अपेंडिक्स - Appendicitis in Marathi

अपेंडिक्स
अपेंडिक्स

सारांश

अपेंडिक्स हासिकमला (सिकम) चिटकलेला एक सडपातळ नळी-सदृश्य अवयव आहे. सिकम मोठ्या आतड्यांचा एक भाग आहे. तो पोटाच्या (छाती आणि ओटीपोटाच्या मधला भाग) खालच्या-उजव्या भागात असतो. मानवी शरीरात अपेंडिक्स काय कार्य करते हे अजूनही माहिती नसले तरी प्राण्यांमध्ये त्याचा उपयोग पचनासाठी होतो. अपेन्डीसायटीस आणीबाणीची अशी स्थिती आहे ज्यात अपेंडिक्सला दाह होतो आणि पोटाच्या उजव्या-खालच्या भागात तीव्र वेदना होतात. याव्यतिरिक्त अपेन्डीसायटीस झालेले लोक उलटी, ताप, आणि पाठीच्या खालच्या भागातील वेदना अशी इतरही लक्षणे अनुभवतात. निदानाच्या निष्कर्षाप्रत पोचायला डॉक्टर चिन्हे आणि लक्षणांना शोधतात, वैद्यकीय चाचण्या करवून घेतात, किंवा गरज पडल्यास अल्ट्रासाउंड, प्रयोगशाळेतील चाचण्या किंवा सिटी स्कॅन करायचा देखील सल्ला देतात. अपेन्डीक्टोमी किंवा अपेन्डायसेक्टोमी शल्यक्रीयेच्या त्या पद्धती आहे ज्यात पोटाच्या खालील भागाला चिरा देऊन अपेंडिक्स काढला जातो. काही केसेसमधे, प्रतिजैविके उपचार पद्धतीदेखील वापरल्या जाते. जेव्हा अपेंडिक्सची बारीक नळी अन्न किंवा शौचाने बंद होते, तेव्हा ती फुटून, व त्यात असलेले जंतू पसरून, भोवतालच्या उदरातील पेशींमध्ये संक्रमण होते. अशा प्रकरणांत हे संक्रमण वेळेच्या आत नियंत्रणात आणने आवश्यक आहे.

Appendicitis symptoms

उदराच्या खालच्या उजव्या भागातील वेदना या अपेन्डीसायटीसशी संबंधित आहेत. तरीही, तुम्हाला त्याच्याशी संबंधित इतरही लक्षणे जाणवू शकतात, जसे:

अपेन्डीसायटीसची लक्षणे चालण्याने, पोटाचा खालचा भाग दाबल्याने किंवा खोकलल्याने आणखी तीव्र होतात.

Appendicitis treatment

एकदा अपेन्डीसायटीसचे निदान झाले कि शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. तात्काळ शस्त्रक्रिया अपेंडिक्सला अधिक छिद्रे पडण्यापासून वाचवते. अपेंडिक्स काढायच्या शल्यक्रीयेला अपेन्डीक्टोमी किंवा अपेन्डायसेक्टोमी ह्या संज्ञा आहेत.

शस्त्रक्रियेने उपचार

अपेन्डीसायटीसचे प्रकरण, पर्यायांची उपलब्धता, आणि व्यक्तिगत निवडीनुसार अपेन्डीक्टोमीच्या  खालीलपैकी उपचारपद्धती आहेत:

  • लेपरोस्कोपिक उपचार
    रोगातून लवकर मुक्तता होत असल्यामुये ही सर्वात अधिक निवडली जाणारी पद्धत आहे. या शस्त्रक्रियेत कॅमेरा जोडलेल्या विशिष्ट उपकरणांना आणि लवचिक नळीला उपयोगात आणतात. पोटाला छोटे चीर करून अपेंडिक्स या उपकरणांद्वारे शोधला व काढला जातो.
  • लेपरोटोमी
    या शल्याक्रियेत डॉक्टर एकच चीर देऊन अपेंडिक्स काढतात. हा चिरा पोटाच्या खालील-उजव्या भागात देतात. हि प्रक्रिया पेरीटोनायटीस – उदरातील पोकळीच्या आतील रेषांचे संसर्गहीझाला असल्यास निवडली जाते.
  • खुली शस्त्रक्रिया
    लेपरोस्कोपी ऐवजी खुली शस्त्रक्रिया करतात जेव्हा:
    • अपेन्डीसायटीस असलेल्या व्यक्तीच्या पोटाच्या आधीही शल्यक्रिया झालेलीअसेल.
    • अपेंडिक्स मास (गोळा) अपेंडिक्समधे विकसित झाला असल्यास
    • अपेंडिक्स फुटलेले असल्यास
  • प्रतिजैविके उपचारपद्धती
    अपेंडिक्सवर होत असलेल्या शस्त्रक्रियेची तुळना प्रतिजैविकांच्या मदतीने केलेल्या उपचारांशी केली असता संशोधन असे सिद्ध करते की70% अपेंडिक्सचे प्रकरण प्रतीजैविकांच्या मदतीने शल्यक्रिया न करता बरे होतात. प्रतिजैविके सामान्यतः त्या लोकांना दिली जातात, जे शस्त्रक्रियेचा त्रास सहन करू शकत नाहीत. आयव्ही (IV – इंट्राव्हेनस - आंतर्नलिका) प्रतिजैविके शक्यतो सेफालोस्पोरीन,अपेन्डीक्टोमीच्या आधी दिली जातात. जर अपेंडिक्स फुटून उघडे पडले (परफोरेटेड अपेन्डीसायटीस), तर पू तात्काळ वाहून जातो आणि रुग्णाच्या पांढऱ्या रक्तपेशी, आणि ताप सामान्य होईपर्यंत त्याला प्रतिजैविके दिली जातात.

जीवनशैलीचे व्यवस्थापन

उपचार करून घरी पाठविल्यानंतर खालील सूचना तुम्हाला आजारातून लवकर बरे होण्यास मदत करतील:

  • तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही प्रतिजैविक घेऊ नका.
  • तुम्हाला अजूनही ताप असेल तर दर दोन तासांनी ताप मोजा. डॉक्टरकडे दिलेल्या पुढल्या भेटीत त्यांना सांगा.
  • वेदनाशामक घेऊ नका. वेदनेसाठी औषधी घेतल्यास अपेंडिक्स बरा होतो आहे की चिघळतो आहेहेसमजणे कठीण होते.
  • दुसऱ्या दिवशी कुठल्या शारीरिक तपासण्यांना जाताना काही खाऊ किंवा पिऊ नका.
  • लॅक्सेटीव किंवा एनिमा वापरू नका; त्याने अपेंडिक्सच्या तुटण्याचा धोका संभवतो.
  • भरपूर आराम आणि झोप घ्या. अपेन्डीक्टोमीतून लवकर बरे होण्यास मदत होते.
  • तुमच्या पोटांच्या स्नायूंवर ताण येऊ देऊ नका आणि भारी वस्तू उचलू नका.
  • तुमच्या आहारात भरपूर तंतुमय पदार्थ घ्या. हे पदार्थ बद्धकोष्ठता दूर करतात आणि मलनिःसारणा आरामात होण्यास मदत करतात.
  • रोज भरपूर पेय घ्या

खालील वेळी तुमच्या डॉक्टरला तात्काळ संपर्क करा:

  • तुमच्या लघवीतून किंवा उलटीतून रक्त येत असल्यास
  • बॉवेल रिकामे करण्याचा त्रास बराच वेळ होत असल्यास
  • सतत उलट्या होत असल्यास
  • गळाल्यासारखे होत असल्यास
  • पोटातील वेदनांची तीव्रता वाढीस असल्यास

What is appendicitis

अपेन्डीसायटीस वैद्यकीय आणीबाणीची ती स्थिती आहे जी कुठल्याही वयात येऊ शकते परंतु 10 ते 30 वयोगटातील लोकांमध्ये ती सामान्यतः आढळून येते. वेदनादायक सूज किंवा दाहकता त्या अपेंडिक्सची असते जे बोट-सदृश खिशाप्रमाणे मोठ्या आतड्यांतून वाढलेले असते. अपेंडिक्सचे तोंड छोटे असते, आणि अन्न किंवा शौचाचा भाग त्यात जमा होऊन, कधीकधी अडथळे तयार होतात. या अडथळ्यांमुळे सूक्ष्मजीवांचे संसर्ग विकसित होतात. या पायरीवर जर अपेंडिक्स फुटले तर हे सूक्ष्मजीवांचे संसर्ग पोटाच्या पोकळीत पसरते आणि वेळेत उपचार न केल्यास जीवघेणे ठरते. जेव्हा अपेंडिक्समधे दाह होतो तेव्हा तुम्हाला उदरात अधून मधून होणाऱ्या वेदना (ज्या येतात आणि जातात) जाणवतात. क्रमाक्रमाने वेदना तीव्र आणि सततच्या होत जातात. त्या अपेंडिक्स असलेल्या उजव्या-खालच्या भागात स्थिर होतात. चालण्याने, खोकलल्याने, किंवा, पोटाला दाबल्याने वेदना वाढतात. बहुतांशीताप, भूक न लागणे, आणि अतिसार अपेन्डीसायटीसशी संबंधित असतात. 



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Appendicitis
  2. National Health Service [Internet]. UK; Overview - Appendicitis
  3. Hanumant P Lohar, Murtuza Ali Asger Calcuttawala, Dakshyani Satish Nirhale, Virendra S Athavale, Manish Malhotra, Nishant Priyadarshi. Epidemiological aspects of appendicitis in a rural setup. 2014; volume 7; D. Y. Patil Medical College, Hospital and Research Center; Pune, Maharashtra.
  4. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Appendicitis
  5. Margenthaler JA, Longo WE, Virgo KS, Johnson FE, Oprian CA, Henderson WG, Daley J, Khuri SF. Risk factors for adverse outcomes after the surgical treatment of appendicitis in adults.. Ann Surg. 2003 Jul;238(1):59-66. PMID: 12832966
  6. Stanford Health Care [Internet]. Stanford Medicine, Stanford University; Appendicitis
  7. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Symptoms & Causes of Appendicitis
  8. Cleveland Clinic. [Internet]. Cleveland, Ohio. Appendicitis: Management and Treatment
  9. MSDmannual consumer version [internet].Appendicitis. Merck Sharp & Dohme Corp. Merck & Co., Inc., Kenilworth, NJ, USA
  10. National Health Service [Internet]. UK; Overview - Abscess

अपेंडिक्स साठी औषधे

Medicines listed below are available for अपेंडिक्स. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.