myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

अँथ्रॅक्‍स - Anthrax in Marathi

कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो
अँथ्रॅक्‍स
सुनिए कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो

अँथ्रॅक्‍स काय आहे?

अँथ्रॅक्‍स हा एक संक्रामक रोग आहे जो बॅसिलस अँथ्रासिस बॅक्टेरिया (जिवाणूं) मुळे होतो. हा जिवाणू मनुष्यांऐवजी सामान्यतः प्राण्यांमध्ये आढळतो. हा बिजाणूच्या स्वरूपात सुप्तावस्थेत असतो आणि अशा अवस्थेत अनेक वर्ष जगू शकतो. अनुकूल परिस्थितीत बिजाणू अंकुरीत होतात आणि अनेक पटीने वाढतात. हे मानवी शरीरात संक्रमित होऊ शकतात आणि यात सक्रिय होतात आणि अनेक पटीने वाढतात आणि पसरतात आणि रोग निर्माण करणारे टॉक्सिन उत्पन्न करतात. अँथ्रॅक्‍सचे नाव ग्रीक शब्दावरून आले आहे ज्याचा अर्थ कोळसा होतो. अँथ्रॅक्समुळे  नैसर्गिकरित्या त्वचेवर गडद काळे स्पॉट्स येतात, यावरून याचे नाव पडले आहे.

2001 मध्ये दहशतवाद्यांनी अँथ्रॅक्स पसरवण्यासाठी या तंत्राचा वापर केला होता. अँथ्रॅक्सचा हा जैविक दहशतवादी हल्ला चिंतेचे एक कारण आहे आणि भविष्यात अशा हल्ल्याद्वारे होणाऱ्या  रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वैज्ञानिक कार्यरत आहेत.

अँथ्रॅक्सची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

अँथ्रॅक्‍सच्या प्रकारावर त्याची लक्षणे अवलंबून असतात.

क्युटेनियस अँथ्रॅक्‍स जेव्हा बिजाणू,शरीराला कापले किंवा जखम झाली तर, त्या माध्यमातून मानवी शरीरात प्रवेश करतात आणि त्याचे रूपांतर कालांतराने एक खाजवणाऱ्या, काळ्या, वेदनादायक टेंगूळामध्ये होते. हात, डोके, मान आणि चेहऱ्यावर असे टेंगूळ दिसू शकतात. काही लोकांना डोकेदुखी, मळमळ, उलट्या, स्नायूचा त्रास आणि ताप येऊ शकतो.

गॅस्ट्रोइंटेस्टीनल अँथ्रॅक्‍स प्रभावित प्राणाच्या मांसाच्या सेवनामुळे होऊ शकते. या लक्षणांमध्ये अन्नाच्या विषबाधे सारखे  ताप व उलट्या होऊ शकतात, पण गंभीर स्वरूपात ओटीपोटात वेदना, रक्ताच्या उलट्या आणि सतत अतिसार होऊ शकतात.

श्वासाद्वारे बीयांनी शरीरात केलेल्या प्रवेशामुळे झालेला अँथ्रॅक्स सर्वात तीव्र असतो. प्रारंभिक लक्षणं सर्दी सारखी असतात, ज्यात ताप, खोकला, थकवा, शरीरात वेदना आणि डोकेदुखी यांचा समावेश असतो, परंतु कालांतराने श्वासोच्छवासाच्या समस्या आणि झटके येऊ शकतात.

त्याची मुख्य कारणं  काय आहेत?

मोठ्या रॉडच्या-आकाराच्या बॅक्टेरियाचा विषाणू, बॅसिलस अँथ्रासिस, हा संक्रमणाचे कारण आहे. हा जीवाणू बरेच वर्ष मातीत बिजाणू म्हणून राहतो. हे बिजाणू नष्ट होत नाहीत. सहसा ते मानवापेक्षा तिथे चरणाऱ्या प्राण्यांना अधिक प्रमाणात संसर्गित करतात. माणसात बिजाणूयुक्त हवेच्या श्वासोच्छवासाद्वारे, एखाद्या संसर्गग्रस्त प्राण्याचे मांस खाण्याद्वारे किंवा त्वचेवर कापलेल्या किंवा जखमेच्या ठिकाणी संसर्ग होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर त्या माणसाचा वैद्यकीय इतिहास आणि व्यवसायाची तपशीलवार चौकशी करतात. लक्षणांच्या आधारावर, डॉक्टर संक्रमित त्वचेचा नमुना, घश्याचा शिर किंवा कफ एकत्र करुन निदान करू शकतात आणि बॅक्टेरिया किंवा अँटीबॉडीजच्या अस्तित्वासाठी थेट विश्लेषण करून निदानाची पुष्टी करू शकतात. छातीच्या एक्स-रेद्वारे देखील निदानांची पुष्टी करता येते, ज्यात छातीतील विस्तार किंवा फुफ्फुसांच्या आवरणामधील द्रवपदार्थ दिसून येतो.

सर्व प्रकारचे अँथ्रॅक्‍सचे अँटिबायोटिक्सद्वारे उपचार केले जाऊ शकतात आणि बरे वाटू शकते; इतर औषधांसह बॅक्टेरियाद्वारे उत्पादित विषारी विषयांवर अँटीटॉक्सिन्सचा वापर केला पाहिजे. कधीकधी इंट्राव्हेनस अँटिबायोटिक्स देखील वापरली जातात. अँटिबायोटिक्स निर्धारित असले पाहिजे आणि डॉक्टरांनी उपचार केले पाहिजे. ज्या लोकांना अँथ्रॅक्‍सची लागण झाली असेल त्यांना 60 दिवस अँटीबायोटिक्स दिले जाऊ शकतात. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अँटिबायोटिक्स डॉक्सिसीक्लिन, सिप्रोफ्लोक्सासिन, लेव्होफ्लोक्सासिन आणि पॅरेंटरल प्रोकेन पेनिसिलिन जी यांना अँथ्रॅक्ससाठी शिफारस केली जाते.

या तीन डोजसह, रोगाचे निदान होताच लवकरत लवकर लसीकरण करून घेतले पाहिजे.  लस उपलब्ध आहेत पण सामान्य लोकांसाठी नाही आणि हेल्थकेअर प्रॅक्टिशनरकडून घेणे आवश्यक आहे.

अँथ्रॅक्‍स हा एक लक्षात येण्यासारखा रोग आहे; प्रकरणांच्या निदाना नंतर आरोग्य एजन्सींना सूचित करावे. बी. अँथ्रॅसिस विरूद्ध सक्रिय इतर अँटीबायोटिक्स डॉक्सिसीक्लिन, पेनिसिलिन, अॅमोक्सीसिलिन, अॅम्पिसिलिन, सिप्रोफ्लॉक्सासिन, गॅटीफ्लोक्सासिन, क्लोरोम्फेनिकोल इ.आहेत.

 संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Anthrax
  2. Melissa Conrad Stöppler. Anthrax. eMedicineHealth. [health]
  3. orld Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Guidance on anthrax: frequently asked questions
  4. National Institute of Health and Family Welfare. Anthrax. Health and Family Welfare. [internet]
  5. U.S. Department of Health & Human Services. A History of Anthrax. Centers for Disease Control and Prevention. [internet]

अँथ्रॅक्‍स चे डॉक्टर

Dr. Arun R Dr. Arun R Infectious Disease
5 वर्षों का अनुभव
Dr. Neha Gupta Dr. Neha Gupta Infectious Disease
16 वर्षों का अनुभव
Dr. Lalit Shishara Dr. Lalit Shishara Infectious Disease
8 वर्षों का अनुभव
Dr. Alok Mishra Dr. Alok Mishra Infectious Disease
5 वर्षों का अनुभव
डॉक्टरांचा सल्ला घ्या

अँथ्रॅक्‍स साठी औषधे

अँथ्रॅक्‍स के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

दवा का नाम

कीमत

₹90.3

20% छूट + 5% कैशबैक


₹96.36

20% छूट + 5% कैशबैक


₹90.29

20% छूट + 5% कैशबैक


₹137.83

20% छूट + 5% कैशबैक


₹46.9

20% छूट + 5% कैशबैक


₹29.65

20% छूट + 5% कैशबैक


₹91.0

20% छूट + 5% कैशबैक


₹16.23

20% छूट + 5% कैशबैक


₹182.7

20% छूट + 5% कैशबैक


₹91.7

20% छूट + 5% कैशबैक


Showing 1 to 10 of 986 entries