myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

रुबेला काय आहे?

रुबेला किंवा जर्मन गोवर हा रूबेला विषाणूमुळे होणारा संक्रामक रोग आहे. या रोगामुळे मुलांना ताप येतो आणि रॅश होतात. जर हा रोग गर्भवती महिलेला झाला तर गर्भपात होऊन गंभीर परिस्थिती ओढवू शकते, मृतबालक जन्मणे, मृत्यू किंवा जन्मजात रूबेला सिंड्रोम होऊ शकतो. त्याच्या संसर्गजन्य स्वभावामुळे, रुबेला शिंकण्यामुळे आणि खोकल्यामुळे सहजपणे पसरतो. संक्रमणाचा माणूस हा एकच स्रोत आहे. पण, एखाद्या व्यक्तीस व्हायरसने संसर्ग झाल्यास, रोगप्रतिकारक शक्ती अशा कोणत्याही संक्रमणास प्रतिबंधित करते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

रुबेला संक्रमणाची सामान्य लक्षणे खाली नमूद केली आहेत:

 • चेहऱ्यावर रॅश जी शरीराच्या इतर भागातही पसरते.
 • ताप.
 • सुजलेल्या ग्रंथी.
 • तरुण महिलांमध्ये सांधे दुखणे.

गंभीर प्रकरणांमध्ये, स्थिती या स्वरुपात गंभीर दिसून येते:

 • मासिक पाळीच्या समस्या.
 • संधिवात.
 • मेंदूचा संसर्ग.

मुलांमध्ये, खालील लक्षणे दिसून येतात:

विषाणू एका आठवड्यात शरीरात जलद गतीने पसरतात आणि दोन आठवड्यानंतर लक्षणे दिसू लागतात.

पहिल्या तिमाहीत गर्भवती महिलेसाठी रूबेला संसर्ग गंभीर आहे. याच्या संक्रमणाने जन्मजात रूबेला सिंड्रोम होतो आणि मुलांमधून हा व्हायरस जाण्यास जन्मानंतर एक वर्षाचा काळ  लागतो. त्याचप्रमाणे गर्भामध्ये खालील दोष दिसून येतात:

 • हृदयाची असामान्यता.
 • दृष्टी गमवणे.
 • स्प्लिन किंवा यकृताचे नुकसान.
 • बौद्धिक विकलांगता.

याची मुख्य कारणं काय आहेत?

इतर सर्व व्हायरल इन्फेक्शन्स प्रमाणे, रूबेला विषाणू, संसर्गग्रस्त खोकला आणि शिंकण्यामुळे पसरतो. याचा उष्मायन काळ बराच मोठा आहे आणि लक्षणे दिसण्यासाठी किमान 10 दिवस लागतात. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी, संक्रमण टाळण्यासाठी एअर मास्क सूचित केले जातात. विशेषतः मुले आणि गर्भवती महिला या संसर्गास अतिसंवेदनशील असतात आणि त्यांचे व्हायरस विरूद्ध लसीकरण करणे आवश्यक आहे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

रूबेला संसर्गाची लक्षणे व्हायरल रॅश सारखीच असतात. म्हणून, संसर्गाची उपस्थिती ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत विविध चाचण्या करण्यात येतात. व्हायरस कल्चर किंवा रक्त तपासणी रक्तप्रवाहात रूबेला अँटीबॉडीजची उपस्थिती जाणून घेण्यास केली जाते.

रुबेलासाठी काही विशिष्ट उपचार नाहीत आणि ते स्वतःचा मार्ग ठरवतात. लक्षणांचे व्यव्सस्थापन करण्यासाठी आणि गर्भवती महिलांच्या बाबतीत आपत्कालीन उपचारानंमध्ये याचा समावेश होतो - ताप कमी करण्यासाठी अँटीपायरेटिक्स, अँटी-हिस्टामाइन्स खाज कमी करण्यासाठी. गोवर, गालगुंड आणि रुबेला यांच्यापासून संरक्षणासाठी एमएमआर नामक एक संयुक्त लस सामान्यत: प्रतिबंधक धोरण म्हणून दिली जाते.

एमएमआर लस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे. रुबेला रोखणाऱ्या दोन लसी आहेत:

 • एमएमआर लस मुले आणि प्रौढांना रुबेला, गोवर आणि गालगुंडापासून संरक्षण देते.
 • एमएमआरव्ही लस मुलांना रुबेला, गोवर, गालगुंड आणि कांजण्यासाठी.


 

 1. रुबेला साठी औषधे

रुबेला साठी औषधे

रुबेला के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Mr-Vac VaccineMr Vac Injection90.47
R VacR Vac 1000 Ccid50 Injection78.8
Rubella VaccineRubella 1000 Ccid50 Vaccine71.65

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...