गरोदरपणातील बदलणारे मूड्स - Pregnancy Mood Swings in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 09, 2019

March 06, 2020

गरोदरपणातील बदलणारे मूड्स
गरोदरपणातील बदलणारे मूड्स

गरोदरपणातील बदलणारे मूड्स म्हणजे काय?

तुम्ही गरोदर असताना तुमच्या जीवनात त्याच सोबत तुमच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. या जैविक बदलांमध्ये मॉर्निंग सिकनेस, बद्धकोष्ठता, जेवणाची लालसा, खाजणे, पाठदुखी, वजायनल थ्रश, डोकेदुखी, पायात पेटका येणे, सूज इत्यादी. बदल होऊ शकतात. यामधील काही बदल हे सहन करण्यास अवघड असू शकतात जे तुम्हाला अस्वस्थ करू शकतील, ज्यामुळे मूड्स बदलू शकतात. सामान्यतः गरोदरपणात प्रत्येक स्त्रीचे मूड्स बदलतात. कधी कधी या बदलणाऱ्या मूड्समुळे चिंता आणि कधीकधी नैराश्य येऊ शकतं.

याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

जेव्हा तुम्ही गरोदर असता, तेव्हा तुम्हाला जाणवणारे मूड्स मधील बदल असे, असू शकतात:

  • गरोदर असल्याचा अचानकपणे अति आनंद होणे.
  • तणाव.
  • भारावलेलं वाटणे.
  • बाळाच्या जन्मबाबत आणि पालक होण्याबाबत काळजी.
  • विनाकारण उदास होणे.

कधीकधी, ही लक्षणे खूप तीव्र असतात आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

गरोदरपणातील बदलणाऱ्या मूड्स साठी खालील घटक कारणीभुत आहेत:

  • हॉर्मोनल बदल.
  • मेटाबॉलिक बदल.
  • थकवा.
  • शारीरिक ताण.

गरोदर महिलां मध्ये असणारे नैराश्य आणि चिंता  देखील अचानक बदलणाऱ्या मूड्स चे कारण असू शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

गरोदरपणातील बदलणारे मूड्स सामान्य आहेत त्याला निदानाची गरज नसते. पण, जर बदलणाऱ्या मूड्सचा त्रास रोज होयला लागला किंवा खालील लक्षणे दिसली तर तुम्ही तुमच्या डॉक्टर किंवा स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे:

  • झोपेत अडथळा.
  • अल्प कालावधी साठी स्मृतिभ्रंश.
  • चिंता.
  • चिडचिड होत असल्यास.
  • खाण्याच्या सवयी बदलल्यास.
  • दीर्घ कालावधीसाठी एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नसल्यास.

ही चिन्हे गरोदरपणाशी संबंधित नैराश्य देखील दाखवू शकतात. सामान्य डॉक्टर उपचारासाठी काही ठराविक औषधं देतील किंवा तुम्हाला मानसशास्त्रज्ञा कडून सल्ला घेण्यास सुचवतील. व्यवस्थापनाचे इतर उपाय आहेत:

  • गरोदरपणातील योगा आणि ध्यान.
  • नियमित शारीरिक व्यायाम.
  • सकारात्मक विचार करणे आणि सकारात्मक वातावरणात राहणे.
  • चालायला जाणे.
  • मित्र आणि कुटुंबासोबत चित्रपट बघणे.
  • ब्रेक घेऊन अराम करणे.
  • जोडीदारासोबत जेवायला जाणे.
  • मसाज.



संदर्भ

  1. American Pregnancy Association. [Internet]; Mood Swings During Pregnancy.
  2. Office on Women's Health [Internet] U.S. Department of Health and Human Services; Pregnancy and body image.
  3. Department of Health Emotional health for parents during pregnancy and after the birth. Government of Western Australia [Internet]
  4. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Pregnancy and your mental health
  5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Pregnancy stages and changes

गरोदरपणातील बदलणारे मूड्स साठी औषधे

Medicines listed below are available for गरोदरपणातील बदलणारे मूड्स. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.