लेप्टोस्पायरोसिस - Leptospirosis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

March 06, 2020

लेप्टोस्पायरोसिस
लेप्टोस्पायरोसिस

लेप्टोस्पायरोसिस म्हणजे काय?

लेप्टोस्पायरोसिस हा संसर्ग स्पायरल आकाराच्या जिवाणूपासून होतो ज्यास लेप्टोस्पायरा म्हणतात. हा ससंर्ग लक्षणांचे विस्तृत स्पेक्ट्रम निर्माण करू शकतो. त्यामुळे अचूक निदानासाठी रक्त आणि लघवी चाचणीचे नमुने आवश्यक असतात.या आजारामुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशनमुळे मूत्रपिंडाची समस्या, श्वसनविषयक त्रास, यकृत निकामी होणे आणि मेनिन्जायटिस (मेंदूच्या संरक्षण कवचावरील सूज) यांच्याशी निगडित असतात.

लेप्टोस्पायरोसिसची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

जिवाणूंचा प्रादुर्भाव वाढून आजार बळावण्याचा कालावधी दोन दिवसांपासून चार आठवड्यांपर्यंत असतो आणि ताप येणे हे या आजाराचे पहिले लक्षण समजले जाते. लेप्टोस्पायरोसिसचे दोन प्रमुख स्टेज आहेत:

  • स्टेज 1 : ताप, डोकेदुखी, उलटी, आणि स्नायू दुखणे.
  • स्टेज 2 : मूत्रपिंड आणि यकृत निकामी होणे, मेनिन्जायटिस सोबतच डोळ्यातील बुबुळ किंवा मज्जातंतूचा प्रतिकार किंवा सूज.

लेप्टोस्पायरोसिस हा गरोदर स्त्री साठी प्राणघातक ठरू शकतो तसेच गर्भपातास कारणीभूत ठरू शकतो.

याची मुख्य कारणे काय आहेत?

या आजाराचा संसर्ग हा लागण झालेल्या प्राण्यांच्या लाघवीपासून होतो. हे जिवाणू कुत्रे, गाई-गुरे, घोडा, मांजर आणि इतर पाळीव प्राण्यांच्या लघवीमध्ये आढळतात. लेप्टोस्पायरा हा उंदरांमध्ये देखील आढळतो. संक्रमित लघवी किंवा दूषित अन्न आणि पाण्याचा प्रत्यक्ष संपर्कातून हा संसर्ग होतो. हे जिवाणू म्युकोसल पृष्ठभागातून प्रवेश करतात जसे की डोळे किंवा नाक किंवा दुभंगलेली त्वचा. हा आजार मानवामध्ये खूप क्वचितच आढळतो त्यामुळे त्याबद्दल लोकांना खूप कमी माहिती आहे.  

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

या आजाराचे निदान आजाराच्या सुरवातीच्या काळात शरीरातील द्रव पदार्थांच्या माध्यमातून जीवाणूंचे कल्चर करून केले जाते. सेरेब्रोस्पायनल नामक द्रवाची (मेंदू व मज्जातंतूंच्या भागातील द्रवपदार्थ) सुरवातीच्या काळात चाचणी केली जाते तर लघवीची चाचणी पुढील भागात केली जाते. त्याचप्रमाणे आजाराच्या अचूक निदानासाठी रक्त आणि रोगप्रतिकारक प्रणालीची चाचणीही केली जाते.

संसर्गाच्या प्रतिबंधासाठी अँटिबायोटिक्स जसे कि पेनिसिलीन, डॉक्सिसायक्लीन, स्ट्रेप्टोमायसिन आणि एरिथ्रोमायसिन वापरले जातात. श्वसनाचा दाह होणाऱ्या काही प्रकरणांमध्ये यांत्रिक पद्धतीने श्वसन पुरवठ्याद्वारे योग्य आराम मिळतो. पेरीटोनिअल डायलिसिस हा उपचार अँटिबायोटिक्स सोबतच निकामी यकृत आणि निकामी मूत्रपिंडा साठी केला जातो.

प्रतिबंध:

  • संक्रमित प्राण्यांशी संपर्क टाळणे.
  • पाळीव प्राण्यांची स्वच्छता करताना सुरक्षेचे कपडे वापरणे.
  • प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेल्या पाण्यात न पोहोणे व असे पाणी न वापरल्याने संसर्गाचा धोका टाळता येऊ शकतो.



संदर्भ

  1. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Leptospirosis
  2. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Signs and Symptoms
  3. National Organization for Rare Disorders. Leptospirosis. [Internet]
  4. Paul N. Levett. Leptospirosis. Clin Microbiol Rev. 2001 Apr; 14(2): 296–326. PMID: 11292640
  5. World Health Organization, Department of Reproductive Health and Research. Leptospirosis. Fifth edition; World Health Organization; 2010.