जननेंद्रियातील यीस्ट संसर्ग - Penile Yeast Infection in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

May 09, 2019

March 06, 2020

जननेंद्रियातील यीस्ट संसर्ग
जननेंद्रियातील यीस्ट संसर्ग

जननेंद्रियातील यीस्ट संसर्ग काय आहे?

यीस्ट हा फंगसचा एक प्रकार आहे जो शरीराच्या विविध अवयवांमध्ये राहतो जसे पाचन मार्ग, तोंड, त्वचेवर आणि जननेंद्रिय. जननेंद्रियातील यीस्ट संसर्ग तेव्हा होतो जेव्हा लिंगावर साधारण पणे कमेन्सल (शरीराच्या एका भागात किंवा भागावर नित्याप्रमाणे जगणारे परंतु अपायकारक नसणारे जंतू) यीस्टची जास्त प्रमाणात वाढ होते. या संसर्गास 'कॅण्डीडायसिस' असेही म्हणतात, कारण 'कॅण्डीडा ॲल्बिकान्स' नामक जीव यासाठी कारणीभूत असतात. सुंता (खतना) झालेल्या लोकांपेक्षा सुंता न झालेल्या लोकांमध्ये हे अधिक प्रचलित आहेत कारण लिंगावरील त्वचेखालच्या ओलाव्यामुळे आणि उबदारपणामुळे यीस्टला वाढ होण्यात मदत होते. 40 वर्ष आणि त्यावरील पुरुषांमध्ये कॅण्डीडाचा संसर्ग सामान्य आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

लिंगाच्या आतील भागात जननेंद्रियातील यीस्ट संसर्ग खालील लक्षणांसोबत दिसून येतै.

 • वेदनादायी रॅश.
 • खवले.
 • लालसरपणा.

पुरुष जी लक्षणे सर्वात सामान्यपणे अनुभवतात ते म्हणजे लिंगाच्या तोंडावर खाजवणारी रॅश.

याची मुख्य कारणं काय आहेत?

पुढील काही कारणं आहेत त्यामुळे यीस्ट जास्त प्रमाणात वाढतो आणि जननेंद्रियातील यीस्ट संसर्ग होतो:

 • दमट आणि उबदार अवस्था.
 • कमकुवत प्रतिकार प्रणाली.
 • ॲन्टीबायोटिक्स (कारण निरोगी बॅक्टेरियाचा नाश करतात, जे यीस्टची वाढ नियंत्रित करतात).
 • एचआयव्ही संसर्ग आणि मधुमेह यांसारखे विशिष्ट आजार असलेल्या लोकांना यीस्टचा संसर्ग विकसित होण्याची शक्यता अधिक असते.
 • सुगंधी साबण आणि शॉवर जेलने पुरुषाचे लिंग धुतल्याने त्वचेवर त्रास होऊ शकतो आणि कॅण्डीडा वाढीचे जोखीम वाढू शकते.
 • व्हजायनाल यीस्ट संसर्ग असलेल्या माहिलेसोबत असुरक्षित लैंगिक संभोग केल्याने.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर जननेंद्रियातील यीस्ट संसर्गाचे निदान पुढील प्रमाणे करतात:

 • तुमचा वैद्यकीय इतिहास आणि लक्षणे लक्षात घेऊन.
 • शारीरिक तपासणी करून.
 • जननेंद्रियाच्या एका कोरुन काढलेल्यख भागाची(द्रव किंवा उतीचा नमुना) तपासणी करुन.

जननेंद्रियातील यीस्ट संसर्गासाठी खालील उपचार उपलब्ध आहेत:

 • अँटी-फंगल मलम किंवा लोशन.
 • औषधीयुक्त योनीमार्ग.
 • कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे संसर्गित झालेल्या व्यक्तींसाठी ओरल अँटी-फंगल औषधे.

यापैकी बहुतेक औषधे मेडिकल स्टोरमध्ये उपलब्ध असतात आणि कोणत्याही प्रिस्क्रिपशनशिवाय घेतली जाऊ शकतात. ही औषधे वापरल्यानंतरही संसर्ग कायम राहिल्यास आपले डॉक्टर अँटीफंगल्स दीर्घकाळासाठी घ्यायचा सल्ला देऊ शकतात.संदर्भ

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Yeast Infection Tests.
 2. Department of Health and Mental Hygiene [Internet]. New York; Yeast Infection.
 3. University of Rochester Medical Center Rochester, NY; Yeast Infection.
 4. Am Fam Physician. [Internet] American Academy of Family Physicians; Yeast Infections.
 5. Nyirjesy P,Sobel JD. Genital mycotic infections in patients with diabetes. Postgrad Med. 2013 May;125(3):33-46. PMID: 23748505
 6. C Lisboa et al. Candida balanitis: risk factors. The Journal of European Academy of Dermatology and Venereology Volume24, Issue7 July 2010 Pages 820-826

जननेंद्रियातील यीस्ट संसर्ग चे डॉक्टर

Dr Rahul Gam Dr Rahul Gam Infectious Disease
8 Years of Experience
Dr. Arun R Dr. Arun R Infectious Disease
5 Years of Experience
Dr. Neha Gupta Dr. Neha Gupta Infectious Disease
16 Years of Experience
Dr. Anupama Kumar Dr. Anupama Kumar Infectious Disease
डॉक्टरांचा सल्ला घ्या