सेलिॲक रोग - Celiac Disease in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

December 03, 2018

October 28, 2020

सेलिॲक रोग
सेलिॲक रोग

सेलिॲक रोग काय आहे?

सेलिॲक रोग एक आनुवांशिक स्वयंप्रतिकारक विकार आहे जो पाचन तंत्रावर परिणाम करतो. या विकारात, शरीर ग्लुटेन नावाच्या प्रथिने विरूद्ध रोगप्रतिकारक प्रतिसादाची निर्मिती करते जे मुख्यत्वे मोहरी, गहू आणि जव मध्ये आढळते. ल्युटेनयुक्त खाद्यपदार्थांच्या वापरानंतर,आतडीतील व्हिली मध्ये सूज येते ज्यामुळे आतड्यांसंबंधी प्रणालीचे नुकसान सुरु होते. असे झाल्याने पाचन संबंधी समस्या उद्भवू शकतात ज्या गंभीर देखील असू शकतात. यामुळे पुढे पोषणाची कमतरता होऊ शकते.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

आतड्यांशी संबंधित लक्षणे अधिक सामान्यपणे अनुभवल्या जातात, आणि हे प्रौढ आणि मुलांमध्ये भिन्न असतात. यापैकी काही खाली सूचीबद्ध आहेत:

पाचनतंत्रा व्यतिरिक्त ही काही लक्षणे पाहिली जाऊ शकतात

याची मुख्य कारणं काय आहेत?

सेलिॲक रोग आनुवांशिक घटक, पर्यावरणीय घटक आणि काही रोगप्रतिकारक विकारांमुळे होतो कारण यामुळे खाद्य पदार्थांमधील ग्लूटेनच्या विरोधात शरीर रोगप्रतिकारक प्रतिक्रिया करु लागते. हे कदाचित काही आधीपासूनच असलेल्या विकार जसे की टाइप 1 मधुमेह, अल्सरेटिव्ह कोलाइटिस, थायरॉईडचा विकार, फिट येणे आणि डाऊन सिंड्रोममुळे देखील होऊ शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

सेलिॲक रोगाची लक्षणे बरीच वेगवेगळी असतात; त्यामुळे केवळ 20% रुग्णांचे निदान होते. निदानांमध्ये कौटुंबिक इतिहास, वैद्यकीय इतिहास आणि आहारविषयक नमुने, आणि पुढे रक्त तपासणी आणि बायोप्सी करणे समाविष्ट आहे. रक्तच्या दोन तपासण्या केल्या जातात: एक ग्लूटेन विरूद्ध अँटीबॉडीच्या उपस्थितीसाठी सीरोलॉजिकल चाचणी आणि दुसरी म्हणजे ह्यूमन ल्यूकोसाइट अँटीजन (एचएलए-HLA)) साठी अनुवांशिक चाचणी आहे. आंतड्यातील बायोप्सी आतड्यांच्या विलीच्या संरचनात्मक नुकसान तपासायला केली जाते. अचूक आणि परिणामकारक निदानाची खात्री होईपर्यंत ग्लुटेन-युक्त आहारावर असणे आवश्यक आहे. फॉलो-अप चाचणी वार्षिक आणि आजीवन चालू ठेवली पाहिजे.

सेलिॲक रोगाचा कायमस्वरूपी उपचार करण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे कठोर, ग्लुटेन मुक्त आहार. आपण अन्न, औषधे, पूरक व्हिटॅमिन किंवा पेय पदार्थांमध्ये असलेल्या ग्लूटेनचा वापर टाळला पाहिजे. एक पोषक तज्ञ आपल्याला वैयक्तिकृत ग्लुटेन-फ्री आहार तयार करण्यात मदत करू शकतात जे महत्त्वपूर्ण प्रथिने गमावत नाही. खराब झालेले आतडे बरे होणे आठवड्याभरात सुरू होते आणि काही महिन्यांमध्ये व्हिलीची परत वाढ होते. जस-जसे आंतडयाच्या रचनेची  परत सुरूवात आणि सूज कमी होते तसे-तसे लक्षणे नाहीसे होत जातात.अन्न पदार्थ, पेय इत्यादींसाठी योग्य काळजी घ्यावी. डबा बंद केलेल्या अन्नाचे लेबले वाचा. काही ग्लुटेन-मुक्त अन्न, धान्य किंवा स्टार्च हे आहेत

  • कॉर्न,राजगिरा,कॉर्नमील,तांदूळ,बकव्हीट, टॅपीओका (साबुदाणा), आणि सहस्त्रपर्णी.
  • ताजे मांस, मासे, घरी पोसलेल्या पक्ष्यांचे मास, दुग्धजन्य पदार्थ आणि भाज्या.



संदर्भ

  1. Celiac Disease Foundation. Symptoms of Celiac Disease. Celiac Disease Foundation’s Medical Advisory Board. [internet].
  2. National Health Service [Internet]. UK; Treatment: Coeliac disease
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Celiac Disease
  4. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Treatment for Celiac Disease.
  5. American Academy of Family Physicians [Internet]. Kansas, United States; Celiac Disease: Diagnosis and Management