संधिवात विकार - Rheumatic Disorder in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 04, 2019

March 06, 2020

संधिवात विकार
संधिवात विकार

संधिवात विकार काय आहे?

संधिवात विकार हा सांधे आणि संयोजक टिश्यूंना प्रभावित करणारा विकारांचा समूह आहे. यामुळे सांध्यांमध्ये वेदना, सूज आणि ताठरपणा येतो. काही संधिवात विकार इतर अवयव जसे स्नायुबंध, स्नायू, आणि अंतर्गत अवयवांवर देखील प्रभाव पाडतात. सोरायटिक आर्थराइटिस आणि ल्यूपस यासारखे ऑटोम्यून रोग देखील संधिवात विकारां अंतर्गत येतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

संधिवात विकारांचे मुख्य चिन्ह आणि लक्षणं रोगावर अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे होणाऱ्या संधिवात रोगात आढळणारे सामान्य चिन्ह आणि लक्षणं खालीलप्रमाणे आहेत:

ल्यूपस

 • डोकेदुखी.
 • छातीत दुखणे.
 • ताप.
 • त्वचेची प्रकाश संवेदनशीलता.
 • सांध्यांवर सूज.
 • तोंडात फोड आणि नाकात फोड.
 • केस गळती.
 • डोळ्यांच्या भोवती, तळपाय, पाय आणि हातांवर सूज.
 • नाक आणि गालच्या मध्ये रॅशेस.

रूमेटॉइड आर्थराइटिस

स्क्लेरोडर्मा

 • त्वचेत असामान्यता.
 • सकाळी ताठरपणा.
 • त्वचेवर पिवळे पॅच आणि कोरडे पॅच.
 • आवळलेली, चमकदार त्वचा.
 • प्रभावित भागात केस गळती.
 • वजन कमी होणे.
 • सांध्यांमध्ये वेदना.

स्जोग्रेंस सिंड्रोम

याची मुख्य कारणं काय आहेत?

संधिवात विकारांचे मुख्य कारण आणि धोक्याचे घटक खालीलप्रमाणे आहेत:

 • आघात.
 • संसर्ग.
 • चयापचय समस्या.
 • काही हार्मोन्स.
 • मज्जासंस्थेची समस्या.
 • सांध्यांमध्ये सूज.
 • हाडांची टोक व्यापणाऱ्या टिश्यूना नुकसान.
 • जीन्स.
 • वांशिकता.
 • प्रतिकार शक्तीची समस्या.
 • पर्यावरण प्रदूषक.
 • स्त्री लिंग.
 • वय.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

लक्षणे शोधण्यासाठी आणि रोग ओळखण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करतात आणि वैद्यकीय इतिहासाची चौकशी करतात. ब्लड टेस्ट आणि प्रभावित सांध्यामधून काढलेल्या द्रवांचे टेस्ट - अँटी- डीएनए, अँटी-आरएनए आणि अँटी-न्यूट्रोफिलिक या अँटीबॉडीजसारखे विशिष्ट प्रतिपिंड शोधण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. हाडांमधील दृश्यमान बदल पहाण्यासाठी डॉक्टर छातीचा एक्स-रे आणि एमआरआय स्कॅन देखील करण्यास सांगू शकतात.

संधिवात विकारांसाठी वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धतींमध्ये खालील समाविष्ट आहेत:

 • फिजिकल थेरपी.
 • कॉर्टिकोस्टिरॉईड्स आणि नॉनस्टेरोइडल अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्स जळजळ कमी करतात.
 • योग.
 • शस्त्रक्रिया.
 • रोग-सुधारित अँटी-रूमेटिक औषधे (डीएमआरडीएस).
 • संशोधित व्यायाम कार्यक्रम.
 • वेदना मुक्त करणारे औषधे.संदर्भ

 1. UCSF Benioff Children's Hospital [Internet]. University of California San Francisco; Rheumatic Disorders.
 2. Arthritis Foundation [Internet]. Georgia, United States; Rheumatoid Arthritis.
 3. Rheumatology Research Foundation [Internet]. Georgia: American College of Rheumatology. Sjögren's Syndrome.
 4. National Institute of Arthritis and Musculoskeletal and Skin Disease. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Rheumatoid Arthritis.
 5. National Institute of Arthritirs and Musculoskeletal and Skin Disease. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Arthritis and Rheumatic Diseases.
 6. National Institute of Arthritirs and Musculoskeletal and Skin Disease. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Systemic Lupus Erythematosus (Lupus).

संधिवात विकार साठी औषधे

संधिवात विकार के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।