सॅल्मोनेला - Salmonella in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 04, 2019

March 06, 2020

सॅल्मोनेला
सॅल्मोनेला

सॅल्मोनेला काय आहे?

सॅल्मोनेला संसर्ग किंवा सॅल्मोनेलॉसिस हा आंतड्यांमधील एक बॅक्टेरियल संसर्ग आहे. हे बॅक्टेरिया मानव आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतात आणि मलाद्वारे बाहेर पडतात. हा संसर्ग दूषित अन्न किंवा पाण्यामधून पसरू शकतो.

सामान्यत: सॅल्मोनेलॉसिसचा संसर्ग झाल्यापासून 2 तासांच्या आत अतिसार, पेटके आणि ताप यासारखी लक्षणं दिसतात. कोणत्याही विशिष्ट उपचारांशिवाय हा संसर्ग बरादेखील होऊ शकतो. एक साधी मल तपासणी हा रोग झाला असल्याची पुष्टी करते. पण, वृद्ध आणि नवजात मुलांसाठी हा रोग घातक ठरु शकतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

हा रोग असंख्य लक्षणांद्वारे ओळखला जातो

रोगाची तीव्रता अधिक असल्यास, यामुळे सतत ताप येतो आणि रुग्णाची प्रकृती ढासळू शकते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

सॅल्मोनेला टायफीच्या बॅक्टेरियाने दूषित असलेले कच्चे डेअरी प्रॉडक्ट्स किंवा अर्धवट शिजलेले किंवा कच्चे मांस किंवा पोल्ट्री प्रॉडक्ट्सचा परिणाम आहे.  त्याचप्रमाणे संसर्गित पोल्ट्रीच्या खतांचा वापर केल्यास फळे आणि भाज्यांमुळे देखील बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. पोटावर होणाऱ्या त्याच्या परिणामामुळे हे गॅस्ट्रोएन्टेरिटिस किंवा स्टमक फ्लू म्हणून वर्गीकृत केले जाते.

जनावरांना स्पर्श केल्यानंतर किंवा जनावरांच्या विष्टेशी संपर्क आल्यानंतर हाथ स्वच्छ न धुता खाल्यामुळे याचा संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे, अस्वच्छ संसर्गित व्यक्तींनी किंवा इतरांनी वापरलेल्या वस्तू देखील या रोगाच्या वाहकाचे काम करतात.

म्हणून, खालील प्रॉडक्टस वापरतांना सावधगिरी बाळगली पाहिजेः

  • अंडी.
  • मांस.
  • पोल्ट्री प्रॉडक्टस.
  • प्रक्रिया न केलेले दूध.
  • सरपटणारे प्राणी.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

संसर्गाचे मूळ कारण स्थापित करण्यासाठी रक्ताच्या किंवा मलच्या नमुन्याची चाचणीद्वारे केली जाते.  म्हणजे रक्तातील टायफॉइड बॅक्टेरियाविरूद्ध मल किंवा अँटीबॉडीतील बॅक्टेरियाची उपस्थिती बघितली जाते. सॅल्मोनेलॉसिसचे निदान करण्यासाठी अतिरिक्त चाचण्या केल्या जाऊ शकतात.

बऱ्याच बाबतीत, संसर्ग नैसर्गिक रोगप्रतिकार प्रणालीद्वारे केला जातो. परंतु, गंभीर प्रकरणांमध्ये, गंभीर लक्षणांवर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक उपचारांसह रुग्णालयात इंट्राव्हेनस रीहायड्रेशनसह आवश्यक असू शकते.

संसंर्ग प्रतिबंध करण्यासाठी, खालील गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत:

  • अति धोकादायक अन्न किंवा कच्चे पोल्ट्री प्रॉडक्टस टाळा.
  • अन्नपदार्थ फ्रिजमध्ये जंतुविरहित करून साठवा.
  • स्वयंपाक करण्याआधी आणि खाण्याआधी हात धुवा.
  • शिजवलेले आणि कच्चे खाद्यपदार्थ वेगळे ठेवा.
  • पाककला प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पृष्ठभाग आणि काउंटर स्वच्छ करा.
  • कोणत्याही प्राण्याला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवा.
  • पाळीव प्राण्यांची स्वच्छता आणि आरोग्याची  काळजी घ्या.



संदर्भ

  1. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Salmonella
  2. Department for Health and Wellbeing. Salmonella infection - including symptoms, treatment and prevention. Government of South Australia [Internet]
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Salmonella Infections
  4. Food Safety [Internet] U.S. Department of Health & Human Services. Salmonella.
  5. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Salmonella (non-typhoidal).