myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

इंटरस्टिशियल सिस्टिटिस काय आहे?

इंटरस्टिशियल सिस्टिटिस, याला ब्‍लॅडर पेन सिंड्रोम म्हणून देखील ओळखला जातो. ही मूत्राशयाची एक दीर्घकालीन दाहक स्थिती आहे. इंटरस्टिशियल सिस्टिटिसमुळे मूत्राशय क्षेत्रात वेदना होतात, त्रास होतो आणि दबाव येतो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या सिंड्रोमचे प्रमाण जास्त आहे. सूज आल्यामुळे आणि त्रास झाल्यामुळे मूत्राशय संवेदनशील होते. शिवाय, मूत्राशयाच्या भिंतीला सूज येऊ शकते किंवा रक्त जाऊ शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

लक्षणे सौम्य ते कमी असू शकतात. काही रुग्णांमध्ये, वैद्यकीय मदतविना लक्षण कमी होऊ शकतात आणि पूर्णपणे जाऊ शकतात.

 • मूत्राचे वाढलेले प्रमाण (अधिक वाचा: वारंवार लघवीचे कारण).
 • लघवी करण्याची घाई होणे.
 • लघवीची गळती, प्रत्येक वेळी कमी प्रमाणात मूत्र जाणे.
 • ओटीपोटात वेदना, महिलांमध्ये लैंगिक ॲक्टव्हिटी दरम्यान वेदना.
 • ओटीपोटाच्या खालच्या भागात, मांड्या, पाठीचा खालचा भाग, योनीत किंवा ओटीपोटात वेदना.
 • इंटरस्टिशियल सिस्टिटिसची लक्षणे हार्मोनल बदल, तणाव, मसालेदार पदार्थ आणि अल्कोहोल पिण्यामुळे वाढतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

इंटरस्टिशियल सिस्टिटिसचे अचूक कारण ज्ञात नाही. पण ते खालील वैद्यकीय परिस्थितीशी संबंधित असू शकतेः

 • ऑटिमोम्यून रोग जसे जळजळ आंत्र रोग, सिस्टेमिक ल्यूपस एरिथेमेटोसस आणि अटॉपिक ॲलर्जी.
 • रक्तवाहिन्याचा रोग, जसे रक्तवाहिन्यात होणारी दुखापत, रक्तवाहिन्यांचा क्षीणपणा.
 • लघवीत कॅल्शियम फॉस्फेटसारख्या असाधारण पदार्थांची उपस्थिती.
 • युरिया-स्प्लिटिंग बॅक्टेरियामुळे होणारे निदान न होणारा संसर्ग असू शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

इंटरस्टिशियल सिस्टिटिसचे निदान करण्यासाठी कोणतीही निश्चित चाचणी नाही. परंतु, निदान करण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातातः

 • मूत्राच्या नमुन्याचे विश्लेषण आणि कल्चर.
 • मूत्रमार्ग आणि मूत्राशयाची भिंत यांची बायोप्सी.
 • सिस्टोस्कोपी.

इंटरस्टिशियल सिस्टिटिस पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. मात्र, खालील उपचार लक्षणे कमी करू शकतात. ड्रग सोल्यूशनने मूत्राशयाची आतली बाजू धुवून काढणे.

 • मूत्राशय फुगवणे.
 • औषधोपचार.
 • आहार.
 • तणाव कमी करणे.
 • फिजिकल थेरपी.
 • विद्युत पद्धतीने तंत्रिका उत्तेजन.
 • मूत्राशयाचे प्रशिक्षण.
 • शस्त्रक्रिया.
 1. इंटरस्टिशियल सिस्टायसिस साठी औषधे

इंटरस्टिशियल सिस्टायसिस साठी औषधे

इंटरस्टिशियल सिस्टायसिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
ComforaComfora 100 Mg Capsule500.0
CystopenCystopen 100 Mg Tablet547.5
Dr. Reckeweg Uva Ursi QUva Ursi Mother Tincture Q265.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...