हिवताप - Malaria in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

January 26, 2019

March 06, 2020

हिवताप
हिवताप

सारांश

मलेरिआ डासांमुळे पसरणारा एक सामान्य रोग आहे. हे प्लास्मोडिअम नावाच्या परजीवीमुळे होते. डास हे रोगवाहक म्हणून कार्य करतात. हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. मादा डास चावल्याने या परजीवीचे प्रसार होते आणि ताप, डोकेदुखी आणि उलटीसारख्या फ्लूसदृश लक्षणांमुळे या रोगाचे निदान होते. निदान झाल्यास आणि वेळेवर उपचार केल्यास हा रोग पूर्णपणे बरा होतो. रोगनिदान आणि उपचारांमध्ये उशीर झाल्यामुळे मात्र गंभीर गुंतागुंत होऊ शकते. मलेरिआमुळे होणार्र्या बहुतांश मृत्यू उपयुक्त निदानसुविधा आणि योग्य उपचारांच्या अभावी होतात. याचे 5 प्रकार आहेत. प्लास्मोडियम परजीवीमुळे मलेरिआ होतो.मलेरिआचे कारण असलेल्या इतर चार प्रकारांपैकी प्लाझोमोडियम फाल्सीपेरम हे दरवर्षी सुमारे 9 0% मलेरिआ मृत्यूंसाठी जबाबदार आहे.

हिवताप ची लक्षणे - Symptoms of Malaria in Marathi

मलेरिआची लक्षणे दोन प्रकारची असतात - सामान्य आणि गंभीर.

गुंतागुंत नसलेल्या मलेरिआची लक्षणे

गुंतागुंतीशिवायही मलेरिआमध्ये सामान्यतः मलेरिआची सर्व विशिष्ट लक्षणे असतात, परंतु ही लक्षणे गंभीर स्वरुपाच्या संक्रमणाच्या लक्षणांसह शरिराच्या आवश्यक अंवयवांची हानी करतात.

उपचार न केल्यास मलेरिआ गंभीर रूप घेऊ शकतो. एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असल्यासही गंभीर मलेरिआ तिला होऊ शकतो. मलेरिआची लक्षणे 6 ते 10 तासांच्या कालावधीसाठी असतात आणि नंतर दर दुसर्र्या दिवशी परत दिसतात. ही लक्षणे परजीवीच्या प्रकाराप्रमाणें वेगवेगळी असू शकतात आणि कधीकधी मिश्रित लक्षणेही होऊ शकतात.

गुंतागुंत नसल्यास मलेरिआमध्ये असलेली लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • कपकपीसह थंडी वाजणें.
  • अतीप्रमाणात ताप, डोकेदुखी , आणि उलटी होणे .
  • कधीकधी तरुण रुग्णांना आकड्या येऊ शकतात .
  • घाम आल्यानंतर ताप जातो आणि थकवा व गळून गेल्याची जाणीव होते. (अधिक वाचा - थकवा )

तीव्र मलेरियाचे लक्षणे

गंभीर मलेरिआमधील लक्षणांमुळे शरिराच्या महत्त्वपूर्ण अवयवांना नुकसान पोचू शकतो.

गंभीर मलेरिआची काही लक्षणे आहेत:

  • ताप आणि कपकपी
  • कमी जागरूकता आणि जागृतपणासह शुद्धीच्या समस्या.
  • उताण्या (छाती खाली आणि पाठ वर करून पडणे)स्थितीत झोपण्याची इच्छा.
  • खोल श्वास आणि श्वास घेण्यात अडचण.
  • रक्तक्षयाची लक्षणे थकल्यासारख्या आणि सामान्य अशक्तपणा जाणवणें.
  • कावीळची लक्षणे, उदा. डोळे आणि नखांचे रंग पिवळसर होणें आणि अतिशय पिवळ्या रक्ताची लघवी होणें.

गंभीर मलेरियाचा उपचार न झाल्यास व्यक्ती मरणही पावू शकते.

मलेरिआची लक्षणे सामान्य फ्लू किंवा विषाणू संक्रमणातील लक्षणांसारखी असल्यामुळे, मलेरिआची शक्यता नसलेल्या लोकांमध्ये निदान करणे कठीण आहे.

हिवताप चा उपचार - Treatment of Malaria in Marathi

मलेरिआरोधी औषधांची विभागणी मलेरिआरोधी क्रियाकलाप आणि रासायनिक संरचनेप्रमाणें केली जाते, उदा.

  • टिशू स्किझोन्टिझाइड
    हे औषधे यकृतात असलेल्या परजीवीवर कार्य करतात आणि त्यांना वाढण्यापासून प्रतिबंधित करतात. मलेरिआवर सामान्यतः या औषधांद्वारे उपचार केला जाऊ शकत नाही, कारण परजीवी वाढल्यानंतर आणि लाल रक्तपेशींचा विनाश सुरू झाल्यानंतर मलेरिआची लक्षण दिसून येतात. लक्षणे सुरू होण्याआधी संक्रमणाची शक्यता वर्तवणें व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे.
  • रिलॅप्ससाठीच्या टिशू स्किझोन्टिझाइड 
    मलेरिच्या पुनरुत्थानाच्या उद्दीपनासाठी कारणीभूत यकृतातील काही परजीवींच्या डागांव रही औषधे कार्य करतात.
  • ब्लड स्किझोन्टिझाइड
    हे औषधे परजीवीच्या रक्त स्वरूपावर कार्य करत असून, मलेरिआच्या विरोधातील सर्वांत महत्त्वाची औषधे आहेत.
  • गॅमटोसायटोझाइड 
    हे औषधे रक्तातील लैंगिकदृष्ट्या परिपक्व परजीवीवर कार्य करतात आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीला चावणार्र्या इतर डासांपर्यंत संक्रमण पसरणें टाळतात. या श्रेणीतील काही औषधे सर्व प्रकारच्या मलेरिआच्या विरोधात प्रभावी आहेत तर इतर औषधे केवळ विशिष्ट प्रकारच्या परजीवींवरच कार्य करतात.
  • स्पोरोन्टोसाइडस 
    हे औषधे मच्छरांमध्ये ऑओसिस्ट्सची निर्मिती थांबवतात आणि संक्रमणाचा प्रसार थांबवतात.
  • कंबिनेशन थेरपी 
    हा एक प्रभावी मलेरिआ उपचार ज्यामध्ये औषधे एकाच वेळी यकृत आणि रक्तातील परजीवींवर कार्य करून संक्रमणाचे पसारही थांबवतात. विविध औषधांचा संयोजन थेरपीमध्ये समावेश आहे. हे दोन किंवा त्यापेक्षा जास्त औषधांचा एकाच वेळी वापर केला जातो ज्यायोगे त्या परजीवीच्या वेगवेगळ्या भागांना लक्ष करतात. अशा प्रकारच्या उपचारांमुळे उपचारांचा काळावधी कमी होतो आणि उद्भवणार्र्या प्रतिरोधक परजीवींचे जोखीम कमी होते.

विहित औषधांचे संयोजन अनेक घटकांवर अवलंबून असते, उदा. संक्रमणाचे प्रकार, संक्रमणाची तीव्रता, रुग्णाची शारीरिक स्थिती आणि संबंधित परिस्थिती आणि रोग. पी. फाल्सीपेरम पासून संक्रमित लोकांची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे, कारण ते तुळनेने गंभीर आहे आणि त्याने मलेरिआरोधी औषधांवर प्रतिकार करण्याची शक्यता आहे. गरोदर असलेल्या रुग्णाला औषधांचे वेगळे संयोजन देणें आवश्यक आहे, कारण काही मलेरिआरोधी औषधे गरोदर स्त्रियांसाठी उपयुक्त नाहीत. डॉक्टरांनी वैद्यकीय अवस्थेची तपासणी करणे आवश्यक आहे, उदा. अपस्मार , हृदय रोग , मूत्रपिंड निकामी होणें आणि त्वचारोग, कारण या रुग्णांना औषधाचे वेगळे संयोजन किंवा वेगळी परिणामकारकता असलेली औषधे हवी असतात.

जीवनशैली व्यवस्थापन

काही जीवनशैली जे व्यक्तींना डासांशी अनावृत्त करतात आणी उपचार न केल्यास संक्रमणास कारणीभूत ठरतात. डासांच्या किमान किंवा शून्य अनावरणामुळे संक्रमण होण्याचा धोका कमी आणि नष्टही होतो. डासांच्या अनावरणाचे निवारणाव्यतिरिक्त, मलेरिआच्या संसर्गामध्ये जीवनशैलीची फारच कमी भूमिका असते.

हिवताप काय आहे - What is Malaria in Marathi

दरवर्षी 800,000 हून अधिक मृत्यूसाठी मलेरिआ जबाबदार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार मलेरिआ प्रत्येक 45 सेकंदात एका मुलाचे प्राण घेण्याचा जबाबदार आहे. रोगाला लांबलचक इतिहास असून म्हणून लवकर ख्रि.पू. 6000 मध्येही या प्रकारच्या तापाच्या लागणीच्या नोंदी आहेत. विशेषतः उष्ण कटिबंधांमध्ये , आणि असेही हे एक सामान्य आणि व्यापक आजार आहे.

मलेरियाचा जन्म आफ्रिकेत झाला आहे, जिथपासून ते जगभरात पसरले आहे. मानवजातीला प्रभावित करणारे सर्वात वाईट रोग म्हणून मलेरिआचा उदय होत आहे. संशोधनाअंती असे दिसून आले आहे की, मलेरिआच्या सर्व प्रजाती कदाचित मोठ्या लंगुरापासून मनुष्यामध्ये स्थलांतरित झाली आहेत. पी. फाल्सीपेरम हे प्रकार गोरिल्लापासून जन्मलेले मानले जाते. दरवर्षी 50 कोटी मलेरिआची प्रकरणे जगभर आढळतात, ज्यांपैकी 85% उप-सहारा आफ्रिकेत होतात आणि आफ्रिका मध्ये उद्भवणार्र्या मलेरियाच्या सर्व प्रकरणांपैकी 85% पी . फाल्सीपेरम च्या एका डागाने होतात.

मलेरिआ म्हणजे काय?

मलेरिया हा एक सामान्य आजार आहे,जो जीवघेणा असू शकतो. आफ्रिका, आशिया व दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण देशांच्या बर्र्याच देशांमध्ये तो पसरलेला आहे. तो प्लास्मोडिअम या परजीवीमुळे होतो. प्लास्मोडिअमच्या पाच प्रजातींमुळे मलेरिआ होऊ शकतो म्हणजेच पी. फाल्सीपरम , पी. व्हिवॅक्स , पी. ओव्हल , पी. नाउल्स आणि पी. मलेरिए. एनोफिल्स या मादा डासाच्या( जे या रोगाचे वाहक असते)चाव्याव्दारे मनुष्यांमध्ये पसरते. एकदा परजीवीने मानवाच्या रक्तप्रवाहात प्रवेश करते, तेव्हा ते वाढते आणि यकृतामध्ये त्याची संख्या वाढते आणि नंतर लाल रक्तपेशींना संक्रमित करून नष्ट करू लागतो.



संदर्भ

  1. Vicki Symington. Malaria – A Global Challenge. The Society for General Microbiology [Internet]
  2. Alessandro Bartoloni, Lorenzo Zammarchi. Clinical Aspects of Uncomplicated and Severe Malaria. Mediterr J Hematol Infect Dis. 2012; 4(1): e2012026. PMID: 22708041
  3. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Malaria
  4. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Malaria .
  5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Malaria Diagnosis (United States)
  6. Alessandro Bartoloni, Lorenzo Zammarchi. Clinical Aspects of Uncomplicated and Severe Malaria. Mediterr J Hematol Infect Dis. 2012; 4(1): e2012026. PMID: 22708041

हिवताप साठी औषधे

Medicines listed below are available for हिवताप. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.