएस शौचाच्या  समस्यांशी संबंधित आहे. डायरिया (जुलाब) किंवा बद्धकोष्ठता (शौच येण्यामधील अडचण) किंवा दोन्ही असू शकतात. ते पोट फुगणे (वायूने भरलेले वाटणे) आणि पोटाच्या वेदनांशी संबंधित आहे.संदर्भ

 1. Stuart Ralston Ian Penman Mark Strachan Richard Hobson. Davidson's Principles and Practice of Medicine. 23rd Edition: Elsevier; 23rd April 2018. Page Count: 1440
 2. Am Fam Physician. 2005 Feb 1;71(3):547-548 [Internet] American Academy of Family Physicians; Irritable Bowel Syndrome.
 3. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Eating, Diet, & Nutrition for Irritable Bowel Syndrome.
 4. Aggarwal Praveen, George Mathew Medicine: Prep Manual for Undergraduates. 5th Edition: Elsevier India; 28th September 2015. Pages: 1022.
 5. National Health Service [internet]. UK; iet, lifestyle and medicines - Irritable bowel syndrome (IBS) Contents What is IBS?

Irritable Bowel Syndrome (IBS) चे डॉक्टर

Dr. Abhay Singh Dr. Abhay Singh Gastroenterology
1 Years of Experience
Dr. Suraj Bhagat Dr. Suraj Bhagat Gastroenterology
23 Years of Experience
Dr. Smruti Ranjan Mishra Dr. Smruti Ranjan Mishra Gastroenterology
23 Years of Experience
Dr. Sankar Narayanan Dr. Sankar Narayanan Gastroenterology
10 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

Irritable Bowel Syndrome (IBS) साठी औषधे

Irritable Bowel Syndrome (IBS) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।