myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

सारांश

बद्धकोष्ठता एक सामान्य परिस्थिती आहे, ज्यामध्ये मलनिःसारण कठीण होते आणि ते कमी वारंवारतेने होते. त्याचे अनेक घटकांशी संबंध आहे उदा. आहार, वैद्यकीय इतिहास किंवा इतर आरोग्य परिस्थितींचे अस्तित्त्व असणें. काही वेळा, काही औषधांमुळे सुद्धा बद्धकोष्ठता होते. सर्वच डॉक्टरांचे असे मत आहे की, बद्धकोष्ठता आजार नसून अंतर्निहित पचनतंत्र परिस्थितीचे प्रकटीकरण आहे. बद्धकोष्ठतेच्या इतर कारणांमध्ये आतड्यांतील अडसर, ओटीपोटीच्या स्नायू कमजोर होणें, आहारात तंतूंचे अभाव किंवा निर्जलीकरण हे सामील आहेत.

बद्धकोष्ठतेचे प्रभावी व्यवस्थापन सहज मिळणार्र्या पाचक औषधांद्वारे शक्य आहे. या औषधांनी तात्काळ आराम मिळत असले, तरी ते सारख्या घेऊ नयेत. अनेक घरगुती उपायही वापरले जाऊ शकतात. घातक बद्धकोष्ठता तुमच्यासाठी समस्याजनक असू शकते आणि कारण निर्धारित करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी अनेक चाचण्या करण्याची गरज पडू शकते. आहारामध्ये बदल बद्धकोष्ठतेच्या व्यवस्थापनामध्ये मदतीचे असतात. बद्धकोष्ठतेवर उपचार न झाल्यास, याच्यात गुंतागुंती होऊ शकतात.

 1. मलावरोध (बद्धकोष्ठता) ची लक्षणे - Symptoms of Constipation in Marathi
 2. मलावरोध (बद्धकोष्ठता) ची कारणे - Causes of Constipation in Marathi
 3. मलावरोध (बद्धकोष्ठता) चा अटकाव - Prevention of Constipation in Marathi
 4. मलावरोध (बद्धकोष्ठता) चे निदान - Diagnosis of Constipation in Marathi
 5. मलावरोध (बद्धकोष्ठता) चा उपचार - Treatment of Constipation in Marathi
 6. बद्धकोष्ठता असताना काय खाणे टाळावे - What to avoid during Constipation in Marathi
 7. बद्धकोष्ठता असताना काय खावे - What to eat during Constipation in Marathi
 8. मलावरोध साठी औषधे
 9. मलावरोध चे डॉक्टर

मलावरोध (बद्धकोष्ठता) ची लक्षणे - Symptoms of Constipation in Marathi

बद्धकोष्ठतेची लक्षणे समजण्यास सोपी असतात, उदा. :

 • नेहमीपेक्षा कमी वेळा शौच होणें.
 • पोट साफ न झाल्याची संवेदना राहणें
 • मलनिःसारण करतांना कठिणता किंवा वेदना होणें.
 • कडक शौच येणें.

बद्धकोष्ठतेच्या या लक्षणांमध्ये काही तासांमध्ये आराम मिळते किंवा ते अधिक वेळ टिकू शकतात. तरी सुद्धा, एखाद्या व्यक्तीला खालील लक्षणे असल्यास, त्याने/तिने डॉक्टरांना त्वरीत संपर्क करावे:

मलावरोध (बद्धकोष्ठता) ची कारणे - Causes of Constipation in Marathi

जेव्हा मल आंत्रामधून खूप हळू पुढे सरकतो किंवा व्यवस्थितपणे बाहेर निघत नाही, तेव्हा मल कठीण आणि शुष्क होतो त्यामुळे मलावष्टम्भ होतो.

दीर्घकालीन बद्धकोष्ठाची पुढील करणे असू शकतात:

1. आंत्रामध्ये किंवा मलाशयामध्ये अडथळा असणे 

 • आंत्रामध्ये  किंवा मलाशयामध्ये अडथळा असल्यास मलाची पुढे सरकण्याची गती थांबते किंवा मंद होते. त्याची करणे पुढीलप्रमाणे असू शकतात :
 • गुदप्रदेशी भेग पडणे (Fissure )
 • आंत्राचा अडथळा (Bowel obsrtuction )
 • आंत्राचा  कर्करोग 
 • आंत्र संकुचित होणे (Bowel Stricture )
 • पोटातील इतर अवयवाचा कर्करोग जो आंत्रावर दाब देतो 
 • मलाशयाचा कर्करोग 
 • मलाशय भ्रंश ( Rectocele )

2. कोलन आणि गुदाशय यांच्या आजू बाजू ला असणाऱ्या नसांमधला त्रास  :- 

मज्जासंस्थेसंबंधीचा त्रास म्हणजेच जे मज्जातंतू कोलन आणि गुदाशय यांच्यातील स्नायुंचा आकुंचन करून मलाला पुढे ढकलण्यास कार्य करते त्या मध्ये विकार होणे . त्यास पुढील कारणे आहेत:

 • ऑटोनोमिक न्युरोपॅथी
 • मल्टिपल स्केलेरोसिस
 • पार्किन्सन रोग
 • मणक्याची दुखापत
 • स्ट्रोक

3. मल निस्सारण करणाऱ्या मांसपेशींचे विकार :- 

आतडीच्या हालचाली करणाऱ्या मांसपेशींचे जर विकार असेल तर ते गंभीर स्वरुपाचा बद्धकोष्ठता निर्माण करु शकतात. या विकारांमध्ये हे होऊ शकते:

 • आतडीची हालचाल करण्यासाठी मांसपेशींचे आकुंचन प्रसरण करण्यास असमर्थता.
 • मांसपेशींना मधले लवचिकपणा कमी होणे.

4. शरीरातील हार्मोन प्रभावित करणाऱ्या कारणं 

हार्मोन्स आपल्या शरीरातील द्रवांमध्ये समन्वय बनवण्यास मदद करतात. ज्या आजारां आणि करणं मुळे हे समन्वय बिघते तेव्हा बद्धकोष्ठता बघायला मिळते. हे आहेत,

 • मधुमेह
 • अति सक्रिय  पॅराथायरॉइड ग्रंथी (हायपरपरोथायडिज्म)
 • गर्भधारणा
 • कमी सक्रिय थायरॉईड ग्रंथी  (हायपोथायरॉडीझम)

ज्यांना धोका असतो 

तीव्र बद्धकोष्ठता ज्याच्यामुळे होण्याच्या वाढ होऊ शकते ते घटक म्हणजे:

 • वृद्ध प्रौढ असणे 
 • महिला जात असणे 
 • निर्जलीकरण होणे (पुरेसे पाणी आणि इतर द्रवपदार्थ घेतलेले नसणे)
 • फाइबरमध्ये कमी असलेला आहार खाणे
 • थोड्या प्रमाणात किंवा व्यायाम न करणे 
 • रक्तदाब कमी करण्यासाठी काही औषधे, तंबाखू, नारकोटिक्स, झोप येण्यासाठीचे औषधे या सारखे इतर काही औषधें घेणे 
 • उदासीनता किंवा खाण्याच्या विकृती सारखे मानसिक आजाराची स्थिती असणे
 • जास्त मांस आणि दुग्धजन्य पदार्थ असलेले अन्न घेणे.
 • तेलकट आणि साखर जास्त असलेले पॅकेट चे खाद्य पदार्थ घेणे.
 • खूप दारू किंवा कॅफीन चा वापर 
 • मल त्यागाचा वेग आलेले असताना ही त्या कडे दुर्लक्ष करणे 

मलावरोध (बद्धकोष्ठता) चा अटकाव - Prevention of Constipation in Marathi

बद्धकोष्ठता कसे टाळावे 

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी खालील उपाय केले जाऊ शकतात:

 • जास्त तंतू म्हणजेच फायबर प्रमाणात असलेले आहार घ्या. त्याचे चांगले स्रोत म्हणजे फळे, भाजीपाला, शेंगा, आणि व्होल ग्रेन ब्रेड आणि अन्नधान्य (विशेषतः ब्रान ).
 • भरपूर पाणी आणि इतर द्रवपदार्थ प्या. फायबर आणि पाणी एकत्र हे नियमितपणे आपल्या  आतदड्यांचा हालचाल चालू ठेवतात.
 • कॅफिन टाळा,  चहा आणि कॉफी मुळे  डिहाइड्रेशन होऊ शकते.
 • दूध चा वापर कमी करा खाण्यात. डेअरी उत्पादने काही लोकांमध्ये बद्धकोष्ठता उत्पन्न करू शकतात.
 • नियमित व्यायाम करा. दिवसाचे कमीतकमी 30 मिनिटे काहीनाकाही सक्रिय कार्य करा  असे आठवड्यातील बहुतेक दिवस करा.
 • आपणास जर वेग आला असेल मल त्यागाचा तर बाथरूम ला जरूर जा त्यास थांबवू नका.

मलावरोध (बद्धकोष्ठता) चे निदान - Diagnosis of Constipation in Marathi

बध्दकोष्ठते चे निदान

आपले डॉक्टर आपल्या लक्षणांवरून आणि वैद्यकीय इतिहासावरून आपले निदान करू शकतात.

आपले डॉक्टर आपल्या मालत्यागाच्या सवयीबद्दल काही प्रश्न विचारतील. आपल्या डॉक्टरांशी याविषयी चर्चा करण्यास काही लज्जास्पद वाटन्याची गरज नाही. हे महत्त्वाचे आहे की त्यांना आपल्या सर्व लक्षणांची जाणीव असावी , जेणेकरुन ते योग्य निदान करु शकतील.

आपले डॉक्टर आपल्या आहार बद्दल , व्यायामा बद्दल  आणि आपल्या रूटीनमध्ये कोणतेही अलीकडील बदल झाले आहेत का त्याबद्दल प्रश्न विचारू शकतात.

शारीरिक चाचणी 

जर आपल्या डॉक्टरांना वाटत असेल कि आपल्या मलाशयात मल हे कडक होऊन अडकला आहे,  तेव्हा ते शारीरिक तपासणी करू शकतात . एक नेहमीची परीक्षा म्हणजेच आपण आपल्या पाठीवर झोपणार आणि डॉक्टर आपल्या पोटला दाबून बघतील. आपण नंतर आपल्या एका कुशी वर झोपणार आणि डॉक्टर आपल्या मलाशयचे परीक्षण करतील . आपले डॉक्टर जे एकत्रित कठीण झालेले मल जे मलाशयात जमा झालेले आहे त्याला फील करू शकतील.

पुढील चाचण्या

आपल्याला जर  गंभीर लक्षणांचा अनुभव येत असेल तर आपले डॉक्टर इतर परीक्षणे, जसे की रक्त चाचण्या किंवा थायरॉईड ची चाचणी करू शकतात जेणेकरून ते इतर दुसऱ्या परिस्तिथी ला वगळू शकतील.

आपण घेतल्या गेलेल्या इतर चाचण्या:

 • एक पोटाचा  एक्स-रे - जेथे एक्स रे आपल्या पोटाच्या आतील रचना बघण्याकरिता वापरली जाते.
 • ट्रान्सीट स्टडी परीक्षण  - जिथे आपण एक्स-रेवर दिसेल असा एक  विशेष कॅप्सूलचा लहान कोर्स घेतो; कॅप्सूलला आपल्या पाचन प्रणाली तुन  पुढे जाण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहण्यासाठी एक किंवा अधिक एक्स-रे घेतल्या जातात.
 • गुदाशय आणि संपूर्ण कोलन (कोलनोस्कोपी) ची परीक्षा. ह्या परीक्षणा तुन आपले डॉक्टर संपूर्ण कोलन ची तपासणी करू शकतात.
 • एनोरेक्टल मनोमेट्री- आपल्या मलाशय आणि त्याच्या आसपासचे जे  स्नायू आणि मज्जातंतू आहेत ते किती चांगले कार्य करत आहेत याची कल्पना या चाचणीतून माहित पडते.
 • जुन्या प्रौढ व्यक्तीमध्ये आंत्राच्या कर्करोगाचा वाढलेला धोका असल्याने, आपले डॉक्टर कॅन्सर वगळण्या करीता  सीटी स्कॅन किंवा कोलनोस्कोपीसह कॅन्सर ची चाचणी देखील करू शकतात.

मलावरोध (बद्धकोष्ठता) चा उपचार - Treatment of Constipation in Marathi

आजारात तात्काळ आराम मिळण्यासाठी, तुमचे डॉक्टर पाचक औषधे विहित करतात. याने काही वेळा बद्धकोष्ठता बरे होण्यास साहाय्य मिळते, पर रोगावरील अंतर्निहित कारणावर उपचार होत नाही. पाचक औषधे अधिक वापरल्याने अनेक सहप्रभाव होऊन दीर्घ काळात हे हानीकारक ठरू शकते.

बद्धकोष्ठता असलेल्यांमध्ये पाचक औषधे अधिक वापरणें सामान्य असते, ज्याने अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. खाण्यासंबंधी समस्या असलेल्या लोकांसाठी, पाचक औषधांचे अनियमित वापर धोकादायक असून त्याने पचनतंत्राच्या किनारीची गंभीर हानी होऊ शकते. म्हणून सहज मिळणारी पाचक औषधे बेताने वापराव्यात.

पाचक औषधे घेतल्यानंतर पुढील लक्षणे आढळल्यास, डॉक्टरांना त्वरीत संपर्क साधायला हवे:

 • रुग्णाला शौचादरम्यान रक्त येणें.
 • नाकातून रक्त वाहणें.
 • पोटदुखी होणें.
 • मळमळ होणें
 • मल निःसारणतंत्रात बदल
 • अशक्तपणा असणें.

बद्धकोष्ठता या अवस्थेवर उपचार म्हणून औषधांच्या दुकानात अनेक पाचक औषधे सहज उपलब्ध आहेत. ओरल ऑस्मोटिक एजेंट कॉलनमध्ये पाणी नेऊन, रुग्णाला शौच सहज करतात. याच्या उलट पद्धतीने ओरल बल्क फॉर्मर पाणी शोषून विष्ठा बनवतात व शौच सहज होतो. इतर पाचक औषधांमध्ये ओरल स्टूल सॉफ्टनर आणि ओरल स्टिम्युलॅंट सामील आहेत.

मौखिक पाचक औषधे काही पोषक तत्त्वे व औषधे शोषण्याच्या शरिराच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप करतात. काही पाचक औषधांमुळे इलेक्ट्रॉलाइट असंतुलन सुद्धा होते. म्हणून, पाचक औषध घेण्यापूर्वी खालील बाबी तपासण्यासाठी त्याचे लेबल वाचणें महत्त्वाचे असते:

 • निगडीत सहप्रभाव.
 • औषधाचे परिणाम.
 • मधुमेह, मूत्रपिंडाच्या समस्या किंवा गर्भावस्थेसारख्या आरोग्य परिस्थिती असणें.
 • 6 वर्षांखालील मुलांना डॉक्टरांच्या पूर्वसमुपदेशनाशिवाय पाचक औषधे देऊ नयेत.
 • बद्धकोष्ठता हाताळण्यासाठी डॉक्टर खाण्याच्या सवयी व आहाराची काळजी घेण्याचा सल्ला देतात. बद्धकोष्ठता गंभीर असल्यास व वेळेबरोबर बिघडत असल्यास, तुमचे डॉक्टर इतर औषधांचा सल्ला देतात. एखादे अडसर असल्यास, तुमचे डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात.

घरगुती उपाय

बद्धकोष्ठते आराम मिळण्यासाठी घरगुती उपायसुद्धा मदतीचे असतात. काही सोपे घरगुती उपाय याप्रमाणे असू शकतात:

 • हिंग
  गरम पाण्याच्या एका पेल्यामध्ये दोन चिमूट हिंग टाकून हे मिश्रण दिवसांतून दोनदा घ्यावे.
 • ओवा
  ओवाच्या बिया तव्यावर सुके भाजावे आणि पूड बनवावी. थोड्या कोमट पाण्यासह या बिया गिळून घ्याव्यात.
 • पाणी
  सारखेच सौम्य बद्धकोष्ठता असल्यास, सकाळी उठताच पेलाभर कोमट पाणी प्यावा, ज्याने शौच सुलभ होईल. दर सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्या. निर्जलीकरण टाळण्यासाठी दिवसांत नियमित अंतराळावर पाणी पीत रहा.
 • कॉफी
  कॅफीन नैसर्गिक पाचक आहे आणि प्रकृतीने सौम्य आहे. सकाळी एक कपभर काळी कॉफी घ्यावी. या उपायाचा खूप आधार घेऊ नये, कारण कॅफीनमुळे निर्जलीकरण होते आणि झोपतांना अडचणी येऊ शकतात.

जीवनशैली व्यवस्थापन

आहार

 • बद्धकोष्ठतेतून दीर्घ काळ आराम मिळण्यासाठी पहिलेवहिले पाऊल म्हणजे आहाराची काळजी घेणें. यात आहाराचा मोलाची भूमिका असते. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी, आहारात अधिक तंतू घ्यावेत. तंतूमय पदार्थांसह पाणी पिल्याने खूप आराम मिळते.
 • एका औसत प्रौढ व्यक्तीला दररोज 25 ग्रॅम तंतू हवे असतात. तंतूचे चांगले स्त्रोत आहेत संपूर्ण धान्ये उदा. होल व्हीट ब्रेड, ओटमील आणि कडधान्ये. मटर आणि सोयाबीनसारख्या डाळींमध्येही खूप तंतू असतात. हिरव्या पालेदार भाज्यांमध्ये तंतूशिवाय इतर पोषक तत्त्वेही असतात. बदाम आणि शेंगदाण्यातही प्रचुर मात्रेत तंतू असतात.
 • पंचनतंत्राचे कार्य सुरळीत चालण्यासाठी भरपूर पाणी दररोज पाणी पिणें महत्त्वाचे आहे. पाण्याने शौच मऊ होण्यास साहाय्य मिळते व शौच सहज होतो. इतर तरळ पदार्थ उदा. फळांचे रसही घेण्यात येऊ शकतात.
 • जंतूवर्धक प्रचुर मात्रेत असलेल्या पदार्थांद्वारे पचनतंत्राचे आरोग्य सुधारते व दीर्घकाळ लाभ होतात.
 • अन्नासंबंधी बद्धकोष्ठता टाळण्यासाठी, प्रक्रिया केलेले पदार्थ, एरेटेड पेय (पेप्सी, कोकाकोला इ.) आणि गारठलेले पदार्थ टाळा.

व्यायाम

नियमित शारीरिक व्यायामामुळे पचनतंत्राचे आरोग्य सुधारते व पोटाच्या स्नायूंना संप्रेरणा मिळते. डॉक्टर नियमित ढाचा बनवण्यासाठी शौचाचे प्रशिक्षण घेऊन बद्धकोष्ठतेतून निर्वाण घेण्याचा सल्लाही देऊ  शकतात.

औषधोपचार

औषधोपचार किंवा पूरक तत्त्वे घेत असल्यास, ती बद्धकोष्ठतेचे कारण असू शकतात का याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या. असे असल्यास, तुम्ही पर्यायी औषधांची विनंती करू शकता.

बद्धकोष्ठता असताना काय खाणे टाळावे - What to avoid during Constipation in Marathi

बद्धकोष्ठता असताना काही आहार असे आहेत जे आपले बद्धकोष्ठता अजून वाढवू शकतात ते टाळावे 

 • दूध आणि दुधाचे पदार्थ 
 • तेलकट
 • कॅफिनने अजून बद्धकोष्टता वाढू शकते 
 • मांस जे पचायला जाड जाते.
 • बेकरी चे पदार्थ जसे पाव , ब्रेड.
 • दारू, तंबाखू आणि इतर कुठलेही निकोटीन असलेले पदार्थ

बद्धकोष्ठता असताना काय खावे - What to eat during Constipation in Marathi

आपल्या आहारचा आपल्या कोष्ठावर परिणाम होतो त्यामुळे आपले आहार हे बद्धकोष्ठता करणार नाही याचा विचार करणे महतत्वाचे असते. आपल्या आहारात फायबर युक्त आहाराची वाढ आपल्या मलाची घनता वाढविते आणि आपल्या आतड्यांमार्फत त्यांना बाहेर काढण्याची क्षमता वाढवते. हळूहळू प्रत्येक दिवस आपल्या आहारात  ताजे फळे आणि भाज्या खाण्यास सुरुवात करा. पूर्ण-धान्य युक्त असलेले ब्रेड  निवडा.

आपले आहार जे बद्धकोष्ठता करणार नाही ते आहेत 

 • बियाणे (बीन्स) जे आपल्या शरीरात फायबर वाढवतील 
 • ओटस 
 • सफरचंद, किवी, संत्री या फळांचा आहारात समावेश 
 • आलो वेरा ज्युस हे बद्धकोष्ठता कमी करण्यास खूप चांगले मदत करते 
 • काळे मनुके रात्री भिजत घालून सकाळी घेणे 
 • सब्जा हे पण एक चांगले घरगुती उपाय आहे 
 • आणि शेवटी जे सगळ्यात महतत्वाचे म्हणजे खूप पाणी पिणे.
Dr. Sushila Kataria

Dr. Sushila Kataria

सामान्य चिकित्सा

Dr. Sanjay Mittal

Dr. Sanjay Mittal

सामान्य चिकित्सा

Dr. Prabhat Kumar Jha

Dr. Prabhat Kumar Jha

सामान्य चिकित्सा

मलावरोध की जांच का लैब टेस्ट करवाएं

LFT ( Liver Function Test )

20% छूट + 10% कैशबैक

Thyroid Stimulating Hormone (TSH)

20% छूट + 10% कैशबैक

मलावरोध साठी औषधे

मलावरोध के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Gelusil MpsANTACID MPS SYRUP 170ML0
DigeneDigene Gel Mint 130
DuphalacDUPHALAC 150ML SYRUP134
CremaffinCREMAFFIN (BLUE) 200ML SYRUP102
SoftdropsSoft Drops Liquigel181
FreegoFreego Granules 90 gm164
AristozymeARISTOZYME FIZZ TABLET 4S15
NormalaxNormalax 10 Mg Tablet41
ADEL 28 Plevent DropADEL 28 Plevent Drop200
SBL Asafoetida DilutionSBL Asafoetida Dilution 1000 CH86
NovalaxNovalax Syrup44
Schwabe Natrum muriaticum TabletSchwabe Natrum muriaticum Biochemic Tablet 200X560
Bjain Asafoetida DilutionBjain Asafoetida Dilution 1000 CH175
OslaxOSLAX 100ML SYRUP73
SBL Arnica Montana Hair Oil Arnica Montana Hair Oil56
Schwabe Sabal PentarkanSchwabe Sabal Pentarkan 128
PiclinPICLIN SYRUP 100ML81
Arnica Montana Herbal ShampooArnica Montana Herbal Shampoo With Conditioner72
Schwabe Agnus castus MTSchwabe Agnus castus MT 88
Schwabe Ananas sativus CHSchwabe Ananas sativus 12 CH96
ADEL Nux Vomica Mother Tincture QADEL Nux Vomica Mother Tincture Q 184

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Constipation .
 2. Stanford Health Care [Internet]. Stanford Medicine, Stanford University; Constipation Causes
 3. National Health Service [Internet]. UK; Laxatives.
 4. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Constipation
 5. Stanford Health Care [Internet]. Stanford Medicine, Stanford University; Complications of Constipation
और पढ़ें ...