myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

थ्रश काय आहे?

थ्रश, हा कॅंडिडिआसिस किंवा कॅन्डिडा संसर्ग म्हणून देखील ओळखला जाणारा यीस्टचा संसर्ग आहे. हा शरीराच्या विविध भागांना प्रभावित करतो. कंडिडा/ कॅंडिडा अल्बिकन्स हा बुरशीजन्य एजंट त्याला कारणीभूत असतो; आणि सहसा पचन मार्गात व त्वचेवर असतो. सहजीवनात राहत असल्याने तो कोणतेही लक्षणं उत्पन्न करत नाही. कधीकधी कमी रोग प्रतिकारशक्तीमुळे, तो वाढण्यास सुरुवात होते आणि संसर्गा स कारणीभूत ठरतो. तोंड, अन्ननलिका, घसा, योनी किंवा पुरुषांचे इंद्रिय यांना संसर्ग होऊ शकतो. प्रभावित भागानुसार, ते खालीलप्रमाणे वर्गीकृत केले जाऊ शकतात:

 • मौखिक कॅंडिडिआसिस.
 • योनीचा कॅंडिडिआसिस.
 • कॅंडिडा इसोफॅगटिस.
 • ऑरोफॅरिंगल कॅंडिडिआसिस.
 • पेनाइल यीस्ट इन्फेक्शन.

लहान बाळ व लहान मुलांसह वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना तो प्रभावित करू शकतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

शरीराच्या कोणत्याही भागांवर परिणाम झाला असला तरी खालील काही सामान्य चिन्हे आणि लक्षणे दिसून येतात:

 • पांढरे डाग.
 • खाजवणे.
 • चिडचिडेपणा.
 • दुर्गंधी.
 • वेदना.
 • किंचित उंचावलेली लाल रंगाची जखम.
 • ताप.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कॅंडिडा साधारणतः शरीरात असतो पण संसर्गाला कारणीभूत प्रमाणात नसतो. खालील घटक या बुरशीचे प्रजनन करतात ज्यामुळे संसर्ग होतो:

 • जसे कॉर्टिकोस्टेरॉईड्स, गर्भनिरोधक गोळ्या आणि अँटीबायोटिक्स सारखी औषधे, जी प्रतिकारशक्ती कमकुवत करतात.
 • गर्भधारणा.
 • धूम्रपान.
 • तोंडात कोरडेपणा.
 • दाताच्या कवळीचे चुकीचे फीटिंग.  
 • अनियंत्रित मधुमेह.
 • कॅन्सर आणि एचआयव्ही सारख्या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

मौखिक कॅंडिडिआसिसच्या निदानात प्रभावित भागाची शारीरिक तपासणी आणि नमुन्यांचे सूक्ष्म परीक्षण समाविष्ट असते. कॅंडिडा इसोफॅगटिसमध्ये सामान्यतः निदानासाठी एंडोस्कोपी केली जाते. जननेंद्रियाच्या कॅंडिडिआसिस मध्ये लक्षणांबरोबरच काही प्रश्नांसह शारीरिक तपासणी हे विकाराचे निदान करण्यात मदत करते.

निस्टाटिन, मायकोनाझोल आणि क्लोट्रिमाझोल हे कॅंडिडिआसिसच्या उपचारांसाठी सर्वसाधारणपणे निर्धारित केली जाणारी अँटीफंगल औषधे आहेत. मात्र, इसोफेगल आणि तीव्र कॅंडिडिआसिस असल्यास तोंडावाटे किंवा इंट्राव्हेनस फ्लुकोनाझोल निर्धारित केले जाते. इतर प्रकारात जिथे फ्ल्यूकोनाझोल विकाराचा उपचार करण्यास प्रभावी नसतो, इतर अँटीफंगल औषधे वापरली जातात.

 1. थ्रश साठी औषधे

थ्रश साठी औषधे

थ्रश के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
SyscanSYSCAN 100MG CAPSULE 4S88
DermizoleDermizole 2% Cream0
Clenol LbClenol Lb 100 Mg/100 Mg Tablet55
Candid GoldCANDID GOLD 30GM CREAM59
Propyderm NfPROPYDERM NF CREAM 5GM60
PlitePlite Cream0
FungitopFungitop 2% Cream0
PropyzolePropyzole Cream0
Q CanQ Can 150 Mg Capsule9
MicogelMicogel Cream17
Imidil C VagImidil C Vag Suppository59
Propyzole EPropyzole E Cream0
ReocanReocan 150 Mg Tablet23
MiconelMiconel Gel0
Tinilact ClTinilact Cl Soft Gelatin Capsule135
Canflo BnCanflo Bn 1%/0.05%/0.5% Cream34
Toprap CToprap C Cream28
Saf FSaf F 150 Mg Tablet24
Relin GuardRelin Guard 2% Cream10
VulvoclinVulvoclin 100 Mg/100 Mg Capsule56
Crota NCrota N Cream27
Clop MgClop Mg 0.05%/0.1%/2% Cream34
FubacFUBAC CREAM 10GM0
Canflo BCanflo B Cream27

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. National Health Service [Internet]. UK; Thrush in men and women.
 2. Cleveland Clinic. [Internet]. Cleveland, Ohio. Thrush.
 3. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Candida infections of the mouth, throat, and esophagus.
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Yeast Infections.
 5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Vaginal thrush.
और पढ़ें ...