धातु रोग - Dhat Syndrome in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

March 22, 2019

September 10, 2020

धातु रोग
धातु रोग

सारांश

स्पर्मेटोरिआ म्हणजे असे लैंगिक रोग की ज्यामध्ये पुरुषांना अनैच्छिक वीर्यपतन होतो म्हणजेच कोणत्याही लैंगिक हालचालीशिवाय वीर्यपतन होतो. स्पर्मेटोरिआची काही कारणे म्हणजे भावनात्मक असंतुलन आणि मद्यपान. काही पुरुषांचे झोपेत वीर्यपतन होते. वारंवार स्पर्मेटोरिआ एखाद्या पुरुषाच्या शरिरावर विपरीत प्रभाव पाडू शकतो. संशोधकांचा असा विश्वास आहे की, स्पर्मेटोरिआ शरिरात अतिरिक्त शुक्राणू उत्पादन झाल्याने होतो. तथापी, या निष्कर्षाप्रत येणारे संशोधन अद्याप काही झालेले नाही. पुरुषांना बहुतांश प्रसंगांमध्ये किशोरावस्थेत स्पर्मेटोरिआ होतो, कारण या वयात शरिरात हार्मोन वाढून वीर्य उत्पादनात वाढ होते. स्पर्मेटोरिआमध्ये, अतिरिक्त वीर्य वीर्यपतन याद्वारे शरिरातून गळतो.

धातू काय आहे - What is Dhat Syndrome in Marathi

स्पर्मेटोरिआ म्हणजे लिंग ताठ झाल्याशिवाय किंवा चरमबिंदू प्राप्त झाल्याशिवाय (कोणतीही लैंगिक कृती न होता) झालेले अनैच्छिक वीर्यपतन. स्पर्मेटोरिआ झोपेत एखाद्या उत्तेजक स्वप्नात झाल्यास, त्याला स्वप्नदोष म्हणतात. स्पर्मेटोरिआमध्ये झालेल्या गळतीतील शुक्राणू इतर उत्सर्गांपेक्षा भिन्न असतात. शुक्राणू म्हणजे वीर्यातील घटक, जे महिलांमधील अंडांचे उर्वरीकरण करण्यास जवाबदार असतात व त्यामुळे महिला गरोदर होते.

धातू ची लक्षणे - Symptoms of Dhat Syndrome in Marathi

स्पर्मेटोरिआमध्ये पाहिली जाणारी सामान्य लक्षणे याप्रमाणे:

 • लक्ष कमी होणें किंवा एकाग्रता कमी होणें.
 • भूक न लागणें किंवा भूक कमी होणें.
 • पाठ दुखणें.
 • थकवा
 • अवसाद होणें
 • गोष्टी व वस्तूंची स्मृती कमी होणें.
 • डोळे निस्तेज होणें.
 • रात्रीत घाम येणें.
 • अंडकोष यांभोवती घाम येणें.
 • आर्द्र व गरम त्वचा.
 • गरम व आर्द्र पायाचे तळवे व तळहात.
 • पेरिनिअम (अंडकोषांवरील त्वचा म्हणजेच स्क्रोटम आणि गुदाशयामधील भाग) किंवा अंडकोषांमध्ये वेदना.

धातू चा अटकाव - Prevention of Dhat Syndrome in Marathi

स्पर्मेटोरिआचे निवारण करण्याच्या काही स्पष्ट पद्धती नाही, पण तुम्ही शुक्राणूंचे कार्य व गुणवत्ता सुधारण्यासाठी योगाभ्यास करू शकतात. आयुर्वेदिक चिकित्सकांद्वारे सुचवलेले वनस्पतीजन्य उपाय आणि घरगुती उपायही स्पर्मेटोरिआच्या निवारणामध्ये मदतशीर असतात. यांपैकी काही खालील भागांमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत.

धातू चा उपचार - Treatment of Dhat Syndrome in Marathi

स्पर्मेटोरिआ रात्रीत होत असल्यास, उपचाराची गरज नाही. या घटना सामान्यपणें 20च्या वयानंतर घटतात. रात्रीतील असे वीर्यपतन, संभोग किंवा हस्तमैथुन कमी झाल्यास, वारंवार होऊ शकतात. स्पर्मेटोरिआच्या कारणानुसार औषधे विहित केली जातात. स्पर्मेटोरिआच्या उपचारामध्ये वनस्पतीजन्य औषधे उपयोगी असतात.

स्पर्मेटोरिआचे व्यवस्थापन करू शकणारे खाद्यपदार्थ अननास, आळू आणि मुळा असलेल्या भाज्या उदा. आले आणि कांदे, घेऊ शकता.

स्पर्मेटोरिआवरील वनस्पतीमय उपाय याप्रमाणे आहेत:

 • रात्रभर भिजवलेले बदामासह एक पेला दूध घेणें.
 • दोन ते मात्रा केशर घालून एक पेला कोमट दूध घेणें.
 • दररोज तीन ते चार तुकडे लसूण चावणें.
 • बकरीच्या कोमट दुधाबरोबर अश्वगंधा, बाला आणि विदरचे मिश्रण घेणें (बकरीचे दूध गायीच्या दुधापेक्षा अधिक प्रभावी असतो, पण ते उपलब्ध नसल्यास गायीचे दूधही चालेले) .
 • दररोज एक चमचा शतावरी चूर्ण एक कप उकळलेल्या पाण्यात घेणें.
 • दररोज एक चमचा लाजवंती चूर्ण दुधासह घेणें.

जीवनशैली व्यवस्थापन

स्पर्मेटोरिआचे व्यवस्थापन करण्यासाठी अशाप्रकारे काळजी घ्यावी:

 • रात्री हलके जेवण घ्या.
 • रात्री झोपतांना शक्यतो कडक उशी वापरा.
 • झोपतांना घट्ट अंतर्वस्त्र किंवा कपडे घालू नका.
 • भरपूर कच्च्या ताज्या भाजी आणि फळे असलेले पोषक व संतुलित आहार घ्या.
 • मद्यपानावर मर्यादा ठेवा.
 • गजर लावून सकाळी लवकर उठा, कारण स्पर्मेटोरिआ शक्यतो सकाळच्या काही तासांमध्ये/पहाटेनंतर होतो.
 • जननेंद्रियांच्या आजूबाजूचे भाग स्वच्छ ठेवा.
 • बद्धकोष्ठता असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • ओटीपोटीचे व्यायाम तेथील स्नायूंना बळकट करून स्पर्मेटोरिआचे व्यवस्थापन करतात. पांच सेकंदासाठी तुमच्या ओटीपोटीच्या स्नायू (अमाशय, पोट आणि मूत्रनलिकेला आधार देणारे स्नायू) आकुचून ठेवा. आकुचन पाच सेकंद ठेवून पाच सेकंद सोडा. असे करतांना श्वसन सामान्य ठेवा. हे व्यायाम 10 वेळापर्यंत करा. असे करत असतांना गैरसोय होत असल्यास, थोडा वेळ विश्रांती घय आणि परत प्रयत्न करा.
 • मसालेदार जेवण टाळा.
 • थंड पाण्याने आंघोळ करा.
 • झोपण्यापूर्वी पोट रिकामे करा.
 • मन वळवण्यासाठी व मन गुंतवून ठेवण्यासाठी चांगली पुस्तके वाचण्याची व संथ संगीत ऐकण्याची सवय लावा.


संदर्भ

 1. Science Direct (Elsevier) [Internet]; Spermatorrhea
 2. Killick SR, Leary C, Trussell J, Guthrie KA. Sperm content of pre-ejaculatory fluid. Hum Fertil (Camb). 2011 Mar;14(1):48-52. PMID: 21155689.
 3. Ege C Serefoglu ,Theodore R Saitz. New insights on premature ejaculation: a review of definition, classification, prevalence and treatment. Asian J Androl. 2012 Nov; 14(6): 822–829.PMID: 23064688
 4. Aida Saihi MacFarland, Mohammed Al-Maashani, Qassim Al Busaidi, Aziz Al-Naamani, May El-Bouri, and Samir Al-Adawi. Culture-Specific Pathogenicity of Dhat (Semen Loss) Syndrome in an Arab/Islamic Society, Oman. Oman Med J. 2017 May; 32(3): 251–255.PMID: 28584609.
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Erectile Dysfunction

धातु रोग चे डॉक्टर

Dr. Abdul Haseeb Sheikh Dr. Abdul Haseeb Sheikh Sexology
8 वर्षों का अनुभव
Dr. Srikanth Varma Dr. Srikanth Varma Sexology
8 वर्षों का अनुभव
Dr. Pranay Gandhi Dr. Pranay Gandhi Sexology
10 वर्षों का अनुभव
Dr. Tarun Dr. Tarun Sexology
8 वर्षों का अनुभव
डॉक्टरांचा सल्ला घ्या

धातु रोग की जांच का लैब टेस्ट करवाएं

धातु रोग के लिए बहुत लैब टेस्ट उपलब्ध हैं। नीचे यहाँ सारे लैब टेस्ट दिए गए हैं:

टेस्ट का नाम