रूबडोमोसोर्सकोमा - Rhabdomyosarcoma in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 04, 2019

March 06, 2020

रूबडोमोसोर्सकोमा
रूबडोमोसोर्सकोमा

रूबडोमोसोर्सकोमा काय आहे?

रूबडोमोसोर्सकोमा (आरएमएस) हा स्नायू पेशींच्या अगदी सुरुवातीच्या स्वरूपाचा कॅन्सर आहे, सामान्यपणे कंकालाचे (स्वेच्छेने) स्नायू, जे शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतात. हा शरीरात कुठेही आढळत असला तरी  (जरी तिथे कंकालाचे स्नायू नसतात अशा ठिकाणीही) मुख्यत्वे डोके आणि मानेचा भाग, मूत्र आणि पुनरुत्पादक अवयव, हातपाय आणि धडात जास्त प्रमाणात आढळतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

रूबडोमोसोर्सकोमा (आरएमएस) ची चिन्हे आणि लक्षणे व्यक्तिपरत्वे वेगळे असतात आणि आकार, मर्यादा आणि स्थान यावर अवलंबून असतात. काही चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

जरी रूबडोमोसोर्सकोमाचे मुख्य कारण अज्ञात असले, तरी तो अनुवांशिक विकाराशी संबंधित असल्याचे मानले जाते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर कोणत्याही लक्षणांची तपासणी करण्यासाठी पूर्ण शारीरिक तपासणी करून लक्षणांचा पूर्ण इतिहास घेतील. डॉक्टर खालील चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात:

 • रक्त तपासणी, ज्यात समाविष्ट आहे:
  • पूर्ण रक्त गणना (सीबीसी).
  • रक्तातील रसायनं.
 • ट्युमर असल्यास आणि ट्यूमरचा उपचार करण्यासाठी प्रभावीपणे परीक्षण करण्यासाठी इमेजिंग चाचण्या. या चाचण्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
  • एक्स-रे.
  • अल्ट्रासाऊंड.
  • कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन.
  • मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय).
  • एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड स्कॅन (ईयूएस).
  • पीईटी (पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी) स्कॅन.
 • हिस्टोपॅथॉलॉजी, ज्यात विविध प्रकारच्या बायोप्सी समाविष्ट आहे, जसे की:
  • कोअर नीडल बायोप्सी.
  • फाइन नीडल ॲस्पिरेशन (एफएनए) बायोप्सी.
  • बोनमॅरो ॲस्पिरेशन आणि बायोप्सी.
 • लंबर पँचर (स्पायनल टॅप).

रूबडोमोसोर्सकोमासाठी उपचार ट्यूमरचा आकार आणि शरीराचा भाग आणि व्यक्तीच्या वयासह अनेक घटकांवर अवलंबून असतो. विविध उपचार पद्धतींमध्ये खालील बाबी समाविष्ट असतात:

 • किमोथेरपी विविध उपचारात्मक एजंट्स वापरून.
 • शस्त्रक्रिया ज्यामध्ये ट्यूमर किंवा प्रभावित भाग काढला जातो.
 • रेडिओथेरपी किंवा प्रोटॉन बीम थेरपी.संदर्भ

 1. American Cancer Society [Internet] Atlanta, Georgia, U.S; What Is Rhabdomyosarcoma?
 2. Kaseb H, Babiker HM. Cancer, Rhabdomyosarcoma. [Updated 2019 Mar 21]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
 3. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Childhood Rhabdomyosarcoma Treatment (PDQ®)–Patient Version.
 4. Shern JF, Yohe ME, Khan J. Pediatric Rhabdomyosarcoma. Crit Rev Oncog. 2015;20(3-4):227-43. PMID: 26349418
 5. American Cancer Society [Internet] Atlanta, Georgia, U.S; About Rhabdomyosarcoma.