myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

बरगड्यांमधील वेदना म्हणजे काय?

बरगड्यांच्या एका किंवा दोन्ही बाजूस वेदना होणे याला बरगड्या दुखणे असे म्हणतात. ह्या वेदना एकाच वेळेस एका किंवा त्यापेक्षा जास्त बरगड्यांमधे होऊ शकतात.

याच्याशी निगडीत प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

बरगड्यांमधील वेदनांमध्ये छातीत दुखते त्याशिवाय इतरही काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात जसे:

 • कोस्टोकॉंड्रॉइटीसच्या बाबतीत बरगड्यांच्या पिंजऱ्याला सूज येउन त्याचा दाह होतो आणि छातीच्या भागात टेंडरनेस येतो. बरगड्यांच्या वरच्या बाजूला आणि स्टर्नमच्या जवळ वेदना जाणवतात. याची गंभीरता वाढल्यास शरीराच्या खालील भागातही सतत वेदना होऊ लागतात. अशी लक्षणे दिसू लागल्यास त्वरित वैद्यकिय मदत घ्यावी.
 • त्याचप्रमाणे छातीची भिंत आणि फुफ्फुसे यांच्या मधील पडद्याचा दाह होणे याला प्लुरसी म्हणतात. वेदना होणे हे याचे महत्त्वाचे लक्षण आहे. हा त्रास सहसा आपोआपच कमी होतो पण काही वेळा ॲंटीबायोटीक उपचारांची गरज भासते. त्याशिवाय ब्रॉंकायटीस म्हणजेच श्वास्नलिकेचा दाह होणे यामुळेही बरगड्यांच्या आसपास वेदना होतात.
 • फुफ्फुसाच्या कर्करोगामुळेही बरगड्यांच्या किंवा छातीच्या आसपासच्या भागात वेदना होतात. हसण्यामुळे किंवा खोकल्यामुळे या वेदना अतिशय त्रासदायक होतात. यामुळे व्हीजींग, फ्लेगम किंवा श्वास घेण्यास अडचण यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
 • फायब्रोमायल्जीया असल्यास वेदना या जळजळीत किंवा खुपल्यासारख्या किंवा अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात.

याची प्रमुख कारणं काय आहेत?

बरगड्यांमधे वेदना होण्याची कारणे सर्वसामान्य ते दुर्मिळ अशा प्रकारात मोडतात. यामुळे छातीत दुखणे वाढते तसेच त्याबरोबर पोटदुखी आणि तापही येतो. सर्वसामान्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

 • कोस्टोकॉंड्रॉइटीस.
 • थोरॅसिक स्पाईनमधे वेदना.
 • स्टेरनॅलीस सिंड्रोम - हा एक दुर्मिळ प्रकारचा सिंड्रोम आहे ज्यात छातीच्या भिंतीमध्ये वेदना होतात.
 • एखादी इजा झाल्यामुळे, खेळ, अपघात, हल्ला किंवा पडल्यामुळे बरगड्या मोडणे.

दुर्मिळ अशी कारणे म्हणजे:

 • स्ट्रेस फ्रॅक्चर्स.
 • रुमेटॉइड (हाडांमधे किंवा सांध्यान्मध्ये सूज येणे किंवा वेदना होणे) फॅक्टर्स.
 • फायब्रोमायल्जीया - स्नायूदुखी आणि सांधेदुखी तसेच कडकपणा.
 • सिकल सेल ॲनिमिया - सिकलच्या आकाराच्या लाल रक्तपेशीन्मुळे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होणे.
 • पॉलीकॉंड्रायटीस - कार्टीलेजचा दाह किंवा सूज येणे.
 • ऑस्टिओपोरायसीस - मेनॉपॉजनंतर हाडांची घनता कमी होणे.
 • लुपस एरीथिमॅटोसस - ऑटोइम्युन कंडिशन.
 • स्लिपिंग रिब सिंड्रोम - हा एक दुर्मिळ प्रकार आहे ज्यात खालच्या बाजूच्या बरगड्यांचा कार्टिलेज घसरतो ज्यामुळे वेदना होतात.
 • ट्युमर्स.
 • गॉलस्टोन.
 • प्ल्युरसी.
 • पल्मनरी एंबॉलिजम.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

वरील प्रकार लक्षणांवरून लक्षात येतात. यासाठी डॉक्टर विविध प्रकारच्या चाचण्या करून घेण्यास सुचवतात जसे की छातीचा एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआय, सी-रिॲक्टीव्ह प्रोटीन लेव्हल्स इत्यादी ज्यामुळे अचूक कारण शोधून काढता येते. याशिवाय डॉक्टर पुढील काही गोष्टीही सुचवू शकतात:

 • ॲनल्जेसिक किंवा वेदनाशामक औषधे.
 • काही काळापुरता शारिरीक ताण टाळणे.
 • उष्ण / थंड पॅक उपचार
 • फिजीओथेरपी
 • कॉर्टीकोस्टेरॉइड उपचार

गंभीर प्रकारात कॅंसर किंवा मोडलेल्या बरगड्यांसाठी डॉक्टर विशिष्ट उपचार सुचवतात.

 1. बरगड्यांमधील वेदना साठी औषधे
 2. बरगड्यांमधील वेदना चे डॉक्टर
Dr. Deep Chakraborty

Dr. Deep Chakraborty

Orthopedics
10 वर्षों का अनुभव

Dr. Darsh Goyal

Dr. Darsh Goyal

Orthopedics
10 वर्षों का अनुभव

Dr. Vinay Vivek

Dr. Vinay Vivek

Orthopedics
6 वर्षों का अनुभव

Dr. Vivek Dahiya

Dr. Vivek Dahiya

Orthopedics
26 वर्षों का अनुभव

बरगड्यांमधील वेदना साठी औषधे

बरगड्यांमधील वेदना के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Brufen खरीदें
Combiflam खरीदें
Ibugesic Plus खरीदें
Tizapam खरीदें
Brufen MR खरीदें
Espra XN खरीदें
Lumbril खरीदें
Tizafen खरीदें
Endache खरीदें
Fenlong खरीदें
Ibuf P खरीदें
Ibugesic खरीदें
Ibuvon खरीदें
Ibuvon (Wockhardt) खरीदें
Icparil खरीदें
Maxofen खरीदें
Tricoff खरीदें
Acefen खरीदें
Adol Tablet खरीदें
Bruriff खरीदें
Emflam खरीदें
Fenlong (Skn) खरीदें
Flamar खरीदें

References

 1. National Health Service [Internet]. UK; Broken or bruised ribs.
 2. Department of Health Chest injuries and rib fractures. Government of Western Australia [Internet]
 3. Minerva Med. 1975 Aug 18;66(54):2679-89. PMID 1153118
 4. Australian Family Physician [Internet] The Royal Australian College of General Practitioners; Musculoskeletal chest wall pain
 5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Rib injuries
 6. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Ribcage pain
 7. healthdirect Australia. Costochondritis. Australian government: Department of Health
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें