यूव्हिटिस - Uveitis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 02, 2019

July 31, 2020

यूव्हिटिस
यूव्हिटिस

यूव्हिटिस काय आहे?

यूव्हीआ मध्ये (डोळाचा मधला स्तर) आणि आसपासच्या टिश्यूंमधील  सूज किंवा जळजळीला यूव्हिटिस म्हटले जाते. यामुळे एक किंवा दोन्ही डोळे प्रभावित होऊ शकतात. वेळेत उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते. यूव्हीआ ज्या भागात प्रभावित झाला आहे त्यावर आधारित याचे 3 प्रकार आहेत - पुढील (पूर्ववर्ती), मध्य (मध्यवर्ती) आणि मागील(पोस्टेरीया). काही प्रकरणांमध्ये, सर्व 3 स्तर प्रभावित होतात. हे अचानक आणि अल्पकालीन (अक्यूट) असू शकते किंवा दीर्घ काळ टिकू शकते (क्रोनिक).

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

काही सामान्य चिन्हे आणि लक्षणे पुढील प्रमाणे आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

यूव्हिटिसचे अचूक कारण अज्ञात आहे. हे सामान्यतः ऑटोइम्यून परिस्थितीत दिसून येते जेथे शरीराची  प्रतिरक्षा प्रणाली डोळ्यांसह विविध टिश्यूंवर हल्ला करते.

काही योगदानात्मक कारणे खालील प्रमाणे आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

संभाव्य स्पष्ट किंवा धूसर स्वरुपात डोळ्यात काही आहे का, याची  डॉक्टर शारीरिक तपासणी करतात. काही चाचण्यासुद्धा केल्या जातात, जसे:

 • साध्या रक्ताच्या चाचण्यांद्वारे पांढऱ्या रक्त पेशींची संख्या आणि प्रथिनांची पातळी तपासणे.
 • तपशीलवार शारीरिक तपासणीसह संपूर्ण वैद्यकीय इतिहास नोंदवणे.
 • त्वचेची तपासणी.
 • डोळ्यांच्या द्रवांचे परीक्षण.

निदानानंतर, रुग्णाचे  वेगवेगळ्या पद्धतींनी उपचार केले जातात, जसे की:

 • कॉर्टिकोस्टेरॉईड औषधे जळजळ कमी करण्यात मदत करतात.
 • मिड्रियाटिक आय ड्रॉप्स बुबुळ विस्तारित करण्यात मदत करतात.
 • संसर्ग झाल्यास अँटीबायोटिक्स संसर्ग नियंत्रित करतात.
 • जर दृष्टी जाण्याची शक्यता असेल तर इम्यूनोसप्रेशन्स लिहून दिले जातात.
 • प्रकाशाच्या संवेदनशीलते विरुद्ध गडद रंगाचा चष्मा उपयुक्त ठरू शकतो.संदर्भ

 1. Cleveland Clinic. [Internet]. Cleveland, Ohio. Uveitis: Management and Treatment
 2. American Academy of Ophthalmology [internet] California, United States; Uveitis Diagnosis.
 3. National Eye Institute. Uveitis. National Institutes of Health
 4. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Eyes - uveitis
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Uveitis

यूव्हिटिस साठी औषधे

यूव्हिटिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।