ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर - Obsessive Compulsive Disorder in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 26, 2019

March 06, 2020

ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर
ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर

ऑब्सेसिव्ह  कम्पल्सिव्ह डिसऑर्डर काय आहे?

ऑब्सेसिव्ह  कम्पल्सिव्ह डिसऑर्डर(ओसीडी) हा असा विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हा विकार मोठ्या व्यक्ती किंवा लहान मुलांमध्ये होऊ शकते. ह्या विकाराने त्रस्त असलेली व्यक्ती काहीही कारण नसतांना झपाटल्यासारखे आणि बळजबरीने एक सारखी गोष्ट करत असते. त्या व्यक्तीचे चित्र,  इच्छा आणि अंतर्भेदी विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये दुःखाची भावना निर्माण करते.

याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ओसीडी ची मुख्य लक्षणे आणि चिन्हे आहेत:

  • मनातील इच्छा, आणि वारंवार विचार केल्याने चिंता वाढते.
  • धर्म आणि सेक्स बद्दल अतिशयोक्तीचे समाजात निषेध केलेले विचार.
  • गोष्टींकडे वारंवार लक्ष देणे, उदा, गॅस बंद आहे की नाही हे बघणे किंवा दरवाजा लॉक केला की नाही हे दिवसातून शंभरवेळा बघणे.
  • गोष्टी विशिष्ट ऑर्डर मध्ये मांडणे, सारख्या पॅटर्न मध्ये किंवा एका विशिष्ट आणि अचूक पद्धतीने वारंवार मोजणे.
  • टिक विकार: अचानक, वारंवार अवयवांची हालचाल करणे जसे खांदे उडवणे, डोळे मिचकावणे, खांद्याला धक्का मारणे आणि चेहऱ्यावर आठ्या येणे. आवाजाची वारंवारता जसे रेकण्याचा आवाज काढणे, घसा खाकरणे आणि वारंवार शिंकणे.
  • स्वतःसाठी आणि इतरांसाठी हिंसक विचार येणे.
  • किटाणूची लागण किंवा दूषित होण्याच्या भीतीने वारंवार हात धुणे किंवा स्वच्छता करणे.

याचे मुख्य कारणे काय आहेत?

ओसीडी ची मुख्य कारणे खालील प्रमाणे आहे:

  • मेंदूमध्ये विकृती.
  • वातावरण.
  • मेंदूच्या विविध भागात संपर्क नसणे.
  • अनुवांशिक घटक.
  • सेरोटीन ची असामान्य कमी पातळी.

याचे निदान आणि उपचार काय आहेत?

ओसीडी चे निदान मानसिक आणि शारीरिक चाचणी करून होते. रोजच्या जीवनात एकच गोष्ट वारंवार आणि बळजबरीने किती वेळ होते हे विचारतील, दिवसातील कमीत कमी एक तास किंवा जास्त वेळ त्रासदायक होणे.

ओसीडी च्या उपचारासाठी खालील पर्याय वापरले जातात:

  • औषधे : मेंदूतील केमिकल्स चा समतोल साधण्यासाठी  नैराश्य कमी करणारी औषधे लिहून दिली जातात. सिलेक्टिव्ह सेरोटीन रेउपटेक इन्हिबिटर्स (एसएसआरआयस) मेंदूतील सेरोटीन ची पातळी वाढण्यासाठी लिहून दिले जातात त्यामुळे ओसीडी ची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
  • मानसिक उपचार: ही थेरपी अतिशयोक्त विचार आणि भिती कमी करायला मदत करते.
  • डिप ब्रेन स्टिम्युलेशन( डीबीएस): ही उपचारपद्धती अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरतात ज्यांना कमीत कमी पाच वर्षांपासून ओसीडी आहे जिथे मेंदूला इलेकट्रोड वापरून सौम्य विजेचे झटके देऊन उत्तेजित केले जाते.



संदर्भ

  1. University of Rochester Medical Center Rochester, NY. [Internet] Obsessive-Compulsive Disorder (OCD)
  2. National Health Service [Internet]. UK; Obsessive compulsive disorder (OCD).
  3. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; Obsessive-Compulsive Disorder. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
  4. Mental Health. Obsessive-Compulsive Disorder. U.S. Department of Health & Human Services, Washington, D.C. [Internet]
  5. Office on Women's Health [Internet] U.S. Department of Health and Human Services; Obsessive-compulsive disorder.
  6. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Obsessive-compulsive disorder
  7. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Obsessive compulsive disorder

ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर चे डॉक्टर

Dr. Sumit Kumar. Dr. Sumit Kumar. Psychiatry
9 Years of Experience
Dr. Kirti Anurag Dr. Kirti Anurag Psychiatry
8 Years of Experience
Dr. Anubhav Bhushan Dua Dr. Anubhav Bhushan Dua Psychiatry
13 Years of Experience
Dr. Alloukik Agrawal Dr. Alloukik Agrawal Psychiatry
5 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर साठी औषधे

Medicines listed below are available for ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.