myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

व्हेंट्रीक्युलर टॅकीकार्डिया म्हणजे काय?

व्हेंट्रीक्युलर टॅकीकार्डिया (व्हीटी) म्हणजे वेगाने पडणारे हृदयाचे ठोके (एका वेळेत 3 अनियमित ठोक्यांसह एका मिनिटात 100 ठोके) जे हृदयाच्या (व्हेंट्रीकल्स) खालच्या चेम्बर्स मध्ये सुरु होतात.गंभीर स्वरूपातील व्ही टी चा जर त्वरित उपचार केला नाही तर व्हेंट्रीक्युलर फिब्रिलेशन सारखी जीवन धोक्यात टाकणारी परिस्थिती उद्भवू शकते आणि त्याने मृत्यू देखील होऊ शकतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

व्हीटी ची लक्षणे एकाएकी सुरु किंवा बंद होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये कोणतेही लक्षण निदर्शनास येत नाही. पुढील घटनांच्या वेळी व्हीटी चे अतिसामान्य लक्षणे पहायला मिळतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

व्हीटी ला कारणीभूत असलेले विविध घटक व परिस्थिती पुढीलप्रमाणे आहेत:

आनुवंशिक हृदय तालात पुढील समस्यां दिसून येतात:

 • दीर्घ क्यूटी सिन्ड्रोम.
 • ब्रुगाडा सिन्ड्रोम.
 • कार्डीओमायोपथी.
 • हायपरट्रोफिक.
 • वाढलेले.            
 • हृदय निकामी होणे.      
 • हृदयाची शस्त्रक्रिया.
 • वॅलवुलर हृदयरोग.
 • व्हेंट्रीकल्स च्या स्नायूंमध्ये घट्ट मेद असणे (सामान्यतः हृदयविकाराच्या झटक्यांनंतर).

इतर हृदयाशी संबंधित नसलेले कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

खालील औषधोपचार जसे की:

 • अँटी अऱ्हिथमिक औषधे (जी अनियमित हृदयाच्या ठोक्यांसाठी वापरली जातात).
 • नॉन प्रिस्क्रिप्शन डिकॉंजेस्टण्ट्स.
 • नैसर्गिक उपाय व आहाराच्या गोळ्या.
 • कोकेन व इतर उत्तेजित करणारे पदार्थ.
 • रक्ताच्या रसनशास्त्रातील बदल ज्यामध्ये:
 • कमी प्रमाणात पोटॅशियम.
 • ॲसिड बेस बॅलन्स मध्ये बदल.
 • ऑक्सिजन ची कमतरता.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर शारीरिक तपासणीदरम्यान लक्षणांचा संपूर्ण इतिहास घेतात आणि नाडी व रक्तदाब तपासतात. डॉक्टर पुढील चाचण्याही करण्याचा सल्ला देतात:

 • रक्तातील पी एच, ऑक्सिजनचे प्रमाण आणि रक्ताचे रसायनशास्त्र तपासण्यासाठी रक्त चाचणी.
 • छातीचा एक्स-रे.
 • इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम (ईसीजी) किंवा हॉल्टर देखरेख (ज्यात हृदयाच्या ठोक्यांची 24-48 तास देखरेख आवश्यक असते).
 • इंट्राकार्डियाक इलेक्ट्रॉफीशिओलॉजी स्टडी (इ पी एस).
 • लूप रेकॉर्डर किंवा ताल रेकॉर्ड करण्यासाठी यंत्रणा.

व्ही टी चे व्यवस्थापन हे हृदयाची विकृती आणि निदर्शनास येण्याऱ्या लक्षणांवर अवलंबून असते आणि त्यामध्ये:

दीर्घ काळ चालणारे उपचार असतात ज्यामध्ये आजाराच्या काळात वाहिन्यांमार्फत किंवा पोटातून काही औषधोपचार केले जातात त्यामध्ये खालील समाविष्ट आहेत :

 • लिडोकेन.
 • प्रोकेनामाईड.      
 • सॉटालोल.
 • अमिओड्रोन.

घटनांच्या वेळी उपचारांमध्ये पुढील उपायांचा समावेश आहे:

 • कार्डीओपल्मनरी रिससायटेशन (सीपीआर).
 • कार्डीओव्हर्जन (विद्युत झटके).
 • एब्लेशन - ज्यामध्ये असामान्य हृदय ठोक्यांना कारणीभूत असलेल्या उतींना निकामी केले जाते.
 • अन इम्प्लांटेबल कार्डीओव्हर्टर डिफिब्रिलेटर (आयसीडी): एक प्रत्यारोपित यंत्र जे वेगाने होणाऱ्या व जीवनास धोकादायक असणाऱ्या हृदयाच्या ठोक्यांस शोधते आणि विद्युत झटक्यांद्वारे ठोके पुन्हा सामान्य करण्यासाठी हृदयाला सूचित करते.


 

 1. व्हेंट्रीक्युलर टॅकीकार्डिया साठी औषधे

व्हेंट्रीक्युलर टॅकीकार्डिया साठी औषधे

व्हेंट्रीक्युलर टॅकीकार्डिया के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Xylo(Astra)Xylo 2% Infusion36.22
XylocaineXylocaine 1%W/V Injection34.5
Xylocaine HeavyXylocaine Heavy 5% Injection4.5
XylocardXylocard 2% Injection43.0
XyloxXylox 0.2% Gel37.17
AlocaineAlocaine Injection18.0
LcaineLcaine Injection30.0
NircaineNircaine Injection80.92
UnicainUnicain 2% Injection14.5
Wocaine AWocaine A Injection583.31
XylonumbXylonumb 2% Injection26.0
XynovaXynova 2% Gel39.65
ZelcaineZelcaine Injection16.58
Quik KoolQuik Kool Gel65.0
Ora FastOra Fast Cream40.0
Orex LoOrex Lo Gel58.3
TricozolTricozol Ear Drop50.5
Tympalin CTympalin C Drops45.0
PradilPradil 150 Mg Tablet216.6

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...