myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

टेस्टोस्टोरोन एक स्टेरॉयड हार्मोन आहे. ते पुरुष आणि स्त्रिया यांमध्ये लैंगिक कोशिका बनण्यासाठी जवाबदार लैंगिक अंग असलेल्या गोनॅड्समधून निर्मित आणि उत्सर्जित होतात. टेस्टोस्टोरोनचे उत्पादन करणारी प्रमुख अंगे म्हणजे पुरुषांमध्ये अंडकोष (प्रजननप्रणालीमध्ये शुक्राणू निर्माण करणारे अवयव) आणि स्त्रियांमध्ये अंडाशय (प्रजननप्रणालीमध्ये अंड निर्माण करणारे अवयव) आहेत. ही अंगे पिट्युटरी हार्मोनच्या प्रभावाखाली कार्य करतात.

टेस्टोस्टोरोन शरिरासाठी खूप महत्वपूर्ण आहे. तो मुलांमध्ये पुरुषी वैशिष्ट्यांचे विकास यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतो, ज्यामध्ये चेहर्र्यावर केसांची वाढ, कमी पट्टीचा आवाज, स्नायूचे वजन वाढणें इ. सामील आहेत. विविध अभ्यास आणि पत्रपत्रिकांचा संकेत आहे की तो शारीरिक ताकद, शरिरातील चांगले कॉलेस्टरॉल राखले जाणें, हाडांचा विकास, मेंदूचे कौशल, कामेच्छेमध्ये सुधार, स्तंभन कार्य, वसा जमा होणें कमी करणें, मनस्थिती उद्दीपित ठेवणें आणि हार्मोन इंसुलिनप्रती शरिराची संवेदनशीलता सुधारण्यात उपयोगी आहे.

पुरुषांमध्ये टेस्टोस्टोरोन स्तरामध्ये कमी होणें सामान्यपणें पुरुषांमध्ये 40 वर्षांपेक्षा अधिक वयात आणि स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती ( स्त्रियांच्या मासिक धर्माची स्थायी समाप्ती) आढळते. कमी सेरमच्या टेस्टोस्टोरोनच्या इतर कारणांमध्ये स्क्रोटममध्ये खाली उतरण्यात अंडकोष अपयशी होणें, मंप्स संक्रमण, रक्तात खूप अधिक स्तराचे लौहस्तर ज्यामध्ये अंडकोष कार्य करण्यास निकामी होतो, इजा झालेले अंडकोष, लठ्ठपणा, तणाव, उच्च कॉलेस्टरोल, कीमोथेरपी, विकिरण थेरपी, एचआयव्ही-एड्स, पिट्युटरी ग्रंथीचे विकार इ. हे वयवाढ होत असलेल्या पुरुष व स्त्रियांमध्ये (रजोनिवॄतीनंतर) प्रमुख चिंतेचे कारण बनले आहे, कारण कमी सेरमचे टेस्टोस्टोरोन खूप शारीरिक कार्यांना प्रभावित करू शकतो.

कमी टेस्टोस्टोरोन स्तरासाठी उपचार मिळण्यात डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतलाच पाहिजे, पण तुम्ही तुमच्या शरिरातील टेस्टोस्टोरोन उत्पादन सुधारण्यासाठी निम्नलिखित बाबींमधून काही इतर गोष्टीही करून पाहायला हव्या आहेत, स्त्रियांमध्ये, टेस्टोस्टोरोन लैंगिक इच्छा, हाडांचे आरोग्य, मनस्थिती आणि एकूण उत्कर्ष वधारण्यात साहाय्य करतो.

 1. वजन कमी झाल्याने टेस्टोस्टोरोन वाढतो - Weight loss increases testosterone in Marathi
 2. व्यायाम टेस्टोस्टोरोन स्तर वाढवतो - Exercise boosts testosterone levels in Marathi
 3. झोपेमुळे टेस्टोस्टोरोन वाढतो - Sleep increases testosterone in Marathi
 4. टेस्टोस्टोरोन वाढवण्यासाठी तणाव कमी करणें - Release stress to increase testosterone in Marathi
 5. टेस्टोस्टोरोन वधारण्यासाठी निरोगी वसा - Healthy fat to boost testosterone in Marathi
 6. टेस्टोस्टोरोन वधारण्यासाठी विटामिन डी - Vitamin D to boost testosterone in Marathi
 7. टेस्टोस्टोरोन वधारण्यासाठी झिंक - Zinc for higher testosterone level in Marathi
 8. कमी अल्कोहल अधिक टेस्टोस्टोरोन ( - Less alcohol more testosterone in Marathi
 9. टेस्टोस्टोरोन वाढवण्यासाठी मॅग्नेशिअम - Magnesium to increase testosterone in Marathi
 10. टेस्टोस्टोरोन स्तर वधारण्यासाठी गोक्षुर - Gokhru to boost testosterone level in Marathi
 11. टेस्टोस्टोरोन वाढवण्यासाठी वेगन आहार - Vegan diet to increase testosterone in Marathi
 12. पुरुष हार्मोन वाढवण्यासाठी आले - Ginger to increase male hormones in Marathi
 13. नैसर्गिक टेस्टोस्टोरोन वर्धक म्हणून मेथी - Fenugreek as a natural testosterone booster in Marathi
 14. टेस्टोस्टोरोन वर्धक म्हणून अश्वगंधा - Ashwagandha as a test booster in Marathi

एशिअन जर्नल ऑफ एंड्रोलॉजीमध्ये एक संशोधन प्रकाशित झाले होते, जे टेस्टोस्टोरोन आणि लठ्ठपण्याच्या संबंधावर आधारित असतो. एशिअन जर्नल ऑफ एंड्रोलॉजी सुचवते की लठ्ठ लोकांमध्ये कमी स्तराचे सेरम टेस्टोस्टोरोन असते. व्यक्ती लठ्ठ झाल्याने असे होते आणि शरिरातील इंसुलिन प्रतिरोध वाढतो. परिणामी, टेस्टोस्टोरोनला बांधणारी प्रथिनेसुद्धा कमी होतात, आणि शरिरात टेस्टोस्टोरोनचे स्तर कमी होते.

म्हणून, शरिराचे वजन कमी झाल्याने तुमच्या सेरममधील टेस्टोस्टोरोन स्तर कमी होण्यात साहाय्य होतो. तुम्ही प्रभावीपणें वजन कमी करण्यासाठी तुमची रुची व शरिराचे प्रकार यास साजेसे असणार्र्या विविध प्रकारच्या गतिविधींची निवड करून शारीरिक गतिविधीचे स्तर आणि तास विकतात. शारीरिक गतिविधींमध्ये हृदयाचे व्यायाम उदा. पावर योग, सायकलिंग, जॉगिंग, पोहणें, ताइ-ची यासह लठ्ठपणावर उपचार करण्यात संतुलित आहार खाण्यासह, खूप प्रभावी आहेत.

 (अधिक पहा लठ्ठपणावर उपचार)

सेरम टेस्टोस्टोरोन स्तरावर व्यायामाच्या प्रभावावर आधारित अभ्यास सुचवतो की शारीरिक गतिविधी आणि व्यायाम रक्तातील सेरम विशिष्टपणें वाढवण्यात टेस्टोस्टोरोन स्तर वाढतो. तत्सम अभ्यास 12 महिन्यांपेक्षा अधिक काळावधीमध्ये 102 लोकांवर करून टेस्टोस्टोरोनमधील बदल पाहण्यात आले.

असे पाहण्यात आले की सेरम टेस्टोस्टोरोन व्यायामानंतर पुरुषांमध्ये वाढतो. याचबरोबर, प्रथिनाचे सेरम स्तर लैंगिक हार्मोनबरोबर बांधला जातो, त्याची आणि व्यायामानंतर हृदयाची कार्यक्षमताही वाढली. म्हणून, तुम्ही नियमितपणें व्यायाम केल्यास, तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार वजन उचलल्यास किंवा व्यायामाच्या कार्यक्रमाप्रमाणें प्रशिक्षक असल्यास ते निश्चितपणें लाभदायक असेल. काही वेळ असे केल्यानंतर तुमच्या शरिरातील टेस्टोस्टोरोन स्तर सामान्य होतील.

टेस्टोस्टोरोनची झोपेदरम्यान माणसाच्या शरिरामध्ये अधिक गळती होते. झोपेदरम्यान टेस्टोस्टोरोनच्या स्तरावर झोपेचे प्रभाव तपासण्यासाठी एक अभ्यास 2011मध्ये घेण्यात आला. असे आढळले की टेस्टोस्टोरोन स्तर झोप कमी झाल्याने, झोप विस्कळीत झाल्याने किंवा अनिद्रेमुळे लक्षणीयरीत्या घटले.

तुमच्या शरिरातील लैंगिक हार्मोन सुधारण्यासाठी तुम्ही 7-8 तास चांगली झोप घ्यायला हवी. झोप न केवळ सेरम टेस्टोस्टोरोनचे स्तर वाढवण्यास मदत करेल, तर शरिराच्या इतर महत्त्वपूर्ण चयापचय कार्यांचे नियामन करण्यातही मदत करेल.

हे ज्ञात आहे की टेस्टोस्टोरोन मनस्थिती उंचावण्याशी संबद्ध आहे. 2013मध्ये प्रकाशित एका पत्रिकेने लैंगिक हार्मोंसवर तणाव आणि चिंतेच्या प्रभावांवर प्रकाश टाकले, या अभ्यासाने दर्शवले आहे की भावनिक व मानसशास्त्रीय समस्या असलेल्या स्त्री आणि पुरुष अशा दोघांमध्ये कामेच्छा आणि लैंगिक हार्मोन कमी झालेले आढळले.

म्हणून भावनिक व मानसशास्त्रीय समस्यांसोबत राहत असलेल्या लोकांना कामेच्छा आणि लैंगिक हार्मोन कमी झाल्याबद्दल तणाव न घेता, सहज आणि अवरोधमुक्त तणावनाशक गतिविधींचा अवलंब घ्यावा.

तुम्ही संगीत, नियमित चालणें, व्यायाम, योगासन, ध्यान, नृत्य किंवा तुम्हाला बरे वाटण्यास साहाय्य होईल अशा कशाचाही आधार घेऊ शकतात. तुम्ही यासाठी थेरपिस्टचाही सल्ला घेऊ शकता. याने तुमच्या शरिरातील टेस्टोस्टोरोन स्तर सामान्य होण्यासही साहाय्य होईल.

 (अधिक वाचा: तणावाची लक्षणे)

एशिअन जर्नल ऑफ एंड्रोलॉजीद्वारे प्रकाशित एका पत्रिका फॅटी एसिड आणि लैंगिक हार्मोन स्तराच्या संबंधावर आधारित होती. त्यामध्ये सुचवले गेले की पॉलिअन्सॅच्युरेड फॅटी एसिड्स लैंगिक आरोग्य आणि लैंगिक हार्मोनच्या नियामनासाठी लाभकारक आहे. असेही सांगण्यात आले की ट्रांस फॅटी एसिड्सचे टेस्टोस्टोरोन स्तरावर विपरीत प्रभाव झाले.

टेस्टोस्टोरोनचे स्तर सुधारण्यासाठी, तुम्ही ऑलिव्ह तेल, सॅफ्लावर ऑयल, पामतेल, खोबरेल तेल इ. सारखे पॉलिअनसॅचुरटेड फॅटी एसिड घेऊ शकता. जंक फूडमध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेल्या ट्रांस फॅटी एसिड घेणें टाळणेंच बरे राहील.

टेस्टोस्टोरोन स्तरावर विटामिन डी पूरक तत्त्व म्हणून देण्याच्या प्रभावाची चाचणी 200 पुरुषांवर केली गेली. व्यायामासोबतच, त्यांना एका काळावधीसाठी विटामिन डी सप्लिमेंट दिले गेले. असे आढळले की सप्लिमेंट न मिळालेल्या लोकांच्या तुळनेत ते मिळालेल्या लोकांमध्ये टेस्टोस्टोरोन स्तर उंचावले गेले होते.

म्हणून, तुमच्या शरिरात टेस्टोस्टोरोनचे स्तर वाढवण्यासाठी, तुम्ही नैसर्गिकरीत्या विटामिन डीचे स्तर उंचावण्यासाठी कमीत कमी 10-15 मिनिटे कोवळ्या उन्हाचे प्रकाश घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. याबरोबरच, तुम्हाला घ्यायची गरज असलेली विटामिन डी पूरक तत्त्वाची योग्य मात्रा आणि काळावधी जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. स्वतःहून किंवा डॉक्टरांनी विहित केलेले नसल्यास पूरक तत्त्व न घेणेंच सर्वोत्तम असेल.

झिंक एक आवश्यक खनिज तत्त्व असूनही शरीर त्याची साठवणूक करू शकत नाही. म्हणून, झिंकवर आधारित प्रक्रियांना योग्यरीत्या कार्य करण्यासाठी आहाराबरोबर नियमित घ्यायला हवे. झिंक आणि शरिरातील टेस्टोस्टोरोन स्तरामधील संबंध निर्धारित करण्यासाठी केलेल्य एका अभ्यासामध्ये सुचवले गेले की शरिरात झिंकची कमतरता कमी टेस्टोस्टोरोन स्तराशी संबद्ध आहे. तरीही, हे अभ्यास छोट्या प्रमाणावर केले गेले होते.

2018मध्ये जर्नल ऑफ रिप्रोडक्शन एंड फर्टिलिटीद्वारे प्रकाशित एका हल्लीची पत्रिकेमध्ये सांगितले गेले आहे की झिंक शरिरारासाठी एक आवश्यक तत्त्व आहे. त्यामुळे शरिरातील हार्मोन्सचे समतोल राखण्यात मदत होते आणि तो पुरुषांमधील उर्वरतेसाठी खूप आवश्यक असते.

म्हणून, टेस्टोस्टोरोन स्तर आणि तुमचे प्रजननकार्य सुधारण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारामध्ये झिंक असलेले खाद्यपदार्थ उदा. मांस, अंडी, सुका मेवा, डाळी (उडीद, बीन, मसूर) इ. सामील करू शकता. झिंक पूरक तत्त्वांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमचे चिकित्सक किंवा लैंगिक आरोग्यातील समस्यांच्या तज्ञाला संपर्क करू शकता.

खूप मोठ्या प्रमाणात अल्कोहल घेतल्याने पुरुष प्रजननतंत्र आणि त्याच्याशी संबंद्ध हार्मोनवर विपरीत प्रभाव पडतो.

अल्कोहल आणि पुरुष प्रजननव्यवस्थेचे अवलोकन सुचवते की मोठ्या प्रमाणात अल्कोहल घेतल्याने न केवळ शरिरातील टेस्टोस्टोरोनचे स्तर कमी होते, तर इतर प्रजननक्षम हार्मोनवरही प्रभाव पडतो. म्हणून अल्कोहलच्या खपावर मर्यादा ठेवणेंच हुशारीचे ठरेल. अनुमेय मर्यादेत अल्कोहल घेणें तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी हानिकारक समजले जात नाही.

मॅग्नेशिअम शरिरात अनेक ऊर्जा-उत्पादक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे खूप महत्वपूर्ण खनिज तत्त्व आहे. शरिराच्या भौतिक कार्यांवर मॅग्नेशिअम आणि टेस्टोस्टोरोनच्या लाभकारक प्रभावांवर आधारित असलेले एक अभ्यास घेण्यात आले. यामध्ये सुचवले गेले की मॅग्नेशिअमचे पुरुषांमधील टेस्टोस्टोरोनवर सकारात्मक प्रभाव होते.

म्हणून, प्रचुर मॅग्नेशिअम असलेले खाद्यपदार्थ उदा. हिरव्या पालेदार भाज्या, डाळी, केळी, एव्होकॅडोसारखी फळे, सॅल्मॉन, ट्युना इ. सारखे समुद्री खाद्य तुमच्या शरिरातील टेस्टोस्टोरोन स्तर वाढवण्यात मदत करू शकते. मॅग्नेशिअम पूरक तत्त्वे हवी आहेत का हे तपासण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणें आणि ते विहित केल्याप्रमाणें घेणें असे करू शकता.

“हायपॉगॉनॅडल पुरुषांमध्ये टेस्टोस्टोरोन स्तर सुधारण्यासाठी आहारातील सहाय्यक तत्त्वे” यावर अमेरिकन जर्नल ऑन मेन्स हेल्थ यामध्ये प्रकाशित पत्रिका सांगते की केलट्रॉप्स (गोक्षुरा) किंवा ट्रिब्युलस टेरेस्ट्रिस, एक पुष्पयुक्त रोप आहे जे सेरममध्ये टेस्टोस्टोरोन स्तर वाढवण्यासाठी लाभकारक आहे.

गोक्षुर पूरक तत्त्वे का आणि कधी घ्यावीत, याचे तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमचे चिकित्सक किंवा आयुर्वेदिक वैद्यांना संपर्क करू शकता.

हार्मोनवरील ब्रिटिश जर्नल ऑफ कॅन्सर याद्वारे प्रकाशित पत्रिका दर्शवते की टेस्टोस्टोरोन स्तर वेगन आहार घेणार्र्या पुरुषांमध्ये अधिक असतो. म्हणून, वेगन आहार म्हणजेच पूर्ण धान्य, डाळी, बटाटे, तांदूळ, मका इ. घेतल्याने सेरममधील टेस्टोस्टोरोन स्तर वाढवू शकतो.

अंडी, दूध आणि डेअरीसारखी प्राणिजन्य उत्पादने वेगन आहारात नसतात, म्हणून, हे आहार सुरू करण्यापूर्वी, वेगन आहार कसे घ्यावे यावर संपूर्ण मार्गदर्शन घेण्याकरिता पोषणतज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणें योग्य राहील. पोषक तत्वांच्य कमतरतेचे लोकांना त्रास असल्यास, ते अयोग्यरीत्या वेगन आहार घेतात. पोषणतज्ञ/आहारतज्ञ तुमच्या शरिरात कमतरता निर्माण होण्यापासून टाळेल, ज्याच्या परिणामी प्राणिजनित उत्पादने टाळली जाऊ शकतात.

आले जगभर सर्वांत व्यापकपणें वापरला जाणारा वनस्पती आहे. 2013मध्ये नर मधुमेहग्रस्त उंदरांवर झालेल्या अभ्यासामध्ये सुचवले गेले होते की आल्याच्या मुळा खाल्ल्याने न केवळ शरिरातील टेस्टोस्टोरोन पातळी वाढते, तर वीर्याची गुणवत्ता सुधारण्यामध्येही साहाय्य होतो.

म्हणून आले खाल्ल्याने तुमचे टेस्टोस्टोरोन स्तर वाढण्यात मदत होऊ शकते. तुम्ही आल्याचा चहा, आल्याचे कापे, जिंजर लोझेंजेझ घेऊन आणि तुमच्या जेवणात बारीक चिरलेले आले टाकून अनेक रूपांमध्ये आले घेऊ शकता.

आपल्या फायद्यांसाठी वनस्पती वापरत असलेल्या अनेक आरोग्याबाबतीत जागरूक लोकांमध्ये मेथी प्रसिद्ध आहे.

मेथीच्या शरीरशास्त्रीय पैलूंवर झालेले एक वैद्यकीय अभ्यास सुचवते की मेथीचे सार कामेच्छेत सुधार करण्यात आणि शरिरात सामान्य टेस्टोस्टोरोन स्तर राखून ठेवण्यात खप मदत करतो.

म्हणून, तुम्ही चांगल्या लैंगिक आरोग्यासाठी मेथी वापरू शकता. तुम्ही तुमच्या सॅलॅडवर मेथीच्या बिया शिंपडू शकता किंवा ताकामध्ये टाकून खाऊ शकता किंवा मेथी पूरक तत्त्व म्हणून खाऊ शकता. मेथीच्या तत्त्वांचे योग्य प्रमाण आणि घेण्याची योग्य पद्धत जाणून घेण्यासाठी तुमचे चिकित्सक किंवा आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्यावा.

अश्वगंधा आयुर्वेदातील सर्वाधिक नावाजलेल्या वनस्पतींपैकी एक आहे. तिला तिच्या ज्ञात आरोग्य फायद्यांसाठी व्यापकपणें स्वीकार केले जाते.

2015मध्ये स्नायूच्या ताकदीवर झालेल्या अश्वगंधेच्या प्रभावांचे मूल्यमापन करण्यासाठी झालेली चाचणी सुचवते की ती स्नायूचे वजन वाढवंणें आणि व्यायामानंतर स्नायूंची क्षती टाळण्यात खूप प्रभावी आहे.

अश्वगंधा मिळालेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टोरोन पातळी लक्षणीयरित्या उंचावल्याचे आढळले होते. म्हणून, तुमचे टेस्टोस्टोरोन संवर्धित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली अश्वगंधा घेऊ शकता.

और पढ़ें ...