तोंड येणे - Mouth Ulcer in Marathi

Dr Razi AhsanBDS,MDS

December 24, 2018

September 09, 2020

तोंड येणे
तोंड येणे

सारांश

सामान्यपणे तोंडात फोडी येणे एक शारीरिक अवस्था आहे,ज्यात तोंडात हलके दुखते आणि सोबतच हलकी सूज आणि वेदना उद्भवते. मुख्यतः तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाल्यामुळे हे होते,कारण ही त्वचा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते. सामन्यतः,तोंडात किंवा तोंडावाटे अल्सर होणे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये आढळते आणि अनेक कारणांमधे दुखापत, पौष्टिक आहाराची कमतरता आणि तोंडाची अस्वच्छता या कारणांमुळे हे होऊ शकते.वैद्यकीय चाचण्यांमध्ये याचे निदान करणे सोपे आहे आणि रक्त तपासणीची गरज नाही. तथापि, वारंवार होणाऱ्या तोंडातील फोडींच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रक्त तपासणी केली जाऊ शकते. सामान्यत: अल्सरचा उपचार करण्यासाठी डॉक्टर औषधोपचार करतील. असे अनेक घरगुती उपाय आहेत,जे तोंडाच्या अल्सरला बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तोंडाच्या अल्सरचा उपचार प्रामुख्याने जुना आहे आणि त्यात तोंड धुण्यासाठीचे प्रतिजंतुकीय द्रव्ये, पूरक व्हिटॅमिन बी कॉंप्लेक्स आणि स्थानिक वेदनाशामक जेलचा समावेश आहे. प्रतिबंधांमध्ये, व्हिटॅमिन बी 12 आणि प्रचुर फॉलिक अॅसिड असलेले खाद्यपदार्थ घेणें समाविष्ट आहे.

तोंड येणे ची लक्षणे - Symptoms of Mouth Ulcer in Marathi

तोंडातील फोडी गालांच्या, ओठांच्या आत किंवा जिभेवर सुद्धा दिसू शकतात. एका वेळी एका व्यक्तीला, एकापेक्षा जास्त तोंडाचे अल्सर (फोडं) असणेंही शक्य आहे. ते सहसा त्यांच्या भोवतील लाल रंगाची सूज आल्यामुळे दिसतात. अल्सरचा केंद्र पिवळसर किंवा धूसर दिसू शकतो.

सामान्यपणे तोंडाच्या अल्सरमध्ये दिसणारी खालील लक्षणे आहेत:

  • तोंडाच्या आत हलक्या लाल रंगाचे चट्टे.
  • बोलताना आणि जेवतांना वेदना.
  • जळत असल्याच्या संवेदना.
  • जळजळ
  • लाळीचा विपुल प्रमाणातील स्त्राव
  • थंड अन्न किंवा पेय घेतल्याने त्रास तात्पुरते शमणें.
  • चिडचिड (मुलांच्या बाबतीत).

तोंडाचे अल्सर सामान्यतः काही दिवसातच बरे होतात. तथापि, एखाद्याच्या लक्षात खालील गोष्टी आल्यास त्याने डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे:

  • वेदना न होता त्या भागात त्रास होत असल्यास.
  • अल्सर नवीन भागात पसरत असल्यास.
  • त्रास 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असल्यास.
  • अल्सर मोठे होत असल्यास.
  • त्रासासोबत ताप असल्यास.
  • अल्सरसोबतच रक्तस्त्राव,बाह्य त्वचेवर फोडी किंवा गिळताना अडचण असल्यास

तोंड येणे चा उपचार - Treatment of Mouth Ulcer in Marathi

तोंडाच्या अल्सरमध्ये वैद्यकीय हस्तक्षेप आवश्यक असू शकतो किंवा नाही. सहसा स्वतःची काळजी आणि काही किरकोळ घरगुती उपचाराच्या मदतीने अल्सर बरा होऊ शकतो. तथापि, डॉक्टर लगेच बरे होण्यासाठी औषधे देखील विहित करु शकतात.उदा.:

  • वेदना कमी करण्यासाठी बिगर स्टेरॉयडल, दाहशामक औषधे (NSAIDs).
  • तोंड धुण्यासाठी प्रतिजंतुकीय द्रव्ये आणि जळजळ (सूज) व वेदना कमी करण्यासाठीचे मलम
  • एकदा अल्सरचे मूळ कारण निश्चित झाल्यानंतर,विशिष्ट रोगाशी निगडीत वेगवेगळे उपचार केले जाऊ शकतात. विशिष्ट संक्रमणासाठी तोंडाद्वारे प्रतिजैविके आणि प्रतिजनुकीयांसारखी प्रतिजंतुकीय औषधे दिली जातात.
  • कमतरता असल्यास पूरक व्हिटॅमिन बी 12 किंवा बी कॉम्प्लेक्स दिली जाऊ शकतात.
  • वेदना आणि जळजळ दूर करण्यासाठी व अल्सरवर लावण्यासाठी,  वेदनाशामक आणि/किंवा दाह-प्रतिबंधक स्थानिक मलम लावू शकता.
  • तोंडाच्या कर्करोगासाठी योग्य उपचार त्याच्या टप्प्यावर आधारित आहे, ज्यामध्ये कीमोथेरपी, विकिरण पद्धत किंवा रेडिओथेरपी किंवा शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

जीवनशैली व्यवस्थापन

तोंडाचा अल्सर प्रभावीपणे हाताळण्यासाठी काही पावले उचलली जाऊ शकतात.

काय करायचं?

  • दात स्वच्छ करताना मऊ-कुच्यांचा, उच्च-गुणवत्तेचा दात घासण्याचाब्रश वापरा. दिवसातून दोन वेळा दात घासा/तोंड धुवा.
  • विटामिन ए, सी आणि सारख्या अँटीऑक्सिडंट्सने समृध्द असलेले खाद्यपदार्थ घ्यावेत उदा. लिंबूच्या वर्गातील फळे, पपई, आंबे, गाजर, लिंबू, पेरू, भोपळा मिरची, बदाम, आवळा.
  • चावण्यास सोपे असतील असे मऊ पदार्थ खा.
  • दंतचिकित्सा नियमित करा.
  • भरपूर पाणी प्या

काय करू नये?

  • मसालेदार किंवा आम्लयुक्त  खाद्य पदार्थ घेऊ नका.
  • सोडा पिणें टाळा
  • तोंड धुण्यासाठीची प्रखर द्रव्ये किंवा टूथपेस्ट वापरु नका.
  • अल्सरला पिळून पू काढू नका.
  • अल्सरला सतत स्पर्श करु नका.
  • मद्यपान करणे किंवा धूम्रपान करणें टाळा.
  • खूप गरम पेय पिणें टाळा.
  • भरपूर चॉकलेट व शेंगदाणे आणि दिवसातून अनेकदा कॉफी घेणें टाळा.

तोंड येणे काय आहे - What is Mouth Ulcer in Marathi

तोंडातील अल्सरमुळे 20-30 टक्के लोकसंख्या प्रभावित आहे, अशी स्थिती आहे. यामध्ये तोंडाच्या आतील त्वचेला(म्युकस मेंब्रैन)इजा झालेली असते. ती प्राणघातक नव्हे, आणि त्याची कारणे तसेच त्यावर व्यवस्थित उपचार उपलब्ध आहे. प्रौढांना आणि लहान मुलांना देखील तोंडातील अल्सरचा त्रास होऊ शकतो,जे वेदनादायक असते. गाल किंवा ओठांच्या आत त्रास होऊ शकतो आणि दोन दिवस किंवा एका आठवड्यांपर्यंत टिकू शकतो.



संदर्भ

  1. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Mouth ulcers
  2. National Health Portal [Internet] India; Mouth Ulcers (Stomatitis)
  3. Nidirect [Internet]. Government of Northern Ireland; Mouth ulcers
  4. Oral Health Foundation, Smile House, 2 East Union Street, Rugby, Warwickshire, CV22 6AJ, UK [Internet] Mouth ulcers
  5. Dental Health Foundation, Dublin, Ireland [Internet] Mouth Ulcers
  6. National Health Service [Internet]. UK; Mouth ulcers.
  7. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Mouth ulcers

तोंड येणे साठी औषधे

Medicines listed below are available for तोंड येणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for तोंड येणे

Number of tests are available for तोंड येणे. We have listed commonly prescribed tests below: