myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

सारांश

तोंडाचा कर्करोग कोणत्याही लिंगाच्या आणि सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकणारी घातक (कर्करोगाची) अवस्था आहे. संशोधनांनी दाखवून दिले  आहे की, मध्यमवर्गीय गटातील (29-50 वर्षे) लोकांना हा कर्करोग होण्याचा संभव अधिक असतो व परिणामी अनपेक्षित मृत्यूही होतात. तोंडाच्या कर्करोगाच्या जागतिक आकडेवारीवरून दिसून येते की,भारतीय उपमहाद्वीपात तोंडाच्या कर्करोगाने प्रभावित होण्याच्या तीन मुख्य कारणांत,अधीक प्रमाणातील तंबाखूचा वापर हे एक कारण आहे. तथापि, वैद्यकीय विज्ञानाच्या प्रगतीमुळे, प्रारंभिक अवस्थेत निदान झाल्यास, तोंडाचा कर्करोग प्रभावीपणे बरा होऊ शकतो. तोंडाच्या कर्करोगात औषधकेंद्रीत उपचार, विकिरण पद्धत, केमोथेरपी आणि तोंडाची शस्त्रक्रिया/ओरल कॅव्हिटीच्या ओन्कोसर्जरीचा समावेश आहे. तोंडाच्या कर्करोगाबद्दल सर्वकाही जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

 1. तोंडाचा कॅन्सर (तोंडाचा कर्करोग) काय आहे - What is Oral Cancer in Marathi
 2. तोंडाचा कॅन्सर (तोंडाचा कर्करोग) ची लक्षणे - Symptoms of Oral Cancer in Marathi
 3. तोंडाचा कॅन्सर (तोंडाचा कर्करोग) चा उपचार - Treatment of Oral Cancer in Marathi
 4. तोंडाचा कॅन्सर साठी औषधे
 5. तोंडाचा कॅन्सर साठी डॉक्टर

तोंडाचा कॅन्सर (तोंडाचा कर्करोग) काय आहे - What is Oral Cancer in Marathi

तोंडाचा कर्करोग असा आजार आहे जो  तोंडाच्या खड्याच्या आत असलेल्या पेशींच्या रांगेतील घातक किंवा कर्करोगाच्या पेशींमुळे होतो. जर या अवस्थेत योग्य वेळी उपचार केले गेले नाही तर प्राणहानी होऊ शकते. मौखिक कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू आणि मद्यपानाचे अतीप्रमाणात केलेले सेवन असण्याचा संशोधनांचा दावा आहे. तथापि, तोंडाच्या कर्करोगास कारणीभूत ठरणारी इतर अनेक कारणेदेखील आहेत. तोंडाच्या कर्करोगाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

तोंडाचा कॅन्सर (तोंडाचा कर्करोग) ची लक्षणे - Symptoms of Oral Cancer in Marathi

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे विशेषतः आजाराच्याप्रगत चरणांतील प्रसारादरम्यान आढळतात. याचे कारण असे की तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीला कमीतकमी चिन्हे आणि लक्षणे दिसतात आणि बहुतेक वेळा लक्षणे तोंडाच्या अल्सरचे अनुकरण करतात. तुम्हाला खालील चिन्हे दिसत असल्यास आपल्या डॉक्टरांकडून प्राधान्याने दंतचिकित्सक / सामान्य चिकित्सकांकडून तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

 • तोंडाच्या किनारीचे पांढऱ्या किंवा लाल रंगाच्या चट्ट्यासारखे असणे 3 आठवड्यांपेक्षा अधीक काळ टिकून राहणे
 • घश्याचे दुखणे 1 महिन्यांपेक्षा अधीक काळ टिकत असल्यास
 • तोंडातील फोडी/अल्सर 3-4 आठवड्यांपेक्षा जास्त काळानंतरही बरे होत नसल्यास
 •  तोंडाच्या किनारीत किंवा भिंतीत असामान्य गळती किंवा गाठ असल्यास
 • कोणत्याही कारणाशिवाय दात सैल होत असल्यास किंवा पडत असल्यास
 • घश्यामधील सततच्या वेदना ज्यामुळे गिळताना त्रास होत असल्यास
 • अचानक आवाज येणे किंवा आवाजाचे बंद होणे यासारखे बदल होत असल्यास
 • तोंड, ओठ, जबडे, जीभ, कान, मान, टॉंसिलच्या भागात 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ वेदना असल्यास दुर्लक्ष केले जाऊ नये आणि तोंडाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या चरणांवर त्याच्यात वाढ होऊ नये, म्हणून ताबडतोब तपासणी करावी.

तोंडाचा कॅन्सर (तोंडाचा कर्करोग) चा उपचार - Treatment of Oral Cancer in Marathi

वैद्यकीय विज्ञानाच्या प्रगतीमुळे, कर्करोगाच्या चरणांच्या आणि प्रकाराच्या आधारावर तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी यशस्वी उपचार उपलब्ध आहेत.तोंडाच्या कर्करोगावरील जागतिक अभ्यासातून दिसून येते की, 90 टक्के रुग्ण तोंडाचा कर्करोग पहिल्या टप्प्यात असताना निदान झाल्याने जिवंत आहेत. सामान्यत: तोंडाच्या कर्करोगाचे विकिरण पद्धत, केमोथेरपी आणि कर्करोगग्रस्त भाग काढून टाकणे असे संयुक्त उपचार आहे.

विकिरण पद्धत

विकिरण पद्धतीत,वेगवान क्षकिरणांचा वापर वेगाने वाढणाऱ्या कर्करोगाच्या पेशींना तोडण्यास आणि जलद मारण्यास केला जातो. गाठीचा आकार कमी करण्यासाठी कर्करोगाच्या सर्व प्रकारांमध्ये विकिरण पद्धतीचा वारंवार वापर केला जातो. वैद्यकीय अभ्यासाद्वारे असे सूचित केले गेले आहे की,  1ल्या टप्प्यामधील कर्करोगाला किमान शस्त्रक्रियेची गरज आहे आणि विकिरणाबरोबरच  कर्करोगरोधी औषधे घेतल्यास कुणीही तोंडाच्या कर्करोगाशी प्रभावीपणे लढू शकतो आणि त्यावर विजय मिळवू शकतो.

कीमोथेरपी

कीमोथेरपी ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपल्या रक्तप्रवाहात अधिक प्रमाणात पसरणाऱ्या कर्करोगाच्या पेशींना केंद्रित करण्यासाठी कर्करोगाच्या औषधींच्या विविध समायोजनांचा वापर करतात. ऑरोफ्रेंजिअल कॅन्सरच्या विशेष संदर्भासह असलेल्या तोंडाच्या कर्करोगाच्या बाबतीत, कीमोथेरपी उपचार खूप प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तोंडाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये  सामान्यपणें  सिस्प्लेटीन, कार्बोप्लाटिन, हायड्रॉक्सियुरिया यांसारखी केमो औषधे वापरली जातात. तथापी, कीमोथेरपीचे स्वतःचे फायदे-नुकसान आहेत. केमोच्या उपचारांनंतर तुम्ही मळमळ, उलट्या होणे, संवेदना कमी होणे आणि भूक कमी होणे अनुभवू शकता. तथापि, यशस्वी केमोनंतर, बहुतेक दुष्परिणाम हळू हळू कमी होण्यास सुरुवात होते आणि केमोथेरपी कोर्स पूर्ण झाल्यावर कुणीही सामान्य जीवन जगू शकेल.

शस्त्रक्रिया

तोंडाच्या कर्करोगाच्या बाबतीत शस्त्रक्रिया ही सर्वात सामान्य प्रक्रिया आहे. परंतु सामान्य शल्यचिकित्सकाऐवजी तज्ज्ञ ऑन्कोसर्जनकडून शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. याचे कारण असे की ओन्कोसर्जन, विशेष प्रशिक्षित सर्जन असतात जे कर्करोगाच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी आणि कर्करोग काढण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. तोंडाचा कर्करोग पूर्णपणे नष्ट करण्यासाठी ते अत्यंत अद्ययावत तंत्रज्ञान वपरतात आणि शस्त्रक्रिया प्रक्रिया करतात.

वैद्यकीय अभ्यासाने पुष्टी केली आहे की गालाच्या खड्यावरील शस्त्रक्रिया एक व्यापक शस्त्रक्रिया आहे आणि कधीकधी तोंड आणि चेहऱ्याला विकृत देखील करते. शस्त्रक्रियेनंतर आपल्याला अन्न खाण्यासाठी आणि औषधे घेण्यासाठी नलिका बसवण्याची आणि त्यांची मदत घेण्याची आवश्यकता भासू शकते.  आपण अल्पावधीसाठी किंवा कायमस्वरुपी आवाज गमावण्याचीही शक्यता असते. तथापी, दुष्परिणामांची भीती न बाळगता शस्त्रक्रिया करून घ्यावी, कारण तोंडाच्या कर्करोगाचा प्रसार झाल्यास, वेळेवर उपचार न घेणें प्राणघातक ठरू शकते.

Dr. Arabinda Roy

Dr. Arabinda Roy

ऑन्कोलॉजी

Dr. C. Arun Hensley

Dr. C. Arun Hensley

ऑन्कोलॉजी

Dr. Sanket Shah

Dr. Sanket Shah

ऑन्कोलॉजी

तोंडाचा कॅन्सर साठी औषधे

तोंडाचा कॅन्सर के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
BleocelBleocel 15 Iu Injection364.28
BleochemBleochem 15 Iu Injection687.74
BleocinBleocin 15 Mg Injection595.23
BleocipBleocip 15 Iu Injection694.33
Bleomycin 15 Mg InjectionBleomycin 15 Mg Injection600.67
Bleomycin SulphateBleomycin Sulphate Injection654.76
BlominBlomin 15 Iu Injection850.0
OncobleoOncobleo 15 Iu Injection1039.28

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...