योनीचा कॅन्सर - Vaginal Cancer in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS

May 02, 2019

March 06, 2020

योनीचा कॅन्सर
योनीचा कॅन्सर
कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो

योनीचा कॅन्सर काय आहे?

हा महिलांच्या प्रजनन प्रणालीत आढळणारा दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर आहे. हा कॅन्सर कॅन्सरच्या सर्व प्रकारांपैकी 0.2% पेक्षा कमी असतो. सामान्यतः, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये लैंगिक क्रियाकलाप संपल्यानंतर हे पाहिले जाते. हा कॅन्सर योनीमध्ये सुरू होतो जेव्हा सामान्य निरोगी पेशी बदलतात आणि ट्यूमर तयार करण्यासाठी अनियंत्रितपणे वाढतात. स्क्वॅमस सेल कार्सिनोमा याचा सर्वात सामान्य प्रकार आहे. ग्रंथीपासून सुरू होणारा एडेनोकार्सीनोमा म्हणून ओळखला जातो. कनेक्टिव्ह कार्सिनोमा अत्यंत दुर्मिळ आहे आणि तो सारकोमा म्हणून ओळखला जातो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

प्रारंभिक लक्षणे दिसून येणे असामान्य आहेत, पण, सामान्यपणे आढळून येणारे चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

 • रजोनिवृत्ती दरम्यान किंवा नंतर अप्राकृतिक योनीतून रक्तस्त्राव.
 • लघवी करताना वेदना.
 • संभोग करताना वेदना.
 • ओटीपोटात वेदना.
 • योनीत गाठ.
 • योनीतून नकोसा वाटणारा दुर्गंधीयुक्त स्त्राव किंवा रक्तस्त्राव.
 • योनीमार्गामध्ये खाज.
 • पाठ दुखणे.  
 • पाय दुखणे.
 • पायाला सूज.
 • अपचन.

याची मुख्य कारणं काय आहेत?

योनीच्या कॅन्सरचे अचूक कारण अज्ञात आहे, परंतु कॅन्सरच्या वाढीस कारणीभूत ठरू शकणारे धोक्याचे घटक असे आहेत

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

वरीलपैकी कोणतीही लक्षणे किंवा कारणे आढळून आल्यास, सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे. डॉक्टर संपूर्ण वैद्यकीय इतिहासाची चौकशी करतील आणि लक्षणांबद्दल चर्चा करतील आणि शारीरिक तपासणी करतील ज्यामध्ये ओटीपोटाची परीक्षा आणि पीएपी स्मिअर चाचणी यांचा समावेश आहे. इतर चाचण्या केल्या जाऊ शकतात ज्या खालीलप्रमाणे आहेत:

कॉल्पोस्कोपी: मायक्रोस्कोप अंतर्गत परीक्षण करण्यासाठी योनीतून टिश्यूचे नमुने गोळा केले जातात.

 • बायोप्सी: जेव्हा इतर चाचण्या कॅन्सर सूचक असतात तेव्हा बायोप्सी ही एकमेव निश्चित चाचणी असते जी निदानाची पुष्टी करते.
 • छातीचा एक्स-रे: हा कॅन्सर फुफ्फुसात पसरला आहे का हे पाहण्यासाठी केला जातो.
 • ओटीपोट आणि पोटाची अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी (यूएसजी).
 • कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी स्कॅन).
 • मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय).
 • पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी स्कॅन): रेडियोॲक्टिव्ह शुगर्सच्या सहाय्याने शरीरात घातक ट्यूमर पेशी शोधण्यासाठी हे केले जाते.
 • सिस्टोस्कोपी: मूत्राशय आणि मूत्रमार्गात बघणे.
 • यूरेट्रॉस्कोपी: मूत्रवाहिनीच्या आत बघणे.
 • प्रॉक्टोस्कोपी: गुदाशयाच्या आत पाहण्यासाठी.
 • योनीच्या कॅन्सरसाठी तीन मानक उपचार उपलब्ध आहेत.

शस्त्रक्रियाः

 • लेसर शस्त्रक्रिया: लेसर बीमच्या मदतीने ट्यूमर कापला जातो.
 • वाईड लोकल एक्सिशन : आसपासच्या काही निरोगी टिश्यूसह कॅन्सरचा भाग देखील कापला जातो.
 • व्हेजिनेक्टोमी: योनी काढून टाकली जाते.
 • एकूण हिस्टरेक्टोमीः या गर्भाशयात आणि गर्भाशयाच्या जवळचा मानेसारखा भाग दोन्ही काढून टाकले जातात.

रेडिएशन थेरपी: हाय एनर्जी एक्स रे किंवा इतर रेडियोॲक्टिव्ह पदार्थ वापरले जातात.

किमोथेरपी: कॅन्सरच्या पेशी नष्ट करून कॅन्सरच्या वाढीला थांबविण्यासाठी औषधे वापरली जातात किंवा त्यांना विभाजनापासून थांबवतात.

बऱ्याच उपचारांचे दुष्परिणाम आहेत जसे की विविध वेदना आणि इतर लक्षणे अस्वस्थ भावना, मळमळ, भूक कमी होणे, अतिसार, उलट्या, केस गळणे, निराशा.

 संदर्भ

 1. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Vaginal Cancer Treatment (PDQ®)–Patient Version
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Vaginal Cancer
 3. American Cancer Society [Internet] Atlanta, Georgia, U.S; What Is Vaginal Cancer?.
 4. Conquer Cancer Foundation. Vaginal Cancer. American Society of Clinical Oncology, Virginia, United States [Internet]
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Basic Information About Vaginal and Vulvar Cancers
 6. PDQ Adult Treatment Editorial Board. Vaginal Cancer Treatment (PDQ®): Health Professional Version. 2019 Feb 7. In: PDQ Cancer Information Summaries [Internet]. Bethesda (MD): National Cancer Institute (US); 2002-.

योनीचा कॅन्सर चे डॉक्टर

David K Simson David K Simson Oncology
11 वर्षों का अनुभव
Dr. Nilesh Ranjan Dr. Nilesh Ranjan Oncology
3 वर्षों का अनुभव
Dr. Ashok Vaid Dr. Ashok Vaid Oncology
31 वर्षों का अनुभव
Dr. Ashu Abhishek Dr. Ashu Abhishek Oncology
12 वर्षों का अनुभव
डॉक्टरांचा सल्ला घ्या

योनीचा कॅन्सर साठी औषधे

योनीचा कॅन्सर के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।