टोन्सिलायटिस - Tonsillitis in Marathi

Dr. Abhishek Gupta

May 02, 2019

July 31, 2020

टोन्सिलायटिस
टोन्सिलायटिस

टोन्सिलायटिस काय आहे?

टोन्सिलायटिस हे टॉन्सील्स (घश्याच्या दोन्ही बाजूंच्या ग्रंथी) चा संसर्गा चे चिन्ह आहे. टॉन्सील्स लिम्फॅटिक प्रणालीचा एक भाग आहेत, जे आपली प्रतिकारशक्ती कायम ठेवण्यासाठी जबाबदार असतात. या ग्रंथींचा दाह टोन्सिलायटिसचे लक्षण आहे. हा संसर्ग सामान्यपणे मुलांमध्ये दिसून येत असला तरी प्रौढांमध्येही तो आढळून येतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

टोन्सिलायटिसचे लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:

लक्षणे बऱ्याचदा वेदनादायक असतात आणि त्यामुळे खूप अस्वस्थ वाटू शकते. लहान मुलांना या त्रासाबरोबरच मळमळ आणि पोटदुखीचा देखील त्रास होऊ शकतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

टोन्सिलायटिस एक व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्ग असून बहुतेकवेळा सर्दीनंतर होतो. म्हणूनच, सामान्य सर्दीचे लक्षण जसे की नाक वाहणे, खोकला आणि ताप, हळूहळू वाढतात आणि अधिक गंभीर होऊन टोन्सिलायटिसचे स्वरूपात घेऊ शकतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

टोन्सिलायटिस विरूद्ध लसीकरण करणे शक्य नाही आणि म्हणूनच ते सहज प्रतिबंधित केले जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर टोन्सिलायटिसचा त्रास होऊ शकतो.

टोन्सिलायटिसचे निदान लक्षणे तपासण्याद्वारे आणि घश्याच्या स्वाबचे प्रयोगशाळेत विश्लेषणा करून परोपकारी जीवांची ओळखून करता येते.

टोन्सिलायटिसचे कारण बॅक्टेरिया असल्यास, अँटीबायोटिक्स घेणे ही सर्वात प्रभावी उपचार पद्धती आहे.पण,व्हायरसमुळे टोन्सिलायटिस झाल्यास औषधे कदाचित कारणास प्रतिबंध करण्यास मदत करू शकत नाही. लक्षणे कमी करण्यासाठी खालील उपाय केले जाऊ शकतात:

  • ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल घ्यावी.
  • भरपूर विश्रांती घ्यावी.
  • भरपूर द्रव पदार्थ प्यावे.
  • पचनास हलके पदार्थ खावे.
  • मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या.
  • वेदना मुक्त होण्यासाठी औषधोपचार घ्यावा  (केवळ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर).



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Tonsillitis.
  2. Healthdirect Australia. Tonsillitis. Australian government: Department of Health
  3. Victorian Agency for Health: Government of Victoria [Internet]; Tonsillitis.
  4. InformedHealth.org [Internet]. Cologne, Germany: Institute for Quality and Efficiency in Health Care (IQWiG); 2006-. Tonsillitis: Overview. 2013 Mar 27 [Updated 2019 Jan 17].
  5. Government of Western Australia Child and Adolescent Health Service [Internet]; Tonsillitis.

टोन्सिलायटिस साठी औषधे

Medicines listed below are available for टोन्सिलायटिस. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.