myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

ग्रीन टी

पूर्वी जनतेला माहीत नसलेली ग्रीन टी आज लाखो लोकांसाठी आवश्यक सकाळच्या सवयींपैकी एक बनली आहे. ज्या सटीकतेने ती आमच्या जीवनात बसते, त्याने सौंदर्यमूल्यापेक्षा आरोग्यास वाव देणारे पेय म्हणून तिला स्थान दिले आहे. मी तुम्हाला आव्हान देऊ शकतो की, मला त्याच्या फायद्यांची माहिती असून ही मी ते का घेत नाही, अशी भावना तुमच्यात नक्कीच असेल. तुम्हाला जरी तिची चव आवडत नसली, तरी तुम्ही नकार देऊ शकत नाही, की हा चहा, जवळपास प्रत्येक घरात या पेयाला जागा मिळालेली आहे.

तुम्हाला माहीत होते का?

या चहाचे मूळ प्राचीन चीनमध्ये सहस्त्रो वर्षे जुने आहे. पौराणिक सम्राट शेन्नोंग यांनी  “अपघाताने” आणि घटनांच्या एका रुचिकर शृंखलेमध्ये त्याचे शोध लावलेले असल्याचे सांगितले जाते. अजून रोचक बाब म्हणजे, शेन्नोंगला "चीनी औषधाचा जनक" ही मानले जाते. मग, हा वास्तविक अपघात होता की योग्यप्रकारे विचार केलेला सूत्र? याचे उत्तर शोधण्यासाठी कुठेतरी चहाप्रेमींना इतिहास खंगाळावा लागणार आहे. चीनमधून, चहा संस्कृती जपानमध्ये पसरली आणि लगेच ती संपूर्ण विश्वाचा फेरा मारण्यासाठी निघाली. भारतामध्ये, चहाचा वास्तविक इतिहास तेवढा स्पष्ट नाही. माहिती असल्यापासून, जंगली चहा (ग्रीन टी) ब्रिटिश ईस्ट इंडिआ कंपनीद्वारे व्यवसायीकरण झाल्यापूर्वी भारतात घेतले जात होते.

 1. ग्रीन टीचे प्रकार आणि वापर - Green tea types and use in Marathi
 2. ग्रीन टी कशी बनवावी - How to make green tea in Marathi
 3. ग्रीन टीचे फायदे - Benefits of green tea in Marathi
 4. ग्रीन टीचे सहप्रभाव - Green Tea Side Effects in Marathi
 5. आपण एका दिवसात किती कप ग्रीन टी घेऊ शकता? - How many cups of green tea can be taken per day in Marathi?

आम्हा सर्वांना ग्रीन टीबद्दल हे प्रश्न असेल की आपल्याला हा चहा कुठून मिळतो? ग्रीन टी काय आहे? इतर चहा ग्रीन टीपेक्षा वेगळा कसा असतो? तो तुमच्या नियमित चहापेक्षा बेहत्तर असतो का? जर बरोबर आहे, तर कसे? चला एक एक करून तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की सर्व प्रकारचा चहा कॅमिलिआ सिनेसिस किंवा सामान्यरीत्या “टी प्लांट” नांवाच्या वनस्पतीपासून बनवला जातो. हे अंतर कच्चे चहाची पाने झालेलय ऑक्सिडेशनच्या स्तरापासून उमटतो. आदर्श काळा चहा ऑक्सिडाइझ्ड असतो आणि ग्रीन टी अनऑक्सिडाइझ्ड असते. प्रसिद्ध ओलोंग चहा आंशिकरीत्या ऑक्सिडाइझ्ड असतो, तर चहाच्या काही प्रजाती फर्मेंट असतात, पण नेहमी ऑक्सिडाइझ्ड (प्युअर टी) असते.

आता, ऑक्सिडेशन ही जीवशास्त्रीय संज्ञा चहाला समजून घेण्यास आड येत आहे का? चला समजून घेऊ. ऑक्सिडेशन म्हणजे खाद्यपदार्थाद्वारे प्राणवायूचे अवशोषण आहे, ज्याद्वारे खाद्यपदार्थाची, या प्रसंगात कच्च्या चहाच्या पानांचे जैवरसायनशास्त्र बदलते। कापून सोडल्यानंतर सफरचंद तपकिरी का पडतात, याकडे कधी लक्ष दिले आहे का? तरीही, चहा बनवण्याच्या बाबतीत, ऑक्सिडेशन आंशिकपणें नैसर्गिक होतो आणि आंशिकपणें खोल्यांचे तापमान आणि आर्द्रता यांचे पर्यवेक्षण करून नियंत्रित स्थितींमध्ये केले जाते. एकदा ही पाने एका ठराविक ऑक्सिडेशन पातळीपर्यंत पोचली की, ही प्रक्रिया विशिष्ट तापन कार्यपद्धतीद्वारे बंद केली जाते. तरीही, ऑक्सिडेशन एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि पूर्णपणें ती थांबवता येत नाही, पण तिची गती कमी करून चहाचा साठवणूक अवधी वाढवता येऊ शकतो.

तुमचा नियमित चहा सामान्यपणें काळा चहा असतो, ज्यामध्ये दूध आणि साखर टाकलेले असतात. असे काही लोक आहेत, ज्यांचा दावा आहे की दूध आणि साखर टाकल्याने तुमच्या आरोग्याल काही नुकसान पोचत नाही, पण त्यापलीकडे विपरीत दावासुद्धा विद्यमान आहे. म्हणून, शास्त्रीय पुराव्यांच्या अभावी, आम्ही पोषणतज्ञाला तपासू शकतो की तुमच्या शरिराच्या प्रकाराशी अधिक साजेसे काय असेल.

वनस्पती चहा चहाच्या रोपाऐवजी हिबिस्कस, जॅस्मिन, कॅमोमाइलसारख्या वनस्पतींनी तयार केल्या जातात. म्हणून, त्यांना ग्रीन टी म्हणता येत नाही. तथापी, बाजारात अनेक ग्रीन टी फ्लेवर उपलब्ध आहेत उदा. मिंट ग्रीन टी, जॅस्मिन ग्रीन टी, लेमन ग्रीन टी इ. म्हणून उत्पादनाच्या प्रामाणिकतेसाठी लेबल चेक करणें नेहमीच चांगले असेल.

सुटी ग्रीन टी अनेक चहाच्या ब्रॅंड्ससोबत व्यावसायिकरीत्या उपलब्ध आहे. तथापी, तुम्ही चहावर जिवापाड प्रेम करणारे असल्यास आणि विशिष्ट प्रकारचा चहा शोधत असल्यास, तुम्ही सहजरीत्या ते टी बॅग्स, ग्रीन टी पाऊडर, कॅप्स्युल आणि टॅबलेटच्या स्वरूपात उपलब्ध आहे.

कॅफीनरहित ग्रीन टी एक प्रकारचा ग्रीन टी आहे, ज्यावर उपचार करून त्याचा कॅफीन काढण्यात येतो. कॅफीन सहन न होणार्र्या लोकांसाठी ते बेहत्तर पर्याय समजले जात असले, तरी ते चहामधील एंटीऑक्सिडेंट्सची संख्या कमी करते. पण, डिकॅफ ग्रीन टी आणि सामान्य ग्रीनटीमधील अंतर शोधून काढण्यासाठी कोणतेही अभ्यास झालेले नाहीत.

ग्रीन टीचे प्रकार

चहाच्या जगामध्ये पाय ठेवत असतांना, आपल्याला जाणीव होते की ते खूप मोठे आहे. जपान चहाच्या कमीत कमी 10 प्रसिद्ध प्रजाती पिकवतो. आपण चहाच्या प्रजातींची सूची करायला घेतली, तर बहुतेक एक नवीन लेख लिहावा लागेल आणि कुणास ठाऊक त्यापेक्षा मोठेही असू शकते. तरी माहितीपुरते, आपण बाजारात उपलब्ध ग्रीन टीच्या काही ज्ञात प्रजातींना पाहू या.

 • सेंचा ग्रीन टी:
  सेंचा जापानी ग्रीन टीचे सर्वांत सामान्य प्रकार आहे आणि ते तयार करण्यास अतिशय सोपे आहे. कच्ची पाने ऑक्सिडेशन थांबवण्यासाठी स्टीम, रोल आणि सुकवले जातात आणि त्यांना पारंपरिक आकार दिला जातो. या पानांना कपभर पाण्यामध्ये उकळून वापरले जाते.

 • ग्योकुरो ग्रीन टी:
  चहाची ही प्रजाती प्रक्रियेमध्ये सेंचा चहापेक्षा वेगळी आहे. या रोपांना पिकवण्यापूर्वी कमीत कमी 20 दिवस अगोदर कपड्याने झाकले जाते. याने पानांमधील कॅचिनची संख्या कमी केली जाते, ज्याने चहा अजून सुगंधमय होतो. काबुसेचा चहाची अजून एक प्रजाती आहे, जी त्याच पद्धतीने पिकवली जाते, पण चहाच्या रोपाला केवळ एक आठवडा झाकून ठेवले जाते.

 • माचा ग्रीन टी:
  माचा ग्रीन टी ग्रीन टीचे अजून एक दळलेले ( पूड केलेले) प्रकार आहे, ज्याला तेंचा म्हणतात. तेंचा ग्योकुरोसारखेच शेडमध्ये पिकवले जाते, पण झाकण्याचा अवधी 20 दिवसांपेक्षा खूप जास्त असतो आणि याची पानेन गुंडाळता सुकवली जातात. तेंचा चहा, वापरास पाठवण्याच्या थोडे अगोदर दळले जाते.

 • चाइनीझ गनपाउडर टी:
  चाइनीझ ग्रीन टीचे नाव त्याच्या अपूर्व आकारामुळे मिळालेले आहे. त्याची पाने प्रक्रिया केल्यानंतर आणि स्टीम केल्यानंतर गुंडाळली आणि सुकवली जातात. त्याचे अपूर्व धूर असलेले रंग आहे, जे त्याच्या नावासारखेच आहे.

अचूकपणें कपभर चहा ब्रू करणें:

चहाप्रेमींची आपला आवडता चहा ब्रू करण्याच्या आपल्या विशिष्ट पद्धती असतात, पण एक कपभर गरम ग्रीन टी बनवण्याची सामान्य पद्धत याप्रमाणें आहे:

 1. पॅन/टीपॉटमध्ये 2-3ग्रॅम चहाची पाने टाका.
 2. पॅनमध्ये उकळत्या पाण्याचे आवश्यक प्रमाण टाका (चहा आणि तुमच्या वांछित फ्लेवरवर अवलंबून असलेले 20-100 मि. ली. ) .
 3. ते एक ते दोन मिनिटे भिजू द्या. (काही लोकांना चवीप्रमाणें अधिक वेळ भिजून ठेवलेला चहा आवडतो)
 4. छाननी करा आणि गरमगरम वाढा.

तुम्हाला खूप आळस येत असल्यास, एक कपभर टी बॅग वापरून तुम्ही या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता आणि शांतपणें तुमचा चहा घेऊ शकता.

वापरलेले ग्रीन टी बॅग्स स्थानिकरीत्या लावून फुगलेल्या डोळ्यांवर उपचार करता येतो.

माचा ग्रीन टी फेस मास्क वापरण्यात सर्वांत प्रसिद्धपणें वापरले जाते. चहाचा1 चमचा ग्रीन टी पाऊडर ½ चहाचा चमचा मधाबरोबर मिसळून ताजेतवाणे करणारे फेस मास्क बनवता येते.

ग्रीन टीची सवय करून घेण्यापूर्वी आपल्या मनात येणारा पहिला विचार म्हणजे: ग्रीन टी निरोगी आहे का? का केवळ तरुण वयोगटाला झालेली एखादी भ्रांती आहे? बरं, चांगली बातमी ही की चवीत थोडे कडवट असल्याशिवाय इतर विभिन्न फ्लेवरमध्येही ग्रीन टी उपलब्ध आहे. वास्तविक पाहता, ग्रीन टीचे अधिकतर गुण चहाच्या पानांमध्ये उपस्थित विशेष जैविक यौगिकांना दिले जाऊ शकतात, ज्यांना कॅटेचिन म्हणतात आणि ते पाण्यात विरघळून ब्रू तयार करतात. चला, गरम ग्रीन टीच्या कपाचा आस्वाद घेतांना काही फायदे आपण जाणून घेऊ.

 • मेंदूचे आरोग्य सुधारते: अभ्यासाच्या शॄंखलेमध्ये, ग्रीन टी कॅटेचिन मुळे मेंदूच्या कोशिकांना संप्रेरणा मिळाल्याचे दिसून आले आहे, ज्याने स्मरणशक्ती आणि संज्ञान सुधारतात. अल्झायमर्ससारख्या न्युरोडिजनरेटिव्ह  रोगांन दूर ठेवण्यातही ते लाभदायक आहे.
 • कार्डिओव्हॅस्कुलर प्रणालीसाठी चांगले: ग्रीन टी चयापचय सुधारते आणि आर्टरीमधील प्लाक होणें टाळते, जे हृदयगतीचा झटका आणि स्ट्रोक यांसाठी प्रमुख धोक्याच्या घटकांपैकी एक आहे. ते तुमच्या हृदयाच्या मांसपेशींना बळकट करतात, ज्यामुळे हृदयाचे कार्यही सुधारते.
 • त्वचेसाठी लाभकारक: ग्रीन टी बॅग्स डार्क सर्कल आणि सुजलेल्या डोळ्यांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. त्यांचे दाहशामक आणि एंटीऑक्सिडेंट गुणधर्म सुनिश्चित करतात की तुमची त्वचा निरोगी दिसेल आणि तेजस्वीपणें चकाकणारही.
 • वजन कमी करण्यास वाव देते: ग्रीन टी कॅटेचिन आणि कॅफीन मध्ये समृद्ध आहे , जे बीएमआय वाढवतात आणि सुधारित बीएमआय वसा कमी करणें आणि वजन कमी करणें यांच्याशी थेट संबंधित आहे.
 • मौखिक आरोग्य सुधारते: जिवाणूरोधी असल्याशिवाय, ग्रीन टीमधील कॅटेचिन तुमच्या तोंडातील जिवाणूंना मारून टाकते आणि याप्रकारे हिरडे आणि दातातील संक्रमण टाळतात. ग्रीन टी नियमितपणें पिल्याने श्वासात आल्याच्या वासाला दूर ठेवते .
 1. मेंदूसाठी ग्रीन टीचे फायदे - Green tea benefits for brain in Marathi

मेंदूसाठी ग्रीन टीचे फायदे - Green tea benefits for brain in Marathi

तुम्हाला माहीत आहे का की रोज एक कप चहा पिल्याने तुमचा मेंदू तीव्र होतो? आयुर्वेदिक वैद्यांनुसार, ग्रीन टीमध्ये प्रचुर कॅफीन असतो, ज्याचे मेंदूच्या कोशिकांवर प्रत्यक्ष संप्रेरक प्रभाव होतो. आमच्या मेंदूवर कॅफीनचे प्रभाव होण्याच्या नेमक्या पद्धतींच्या अभ्यास करण्यासाठी अनेक अभ्यास करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी अधिकांश सुचवतात की कॅफीन आमच्या मेंदूमधील रसायनाचे (एडोनेसिन) कार्य अडवून टाकते. एडोनेसिन स्तर कमी झाल्याने मेंदूंच्या कोशिकांची गतिविधी वाढते. अभ्यास सुचवतत की कॅफीन कमी घेतल्यास ते न केवल मेंदूसाठी संप्रेरक आहे, तर ते स्मरणशक्ती आणि मेंदूमधील समन्वयही सुधारते.

माफक प्रमाणात ग्रीन टी घेतलेले सुरक्षित आहे, पण अधिक घेतल्याने अनेक सहप्रभाव होऊ शकतात:

 1. ग्रीन टीचे प्रमुख घटक कॅफीने आहे, आयुष्यात खूप काळ चहा घेतलेल्या लोकांमध्ये चिंता, निद्रानाश आणि अस्वस्थता यांसारखी परिहारात्मक लक्षणे आणि निर्भरता दिसून आली आहे.
 2. काही प्रसंगांमध्ये, यकृताच्या क्षतीचे संबंध अत्यधिक ग्रीन टी घेण्याशी जोडण्यात आले आहे. तथापी, यूएस फार्माकोपिआद्वारे प्रकाशित अहवालामध्ये, हे दिसून आले आहे की ग्रीन टीचे सार केवळ रिकाम्या पोटी घेतल्यासच विषारी असतात. आणि काही इतर संशोधक सुचवतात की ग्रीन टी यकृतासाठी अजिबात विषारी नाही. म्हणून, ही खूप विरोधाभासी माहिती आहे. पण तुमचे यकृत आधीच अशक्त असल्यास, ग्रीन टी घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणें उत्तम राहील.
 3. ग्रीन टी ठराविक उपचारात्मक औषधे आणि वनस्पतिजन्य उपायांच्या कार्याशी हस्तक्षेप करत असल्याची माहिती आहे. म्हणून, तुम्ही आधीच विहित औषधावर असल्यास, ग्रीन टी घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणें उत्तम राहील.
 4. तुम्हाला रक्तक्षय असल्यास, ग्रीन टी घेणें योग्य नव्हे, कारण त्याने तुमच्या अन्नातील लौहाचे अवशोषण कमी झाल्याचे ऐकिवात आहे.
 5. ग्रीन टीमुळे तुमच्या शरिरातील रक्तशर्करा कमी होण्याचे समजते. म्हणून, विहित मधुमेहरोधी औषधांवरील मधुमेहग्रस्त लोकांना तुमच्यासाठी ग्रीन टीची योग्य मात्रा निर्धारित करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
 6.  2 कपपेक्षा अधिक ग्रीन टी घेतल्याने तुमच्या शरिरातील कॅल्शिअम बाहेर पडते आणि हाडे अशक्त होतात. म्हणून ग्रीन टी माफक घेणेंच बरोबर राहील.
 7. ग्रीन टी गरोदरपणादरम्यान असुरक्षित समजले जात असले, तरी ते कॅफीनचे स्त्रोत आहे आणि माफकच घेतले गेले पाहिजे. म्हणून, तुम्ही गरोदर असल्यास, तुमच्यासाठी ग्रीन टीची योग्य मात्रा जाणण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणेंच चांगले राहील.
 8. ग्रीन टीमध्ये प्रचुर कॅफीन असते, म्हणून, मुलांना ते देणें योग्य नव्हे.

दिवसात 1-2 कप घेतल्यास ग्रीन टी घेणें सुरक्षित समजले जाते. तथापी, वास्तविक मात्रा वैय्यक्तिक शरीर प्रकार, भौतिकी आणि मोसमाप्रमाणे वेगळी असू शकते. म्हणून, तुमच्या आरोग्य काळजीमध्ये ग्रीन टी जोडण्यापूर्वी पोषणतज्ञाचा सल्ला घेणें उत्तम राहील.

और पढ़ें ...