Phlegm - Phlegm in Marathi

Phlegm
Phlegm

सारांश

कफ हा फुफ्फुसाच्या रेषांमधील आणि वरच्या वायूमार्गातील पेशींद्वारे तयार केलेला घट्ट किंवा पातळ द्रव आहे.शरीराची एक प्रतिकार यंत्रणा म्हणून हे तयार केले जाते आणि त्याला वैद्यकीय संज्ञेत म्यूकस असे म्हणतात.परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती निरोगी असते तेव्हा कफाच्या पातळपणात निरंतरता असते. म्हणूनच, हे लक्षात न येण्यासारखे असते.विशिष्ट आजारांमधे कफाचा घट्टपणा हा धूळीचे कण आणि सूक्ष्म जिवाणू यासारख्या संक्रामक घटकांना अडकवतात.कफ हा मूळ आजारवर अवलंबून, असामान्य गंधाचा आणि रंगाचा असू शकतो, त्यामुळे त्याची तपासणी करणे आवश्यक असते.सामान्य सर्दी, श्वसनाच्या वरच्या मार्गातील संसर्ग, फुफ्फुसांतील अडथळ्याचे गंभीर आजार (सीओपीडी), अतीसंवेदनशीलता, दमा, निमोनिआ आणि फुफ्फुसांचे कर्करोग यासारख्या आजारांमध्ये कफ अतिरिक्त प्रमाणात निर्माण होऊ शकतो. असामान्य कफाचे निदान निश्चित करण्यासाठी काही रक्ताच्या तपासण्यांसोबत छातीचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅन,कफाची सूक्ष्मदर्शी आणि नैसर्गिक घटकांची तपासणी केली जाते.उपचार पद्धती अंतर्निहीत कारणावर अवलंबून असतात आणि व्यक्तीशः भिन्न असतात. श्वसनमार्गातील कफाचे तयार होणे स्वाभाविक असल्यामुळे कफनिर्माण होणे टळू शकत नाही.

Phlegm symptoms

अतिरिक्त कफनिर्मिती होत असल्यास अंतर्गत आजाराची उपस्थिती दर्शवते.साधारणपणे, खोकल्याद्वारे कफ (थुंकी) शरीरातून काढून टाकण्यात येतो.कफाच्या असामान्यपणे निर्माण होण्यासोबतच काही लक्षणे अशी आहेत:

  • वाहते नाक.
  • झोपेत असताना नाकाच्या मागून गळ्यामध्ये श्लेष्माचे पाझरणे.
  • सतत घरघर होणें आणि घसा स्वच्छ करण्याची इच्छा होणे.
  • धाप लागणे.
  • घरघर
  • ताप.
  • थंडी भरणे
  • मळमळ
  • उलट्या.
  • छातीत जळजळ किंवा वेदना होणे
  • तोंडात खाज सुटणे
  • रक्ताचीथुंकी (श्लेष्मा खोकलून बाहेर काढणे).
  • आवाज घोगरा होणे
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

Prevention of Phlegm

  • धूम्रपान सोडा
    जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर धुम्रपान सोडा. धूम्रपान सोडण्यास मदत करणाऱ्या उत्पादनांबद्दल आणि उपक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी एखाद्या आधारगटामध्ये सामील व्हा किंवा डॉक्टर आणि तज्ञांशी चर्चा करा. त्यात कुटुंबातील सदस्यांना व मित्रांना समाविष्ट करा.
  • त्रासदायक घटकांशी संपर्क टाळा
    धुम्रपान, धूळ आणि प्रदूषण यांचा संपर्कात टाळा.
  • निरोगी आहार आणि व्यायाम
    प्रतिकार तयार करण्यासाठी ताजी फळे, रस आणि भाजीपाला यांसारखे पौष्टिक पदार्थ दैनंदीन आहारामधे घ्या. रोज चालणे, धावणे,पोहणे,खेळणे यांसारखे शारीरिक क्रियाकलाप करा.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Kesh Art Hair Oil by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to more than 1 lakh people for multiple hair problems (hair fall, gray hair, and dandruff) with good results.
Bhringraj Hair Oil
₹599  ₹850  29% OFF
BUY NOW

Phlegm treatment

श्लेष्मांचे उपचार अंतर्निहीत कारणांवर अवलंबून असतात.काही प्रकरणांमध्ये, श्लेष्मा होण्याची अनेक कारणे असू शकतात. उपचारनियोजनात समविष्ट आहेत:

  • औषधोपचार
    डॉक्टर सूक्ष्मजिवाणूरोधक, एलर्जीसाठी एलर्जीरोधक औषधे आणि दम्यासाठी सूजरोधक औषधे लिहून देतात.आम्ल वाढल्यास अँटासिड्स निर्धारित केले जातात.जर अचूक कारण निर्धारित केले जाऊ शकत नसेल तर खोकला कमी करून लक्षणे दूर करण्यासाठी औषधे लिहून दिली जातात.
  • छातीची फिजिओथेरेपी
    ब्रॉन्किएक्टेसिससारख्या विशिष्ट परिस्थितींमध्ये, छातीची फिजिओथेरेपी श्लेष्मा काढायला चांगली मदत करते आणि श्वसनाशी संबंधित स्नायूंची कार्यशक्ती वाढवून श्वसनाच्या क्रियेत संपूर्ण सुधारणा होते.

जीवनशैली व्यवस्थापन

  • श्लेष्मा पातळ करण्यासाठी भरपूर पातळ द्रव्यपदार्थ, गरम सूप वरसप्या.
  • खोकल्याच्या औषधांचे थेंब आणि लॉझेंज गळ्यातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.
  • नाक बुजल्यास वाफ घ्या.
  • धूम्रपान करणे आणि धूम्रपान करणाऱ्यांचा संपर्क टाळा.
  • प्रत्येक जेवणाआधी व नंतर आणि तोंडाला/ नाकाला स्पर्श केल्यानंतर हात धुवा.
  • योग किंवा लांब श्वास घेण्याच्या व्ययामामुळे अतिरिक्त श्लेष्माची निर्मिती टळू शकते.

What is phlegm

कफ हा फुफ्फुसाच्या किंवा वरच्या श्वसनमार्गाच्या पेशींमूळे सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात पाझरणारा म्युकस आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा हे लक्षात येते कारण कफ असामान्यपणे घट्ट व जास्त प्रमाणात तयार होतो. गंभीर आजारांच्या जागतिक घटनांनमध्ये 4% गंभीर आजार फुफ्फुसाचे आहेत. तीव्र खोकला एखाद्या व्यक्तीचे जीवनमान प्रभावित करते आणि आर्थिक ओझे वाढवते. जागतिक स्तरावर खोकल्याच्या उपचारांवर 1 अब्ज डॉलर खर्च केले गेले आहे. भारतीय लोकसंख्येवर आणि अर्थव्यवस्थेवर फुफ्फुसाच्या आजारावर कसा परिणाम होतो यावरील आकडेवारी फारशी उपलब्ध नाही. या लेखात, आम्ही असामान्य कफावरच चर्चा करू.



संदर्भ

  1. Ghoshal AG, Ravindran GD, Gangwal P, et al. The burden of segregated respiratory diseases in India and the quality of care in these patients: Results from the Asia-Pacific Burden of Respiratory Diseases study. Lung India: official organ of Indian Chest Society. 2016 Nov;33(6):611.
  2. Lai K, Pan J, Chen R, Liu B, Luo W, Zhong N. Epidemiology of cough in relation to China. Cough. 2013 Dec;9(1):18.
  3. Martin MJ, Harrison TW. Causes of chronic productive cough: an approach to management. Respiratory Medicine. 2015 Sep 1;109(9):1105-13. PMID: 26184784
  4. MSDmannual Professional version [internet].Common Cold. Merck Sharp & Dohme Corp. Merck & Co., Inc., Kenilworth, NJ, USA
  5. COPD Foundation [Internet] US; Understanding COPD
  6. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Bronchiectasis
  7. Irwin RS. Chronic cough due to gastroesophageal reflux disease: ACCP evidence-based clinical practice guidelines. Chest. 2006 Jan 1;129(1):80S-94S. PMID: 16428697
  8. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Pneumonia
  9. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Smoking and COPD

Phlegm साठी औषधे

Medicines listed below are available for Phlegm. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for Phlegm

Number of tests are available for Phlegm. We have listed commonly prescribed tests below: