myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

ग्लोमेरुलोनेफ्रायटिस काय आहे?

ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हा एक प्रकारचा किडनीचा रोग आहे जे ग्लोमेरुली (किडनीतील छोटे फिल्टर्स जे कचरा आणि रक्तातून द्रव फिल्टर करतात) यांना नुकसान पोहोचवतो. हे सामान्यतः निरोगी किडनीच्या टिशुंवर हल्ला करणाऱ्या रोगप्रतिकार संस्थेमुळे होते.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ग्लोमेरुलोनेफ्रायटिसशी निगडित चिन्हे आणि लक्षणे, खलील प्रमाणे आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

ग्लोमेरुलोनेफ्रायटिसची मुख्य कारणं खलील प्रमाणे आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

 • लक्षणांचा योग्य इतिहास जाणून घेतल्यानंतर डॉक्टर कदाचित पुढील सल्ला देतील:
 • रक्त चाचणी
  • क्रियाटिनिनची पातळी, जी किडनी विकार असलेल्या व्यक्तींमध्ये जास्त असते.
  • एस्टीमेटेड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट (ईजीएफआर-eGFR), जे किडनी विकारांमध्ये कमी होते.
  • ऑटोइम्युन प्रतिक्रिया सक्रिय करणाऱ्या विविध पदार्थांकरिता अँटीबॉडीज.
 • मूत्र चाचणी: मूत्रामध्ये रक्त किंवा प्रथिनांची उपस्थिती तपासण्यासाठी.
 • अल्ट्रासाऊंड स्कॅनः जर किडनीत कोणतीही समस्या, किडनीचे आकार आणि अडथळे असेल तर, तपासण्या.
 • बायोप्सी: मायक्रोस्कोपखाली किडनीच्या टिश्युचे नमुने गोळा केले जातात आणि तपासले जातात.

ग्लोमेरुलोनेफ्रायटिसचे उपचार, रोगाची तीव्रता आणि लक्षणे यावर अवलंबून असतात. सौम्य प्रकरणात, कोणतेही उपचार आवश्यक नाहीत.

काही उपचार पद्धती खलील प्रमाणे आहेत:

 • आहारातील बदल: रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी भरपूर प्रमाणात मीठ आणि पोटॅशियम आणि द्रव पदार्थ असलेले अन्न आणि पेय टाळणे.
 • धूम्रपान सोडणे: धूम्रपान टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस होऊ शकतो आणि हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
 • औषधे, ज्यामध्ये हे असू शकते:
  • रक्त दाब कमी करणारे एजंट जसे की एंजियोटेंसीन रिसेप्टर ब्लॉकर्स (एआरबी-ARB), एंजियोटेंसीन-कन्वर्टिंग एंझाइम (एसीई-ACE) इनहिबिटर, डायरेक्टिक्स आणि इतर.
  • सूज कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती दडपण्यासाठी, कॉर्टिकोस्टिरॉईड्स (प्रेडनीसन) यांचा सल्ला देण्यात येतो.
  • प्रतिरक्षा प्रणालीमध्ये समस्या असल्यास, इम्यूनोसप्रेशंट्स जसे टेक्रोलिमस, सायक्लोस्पोरिन, अजिथीओप्राइन, रित्युसिमाब किंवा मायकोफेनॉलेट मोफेटिल निर्धारित केले जाऊ शकते.
  • सायक्लोफॉसफामाइड कमी डोसमध्ये देखील इम्यूनोसप्रेशंट्स म्हणून वापरली जाऊ शकते.
  • व्हायरल इन्फेक्शन असलेल्या लोकांमध्ये अँटीव्हायरल औषधे दिली जातात.
  • ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असलेल्या व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी सामान्यतः जास्त असल्याने कोलेस्टेरॉल-कमी करणाऱ्या औषधांचा सल्ला देण्यात येते.
 • गंभीर प्रकरणांमध्ये प्लाझ्मा एक्सचेंज केले जाऊ शकते.
 1. ग्लोमेरुलोनेफ्रायटिस साठी औषधे

ग्लोमेरुलोनेफ्रायटिस साठी औषधे

ग्लोमेरुलोनेफ्रायटिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Benzathine खरीदें
Pencom खरीदें

References

 1. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Glomerulonephritis.
 2. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Glomerulonephritis.
 3. National Kidney Foundation. [Internet]. New York, United States; What is Glomerulonephritis?.
 4. The American Kidney Fund. [Internet]. North Bethesda, Maryland, United States; Glomerulonephritis.
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Glomerulonephritis.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें