myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

कोलेस्टॅटिक यकृत रोग म्हणजे काय?

कोलेस्टॅटिक यकृत रोग, कोलेस्टॅटिस म्हणून देखील ओळखला जातो. हा एक विकार आहे ज्यामध्ये यकृतामधून पित्ताचा प्रवाह एकतर कमी होतो किंवा अडवला जातो. हा आजार खूप तीव्र किंवा जुना असू शकतो आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. ह्याला एक्स्ट्राहेपॅटिक कोलेस्टॅटिस म्हणजे यकृतच्या बाहेर होणारा आणि इंट्राहेपॅटिक कोलेस्टॅटिस म्हणजे यकृतच्या आत होणारा अश्या प्रकारे वर्गीकृत केले जाऊ शकते.    

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

कोलेस्टॅटिसची लक्षणे हेपिटायटीससारखीच असतात, जे त्याचे कारण देखील आहे. कोलेस्टॅटिसचे लक्षणं  खालीलप्रमाणे आहेतः

 • मळमळणे.
 • गडद रंगाची लघवी.
 • पांढरा किंवा मातीच्या रंगाचा मल.
 • खाजवणे.
 • ओटीपोटात वरच्या बाजूला दुखणे.
 • त्वचा आणि डोळे पिवळसर होणे.
 • काही पदार्थांच्या पचनामध्ये अडचण. (अधिक वाचा: अपचनचा उपचार)

याची मुख्य कारणं काय आहेत?

प्रभावित गटाच्या आधारावर कोलेस्टॅटिसचे कारण आहेत:

 • नवजात बाळ आणि मुलांमध्ये कोलेस्टॅटिसची कारणं:
  • अनुवांशिक कारण जसे झिंक स्टोरेज डिसऑर्डर.
  • सिरीन जीन नावाचे जीनचे म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन.
  • बायलर’स सिंड्रोम (जेनेटिक ऑटोसोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर)
 • प्रौढांमध्ये कोलेस्टॅटिसचे कारणं:
  • लिहून दिलेले औषधे.
  • हर्बल उपचार.
  • डॉक्टरांनी लिहून न दिलेले औषध घेणे.

स्थळावर आधारित कोलेस्टॅटिसचे कारणं:

 • इंट्राहेपॅटिक कोलेस्टॅटिसची कारणं:
 • एक्स्ट्राहेपॅटिक कोलेस्टॅटिसची कारणं :
  • सिस्ट.
  • पित्ताशय नलिकेचा ट्युमर.
  • पित्ताशय नलिकेत खडे.
  • स्वादुपिंड सुजणे (अधिक वाचा: स्वादुपिंडाचे उपचार).
  • स्वादुपिंडमध्ये ट्यूमर असणे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

कोलेस्टॅटिसचा संशय असल्यास डॉक्टर खालील चाचण्या लिहून देतील:

 • यकृत क्रिया चाचणी: यामुळे पित्ताचे आणि सीरम अल्कलीन फॉस्फेटसचे वाढलेले स्तर समजेल.
 • यकृतचे मूल्यांकन करण्यासाठी खाली दिलेल्या इमेजिंग तपासण्या:
  • पोटाचा एमआरआय.
  • पोटाचे अल्ट्रासाऊंड इमेजिंग.
  • पोटाचा सिटी स्कॅन.
  • एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड चोलॅंगियोपॅन्क्रिएटोग्राफी.

कोलेस्टॅटिक यकृत रोगाच्या उपचारांमध्ये स्थितीच्या मूलभूत कारणाची ओळख आणि उपचार यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे. कोलेस्टॅटिसचे उपचार खालील प्रमाणे आहेत:

 • लक्षणांवर आधारित उपचार : प्र्यूरिटस (खाज येणे) हे सर्वसामान्य लक्षण आहे, जे नंतर झोपेत अडथळा आणू शकते, म्हणूनच काळजी घेतली पाहिजे. प्र्यूरिटससाठी सामान्यतः  कोलेस्टिरॅमिन सारखी  ॲनियन एक्सचेंज रेसिन्स औषधे दिले जातात. अँटिबायोटिक्सचा वापर पर्यायी उपचार म्हणून केले जातो.
 • विशिष्ट उपचार: स्थितिच्या करणानुसार विविध अँटिबायोटिक्स आणि कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी केली जाऊ शकते.

(अधिक वाचा: यकृत आजाराचे प्रकार)

 1. कोलेस्टॅटिक यकृत रोग साठी औषधे

कोलेस्टॅटिक यकृत रोग साठी औषधे

कोलेस्टॅटिक यकृत रोग के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Silybon खरीदें
Heparid खरीदें
Hepasil खरीदें
Higado L खरीदें
Limarin खरीदें
Mariliv खरीदें
Silbostin खरीदें
Silynova खरीदें
Syloliv खरीदें
Toxifite खरीदें
Hepox खरीदें
Higado LS खरीदें
Livco खरीदें
Liverubin खरीदें
Livtec खरीदें
Rejuliv खरीदें
Udimarin खरीदें
Asil खरीदें
Eliv खरीदें
Higado Plus खरीदें
B Liv खरीदें
Livobit Sl खरीदें
Livolin S खरीदें
Lyrin B खरीदें
Niliv खरीदें

References

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Cholestasis
 2. Heathcote EJ. Diagnosis and management of cholestatic liver disease.. Clin Gastroenterol Hepatol. 2007 Jul;5(7):776-82. PMID: 17628332
 3. Hofmann AF. Cholestatic liver disease: pathophysiology and therapeutic options.. Liver. 2002;22 Suppl 2:14-9. PMID: 12220297
 4. Pollock G et al. Diagnostic considerations for cholestatic liver disease.. J Gastroenterol Hepatol. 2017 Jul;32(7):1303-1309. PMID: 28106928
 5. U.S. National Library of Medicine. Evaluating the Genetic Causes and Progression of Cholestatic Liver Diseases (LOGIC) (LOGIC). U.S. National Institutes of Health; [Internet]
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें