myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

बी1 जीवनसत्वाची (व्हिटॅमिन) कमतरता म्हणजे काय?

बी 1 जीवनसत्व म्हणजेच थायमीन, हे आपल्या शरीराचे कार्य योग्य पद्धतीने सुरु राहण्यासाठी आवश्यक असलेले महत्वाचे जीवनसत्व आहे. बी 1 जीवनसत्वाची कमतरता निरनिराळ्या परिस्थिती निर्माण करतात, त्यापैकी काही हानिकारक असू शकतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सामान्य लक्षणे

 • थायमीनच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा रोग होतो. बेरीबेरी चे दोन प्रकार आहेत  - ड्राय/ कोरडे आणि वेट/आर्द्र बेरीबेरी.
 • कोरड्या बेरीबेरीमध्ये मज्जारज्जूवर परिणाम होतो आणि रुग्णाला वेदना आणि थकव्यासोबत बधिरता आणि हातापायाला मुंग्या येतात.
 • हृदयाचे वाढते आकारमान, श्वासोच्छवासाची कमतरता, हातापायांना सूज आणि हृदयाची गती वाढणे ही आर्द्र बेरीबेरीची लक्षणे आहेत.

इतर लक्षणे

 • रुग्ण एनोरेक्सिक होऊ शकतो आणि त्याचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.
 • माणसाच्या मानसिक स्वास्थावरसुद्धा परिणाम होतो, आणि त्याला मानसिक गोंधळ आणि स्मृती कमी होणे  असे अनुभव येऊ शकतात.
 • मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये थायमीनमुळे वर्निक-कोसाकॉफ सिंड्रोम होतो ज्यामध्ये माणसाला समन्वायामध्ये कमतरता, स्नायूमध्ये अशक्तपणा, दुहेरी दृष्टी तसेच शरीराचा तोल जाणे असा त्रास होतो.

बी 1 जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मज्जारज्जूचे कायमस्वरूपी नुकसान होणे, कोमा मध्ये जाणे व हृदय बंद होणे असे कॉम्पिकेशन्स होऊ शकतात.

याची मुख्य कारणे काय आहेत?

 • अपुरे आहार सेवन किंवा अयोग्य पद्धतीने (पोषणमूल्यांचे) शोषण यांमुळे कोणत्याही पोषणद्रव्याची कमतरता निर्माण होते.

काही जोखीमेच्या गोष्टींमुळे एखादी व्यक्ती थायामीनच्या कमतरतेला बळी पडते.

 • मद्यपानामुळे थायमीन शरीरात कमी शोषला जातो त्यामुळे तो एक जोखीमेचा घटक आहे.
 • जे मूत्रपिंडाचे जुने रुग्ण आहेत आणि  जे डायुरेटीक्स घेत आहेत त्यांना थायमीनच्या कमतरतेचा जास्त धोका असतो.
 • आहारसंबंधी घटकसुद्धा जोखीम वाढवतात, जसकी क ज्या आहारात पांढरा भात हा मुख्य घटक असतो त्यापासून थायमीन खूपच कमी प्रमाणात मिळते.
 • कॅन्सर आणि एच. आय.व्ही. बाधित रुग्णांना बी 1 जीवनसत्वाच्या कमतरतेचा अधिक धोका असतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

बी 1 जीवनसत्वाच्या कमतरतेचे निदान लक्षणे, वैद्यकीय इतिहास आणि चाचण्या यावरून केले जाते.

 • रक्ताच्या सेल्स मध्ये थायमीन पायरोफॉसफेट ची पातळी तपासायला विशेष चाचण्या केल्या जातात.
 • निदानासाठी थायमीनचे शोषण आणि थायरॉईड च्या कामासाठी आवश्यक उत्प्रेरकाराची पातळी तपासायला चाचण्या केल्या जातात.

प्राथमिक उपचारामध्ये तोंडावाटे किंवा शिरेमध्ये इंजेक्शन देऊन थायामीन दिले जाते. याने लक्षणे लगेच कमी होऊ लागतात.

 • मज्जासंस्थेच्या तक्रारी दूर होण्यास जास्त कालावधी लागतो. उपचारामध्ये प्रामुख्याने व्यायाम आणि काही महिन्यांसाठी थायमीनचे ॲडमिनीस्ट्रेशन याचा समावेश होतो.
 • पोषकद्रव्याने परिपूर्ण असलेला, अतिशय समतोल आहार आणि थायमीनची पुरके (सप्लीमेंट्स) घेणे यामुळे परिस्थितीमध्ये सुधारणा होते. संपूर्ण धान्य, मटण, सोयाबीन (बीन्स) आणि दाणे (नट्स) हे थायमीनचे परिपूर्ण स्रोत आहेत.  
 1. व्हिटॅमिन बी 1 ची कमतरता साठी औषधे
 2. व्हिटॅमिन बी 1 ची कमतरता साठी डॉक्टर
Dr. B.P Yadav

Dr. B.P Yadav

एंडोक्राइन ग्रंथियों और होर्मोनेस सम्बन्धी विज्ञान

Dr. Vineet Saboo

Dr. Vineet Saboo

एंडोक्राइन ग्रंथियों और होर्मोनेस सम्बन्धी विज्ञान

Dr. JITENDRA GUPTA

Dr. JITENDRA GUPTA

एंडोक्राइन ग्रंथियों और होर्मोनेस सम्बन्धी विज्ञान

व्हिटॅमिन बी 1 ची कमतरता साठी औषधे

व्हिटॅमिन बी 1 ची कमतरता के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
TiamTiam Tablet99.9
Bigvin PlusBigvin Plus Soft Gelatin Capsule75.0
NervijenNervijen Capsule111.0
Mycobal Plus (Marc)Mycobal Plus Syrup84.38
Cynocal 16Cynocal 16 Tablet57.0
ThiaminThiamin 100 Mg/Ml Injection48.3
Sioneuron ForteSioneuron Forte Tablet10.92

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

सम्बंधित लेख

और पढ़ें ...