एंजियोएडिमा - Angioedema in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 27, 2018

March 06, 2020

एंजियोएडिमा
एंजियोएडिमा

एंजियोइडीमा काय आहे?

एंजियोइडीमा ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये त्वचेवर किंवा त्वचेखाली सूज येते. हे औषधे, अन्न, परागकण, पर्यावरणीय विषारी पदार्थ यांच्या संपर्कात आल्यामुळे होते. यामुळे रक्तवाहिन्यांमधून द्रव बाहेर पडुन तिथे सुज येण्याची शक्यता वाढते.

एंजियोइडीमाचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

यात ओठ, हात, पाय, जीभ आणि डोळ्याच्या आसपास सूज येते. कधीकधी, युटिकारिया किंवा हाइव्ह नावाचे खरुज किंवा वर आलेली रॅश दिसून येते. वेदना आणि हलके खाजवणे, लालसरपणा, त्या भागात उबदारपणा ही इतर लक्षणे सामान्यत: पाहिली जातात. श्वसनमार्गामध्ये एडेमा किंवा सूज येणे श्वासोच्छवास अडथळ्याचे कारण बनते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये सूज आल्यामुळे मळमळ, उलट्या, अतिसार  किंवा वेदना होतात.

याची प्रमुख कारणे काय आहेत?

एंजियोइडीमाचे अचूक कारण अज्ञात आहे. औषध, कीटकाचा चावा,कच्चे रबरी, पाळीव प्राणी, किंवा यासारख्या सर्व ॲर्लर्जेनवर शरिराच्या प्रतिक्रियेमुळे हे सामान्यतः ट्रिगर जाते

काही औषधांमुळे सामान्यतः एडीमा होतो. यामध्ये अँजियोटेंसीन ल परिवर्तित करणारे एंझाइम इनहिबिटर्स, नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लॅमेटरी औषधे आणि अँजियोटेंसेन रिसेप्टर अवरोधकांचा समावेश आहे

काही लोकांना एंजियोइडीमा अनुवांशिक बदलांमुळे होऊ शकतो.

काही मूलभूत वैद्यकीय विकार जसे की संसर्ग किंवा ल्युकेमिया मुळे देखील एंजियोइडीमा होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

सुरुवातीला, डॉक्टर लक्षणांच्या आधारावर आपले शारीरिक परीक्षण करतील. ते प्रभावित क्षेत्र तपासून आणि आपल्याला वैद्यकीय इतिहासाबद्दल किंवा कोणत्याही ॲलर्जी बद्दल विचारू शकतात. हे कारण ठरविण्यात मदत करतात. त्वचा किंवा रक्त  यांच्या ॲलर्जींसाठी डॉक्टर काही चाचण्या करू शकतात. सी 1 एस्टरिस इनहिबिटरसाठी विशेषतः रक्त परीक्षण केले जाते. या पदार्थाची निम्न पातळी सूचित करते की ही समस्या अनुवांशिकतेमुळे झाली आहे. परीक्षांचे असामान्य परिणाम, जसे पूरक C2 किंवा C4, अंतर्भूत स्थितीमुळे असू शकतात.

एंजियोइडीमाच्या कारणांनुसार डॉक्टर औषधे लिहून देतात. कधीकधी, या स्थितीत औषधांची गरज नसते आणि पिडीत स्वत: च बरे होतात. पण, गंभीर प्रकरणात विशिष्ट वैद्यकीय उपचार आवश्यक आहे. सूज, खोकला आणि वेदना कमी करणे हा या उपचाराचा मुख्य हेतू असतो.

जर एंजियोइडीमा ॲलर्जींमुळे झाला असेल, ॲलर्जीचा ट्रिगर ओळखून तःयापासून बचाव करणे पुरेसे आहे. अशा परिस्थितीत अँटी-हिस्टॅमिनिक आणि स्टेरॉइडल औषधे वापरली जाऊ शकतात.

जर काही औषधे वापरल्याने एंजियोइडीमा झाला असेल तर आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून आणि औषधोपचार करुन औषध बदलुन घेतले जातात.

आनुवांशिक एंजियोइडीमाचा उपचार केला जाऊ शकत नाही, परंतु औषधे वापरून लक्षणांचा उपचार केलाजाऊ शकतो ज्यामुळे सी 1 एस्टरिस अवरोधक ची पातळी वाढण्यास मदत मिळते.संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Treatment - Angioedema
  2. MSDmannual consumer version [internet].Angioedema. Merck Sharp & Dohme Corp. Merck & Co., Inc., Kenilworth, NJ, USA
  3. Australasian Society of Clinical Immunology and Allergy. Angioedema. Australia; [internet]
  4. American Academy of Family Physicians. Urticaria and Angioedema: A Practical Approach. Am Fam Physician. 2004 Mar 1;69(5):1123-1129.
  5. Allen P Kaplan. Angioedema. World Allergy Organ J. 2008 Jun; 1(6): 103–113. PMID: 23282406