myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

अंजीर सर्वात प्रसिद्ध “वन्य” फळांपैकी आहे, ज्याला जगभर त्याच्या पाककृतीतील आणि रोगनाशक गुणांसाठी मानले जाते. हे मधुर आणि कुरकुरीत फळ केवळ त्याच्या चवीसाठीच प्रसिद्ध नसून, हजारो वर्ष त्याच्या आरोग्य फायद्यांसाठी पिकवले आणि वापरले जात आहे. वास्तविक पाहता, अंजीर मानवाद्वारे पिकवलेल्या सर्वांत प्राचीन फळांपैकी असून, या फळाचे उल्लेख बायबलमध्येही मिळते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या फळाचे सर्वांत जुने नमुने निओलिथिक युगामधील आहेत.

ग्रीकांनी याला एवढे मौल्यवान मानले की ते त्यांना निर्यात होऊ देत नसत आणि अंजिराच्या फळाला कोणत्याही स्पर्धेतील विजेत्याला मान म्हणून दिले जात असत. हेच नाही, तर रोमन शास्त्रांनुसार रोमचे संस्थापक रेमस आणि रोम्युलस यांचा चावा अंजिराच्या झाडाखालीच मादा लांडग्याने घेतला होता. रोमन शास्त्रांमध्ये या फळाच्या प्रजननोद्दीपक गुणधर्मांबद्दलही सांगितले आहे. या चमत्कारिक फळाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

अंजिराबद्दल काही मूळभूत तथ्य:

 • जीवशास्त्रीय नावफिकसकॅरिका
 • कुटुंब: मोरॅसिआ/मलबरी कुटुंब
 • सामान्य नांव: फिग, कॉमन फिग, अंजीर/अंजिर
 • संस्कॄत नांवअंजिर, अंजीरा
 • वापरले जाणारे भाग: फळ, पाने, तणा, आणि मुळे
 • स्थानीय क्षेत्र आणि भौगोलिक वितरण: अंजिराचे झाड भूमध्य क्षेत्र आणि आशियाचे पश्चिमी भाग समजले जाते, तरी त्यांना जगाचे सर्वांत उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये पिकवले जाते जसे की भारत, चीन आणि आफ्रिका. अंजिराला अमेरिका आणि युरोपच्या भागांमध्येही पिकवले जाते. टर्की जगात अंजिराचा सर्वांत मोठा उत्पादक आहे.
 • तासीर: थंड

अंजिराचे झाड:

अंजीर एक पर्णपाती झाड आहे (वर्षातून एकदा पाने झडतात)   आणि विशाल जेनस फिकसचे सदस्य आहे, ज्यामध्ये मलबरी, वटवृक्ष आणि “पिंपळा”सारख्या झाडांचा समावेश आहे.

तुम्हाला माहीत होते का?

अंजीर वास्तविक फळाच्या ऐवजी उलटलेली फुले असतात, जी कुणी ही अंजिराच्या झाडामध्ये फुले पाहू शकतो. अंजिराचे झाड वाढवण्यास खूप सुंदर असतात आणि एकदा लावल्यास ते आजूबाजूच्या झाडांमध्ये खूप पटकन निरखून दिसून येतात. वास्तविक पाहता, त्याला “ग्लोबल कंपेडिअम ऑफ वीड्स”मध्ये अपायकारक तण म्हणून स्थान दिले गेले आहे. सामान्यपणें, एक फिकस झाड  20-30 फीटच्या उंचीपर्यंत आणि तेवढेच रुंद वाढू शकते. पानांना पाळ आलेली असते आणि फिकस ( एका झाडाचे समूह ज्यामध्ये अंजीर आणि मलबरी सोडून इतर झाडेही सामील आहेत)   च्या विविध प्रजातींमध्ये फरक करत असतांना ते एक निकष ठरू शकते.

 1. अंजिराचे आरोग्य फायदे - Health benefits of Anjeer in Marathi
 2. अंजीर कसे खावे - How to eat Anjeer in Marathi
 3. एका दिवसात किती अंजीर घ्यावेत - How many figs (Anjeer) to take per day in Marathi
 4. अंजिरांचे सहप्रभाव - Side effects of Anjeer (Figs) in Marathi

अंजिरांना स्वयंपाकघर आणि शीतपेट्यांमध्ये स्थान मिळालेलेच आहे. तरी कोणत्याही गोड पदार्थामध्ये या फळाचा गोड कुरकुरीतपणा आणल्यास, ते आरोग्यकारक असते आणि त्याचे फायदे या फळामध्ये जुडतात. या लेखामध्ये, आम्ही सांगू की अंजीर तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक का आहे.

 • बद्धकोष्ठतेतून आराम: अंजिरामध्ये मोठ्या प्रमाणात आहारजन्य तंतू असतात. हे तंतू तुमच्या आतड्यांतील अन्नामध्ये समाविष्ट होतात आणि मळाला मऊ करतात, ज्यामुळे शरिरातून त्यांचे सहजरीत्या निःसारण होते. ते शौचाच्या विधा नियमित ही करतात, जे बद्धकोष्ठतेच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.
 • वजन कमी करणेंअंजीर प्रचुर तंतू आणि कमी कॅलॉरी असलेली फळे आहेत, ज्यामुळे तुमचे एकूण कॅलॉरी काउंट वाढू न देता तुम्हाला अधिक वेळ पोट भरल्यासारखे वाटू शकते. चांगल्या वजन कमी करण्याच्या खाद्यपदार्थासाठी तुम्हाला अजून काय हवे आहे? तथापी, दुधाबरोबर घेतल्याने, त्याने त्या ऐवजी वजन वाढू शकते.
 • डोळ्यांच्या आरोग्याचे संरक्षण होणे: अंजिरामध्ये प्रचुर मात्रेमध्ये विटामिन ए असतो, जो दृष्टी राखून ठेवणें आणि डोळ्यांच्या शक्तीची हानी टाळण्यासाठी जवाबदार आहे. हेच नाही, तर यामुळे ह्रासात्मक नेत्रविकारांचा धोका कमी होतो असा समज आहे, ज्यांवर सांप्रत कोणतेही उपचार उपलब्ध नाही. अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेंच सर्वोत्तम आहे.
 • यामुळे रात्री चांगली झोप लागते: संशोधनाच्या प्रमाणांचा समज आहे की अंजिरांमुळे शरिरातील मेलॅटॉनिनच्या उत्सर्गास वाव मिळतो, ज्यामुळे तुमच्या उठण्याच्या आणि झोपण्याच्या चक्राचे नियामन होते आणि निद्रानाश व्यवस्थापनामध्येही मदत मिळते. ते तुमच्या मेंदूमधेल सेरॅटॉनिन स्तराला ही वाढवते. ते प्लेझर हार्मोन आहे, जे तणाव व चिंता यांना कमी करते, ज्यामुळे तुम्ही शांतपणें झोपू शकता.
 • मूळव्याधामधून तुम्हाला आराम मिळते: शौचाची प्रणाली नियमित करून आणि बद्धकोष्ठतेमधून आराम मिळून, अंजिरांमुळे तुमच्या हॅमॅरॉयड तंतूंवर आलेले अतिरिक्त दाब कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचे मळ मऊ पडते आणि त्यांचे निःसारण सुकर होते. त्यामुळे तुमचे रेक्टम आणि एनस यांना ही त्रास होत नसल्यामुळे, मूळव्याधामधून आराम मिळते.
 • यकृताचे कार्य सुधारते: अंजिरांमध्ये एंटीऑक्सिडॅंट आणि पोषक यौगिकांच्या रिपॉझिटरीचे समावेश असते. पूर्ववैद्यकीय अभ्यास सुचवतात की या यौगिकांमुळे, यकृताची क्षती टळते आणि यकृताची विषहारक योग्यता वाढते. तरी मात्रा आणि माणसांवरील प्रभावाची पुष्टी करण्यासाठी अजून अभ्यासाची गरज आहे.
 • उत्कृष्ट एंटीऑक्सिडॅंट: एंटिऑक्सिडॅंट असे यौगिक असतात, जे फ्री रॅडिकलची हानी टाळतात आणि वय वाढ कमी करतात. प्राकृतिक एंटीऑक्सिडॅंट म्हणून, अंजीर अवयवाच्या कार्याची संबंधित आयुसंबंधी हानी टाळतात, आणि त्याच वेळी बारीक रेषा आणि डार्क स्पॉट्ससारखे वयवाढीची चिन्हे कमी करतात.
 • रक्तक्षय झालेल्यांसाठी लाभकारक: अंजीर लौहाचे चांगले स्त्रोत आहेत. नियमित अंजीर वापरणें लौहाच्या कमतरतेमुळे झालेले रक्तक्षय टाळतात आणि तुमच्या शरिरातील हॅमोग्लोबिन आणि लाल रक्तकोशिकांचे प्रमाण कमी करतात.
 • रक्तशर्करा स्तरांना नियंत्रित करते: संशोधन अभ्यासांमध्ये अंजीराच्या हायपोग्लीसिमिक ( रक्तशर्करा कमी करणारे)   कार्य दिसून आले आहे. ते इंसुलिन संवेदनशीलता वाढवते आणि तुमच्या रक्तातील अतिरिक्त साखर ग्रहण कमी करते, ज्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन होते.
 • त्वचेसाठी लाभकारक: अंजीर तुमच्या त्वचेसाठी पोषण आणि प्राकृतिक एंटीऑक्सिडॅंटचे चांगले स्त्रोत असतात. त्याने फ्री रॅडिकलची हानी कमी होते आणि तुमची त्वचा अधिक लवचिक व तारुण्यपूर्ण बनते. हे सुचवले गेले आहे की अंजिराचे लॅटॅक्स वापरणें चामखीळ काढण्यात क्रायोजेनिक उपचाराएवढेच चांगले असते.
 • केसांची हानी टळते: तुमच्या त्वचेसारखेच, अंजीर तुमच्या डोक्याच्या कातडीलाही पोषण देते. व्हिटामिन ई आणि के यांचे चांगले स्त्रोत असल्याखेरीज, ते तुमच्या केसांची नैसर्गिक चकाकी राखून ठेवते, केसांना पांढरे होण्यापासून वाचवते आणि अतिरिक्त केसांची गळती कमी करते.
 • खोकला आणि पडसेवरील उपाय: पारंपरिकरीत्या, अंजीर खोकला आणि पडसे यांसाठी उत्कृष्ट उपाय समजले जाते. ते न केवळ तुमच्या फुफ्फुसे आणि हवेच्या वाटांमधील म्युकस बाहेर काढण्यास मदत करते, तर घशाच्या स्नायूंना ही बळकट करते, ज्याने समस्येची पुनरावृत्ती टाळली जाते.
 • रक्तदाबाला नियामित करते: अभ्यासांमधून दिसून आले आहे की अंजिराच्या वापराचे रक्तदाबावर सकारात्मक प्रभाव होतात. अंजिरामध्ये पोटॅशिअमचे भरपूर प्रमाण असते, जो तुमच्या हॄदयावरील सोडिअमचे नकारात्मक प्रभाव संतुलन करण्यास मदत करते आणि हृदयाचे कार्य योग्य ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
 • मूत्रपिंडांचे कार्य सुधारते: अंजिरामध्ये डाययुरेटिक गुणधर्म असतात. मूत्रनिःसारण अजून होऊन, ते तुमच्या शरिरातील अतिरिक्त विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते, जे मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी लाभकारक आहे.
 • ताप कमी करते: वैद्यकीय अभ्यासाद्वारे सुचवण्यात आलेले आहे  की, अंजिराच्या पानांचे एथनॉलिक साराचे शक्तिशाली एंटिपायरेटिक कार्य असतात. ५ तासांपेक्षा अधिक वेळ सक्रिय राहिल्याने, त्याचे कार्य अधिकतम व्यावसायिक एंटीपायरेटिक्सपेक्षा अधिक प्रभावी समजले जाते.
 • चांगल्या हाडांसाठी अंजीर: अंजिरामध्ये हाडांचा ढाचा सांभाळून ठेवण्यासाठी जवाबदार 3 सर्वाधिक महत्वपूर्ण खनिज  आहेत कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि मॅग्नीशिअम. अंजिर नियमित वापरल्याने तुमची हाडे मजबूत होतात आणि अस्थिभंगाचा धोका कमी होतो.
 • गरोदर महिलांसाठी लाभदायक: अंजिराचे पोषक गुणधर्म गरोदर महिलांसाठी एक अचूक आहारात्मक पूरक पदार्थ बनवतात. या फळामध्ये उपस्थित विटामिन बीचे गरोदरपणाच्या पूर्वकाळात मॉर्निंग सिकनेसमधून आराम मिळते आणि त्याचे कॅल्शिअम आईच्या हाडांना अशक्त होण्यापासून वाचवते, आणि भ्रूणाच्या विकासामध्येही साहाय्य करते.
 1. बद्धकोष्ठतेसाठी अंजीर - Anjeer for constipation in Marathi

बद्धकोष्ठतेसाठी अंजीर - Anjeer for constipation in Marathi

अंजीर आहारातील तंतूचे खूप चांगले स्त्रोत आहे आणि प्रचुर तंतूंच्या आहाराचा सर्वांत मोठा फायदा असा की तो आहारामध्ये बल्क जोडतो आणि मळाला मऊ करतो, ज्याने शरिरातून मळनिःसारण सोपे होते. म्हणून, नाष्ट्यासाठी अंजिराचे एक बाउल सॅलॅड ठेवून तुम्ही बद्धकोष्ठतेच्या त्रासांपासून मैलभर लांब राहू शकता.

अंजीर कसे वापरले जातात?

अंजीर झाडापासून तोडल्यानंर ताजेच वापरले जाऊ शकतात. पण ताज्या अंजिरांची उपलब्धता आणि साठवणूक एवढी सामान्य नव्हे. म्हणून अधिकतर त्याचे साठवलेले किंवा कोरडेच वापरले जातात.

ताज्या फळामध्ये थोडे रस असते. सुका मेवा गोड, चावण्यासारखा असतो आणि त्याच्या बियांमध्ये एक वेगळेच क्रंच असते, ज्याने त्याचा प्रत्येक चावा विशेष बनतो. औषधीय गुण असलेल्या फळाच्या चविष्ट मात्रेपेक्षा चांगले काय असू शकते। तुमच्या दैनंदिन जेवणात अंजीर ठेवण्याच्या पद्धती तुम्ही शोधत असल्यास, तुम्हाला जाणून आनंद होईल की अंजीर स्वतंत्रपणें किंवा सॅलॅड किंवा सकाळचे धान्य आणि कॉर्नफ्लेक्सबरोबरही घेतले जाऊ शकतात. त्याला दूध किंवा अन्य दुधांबरोबर जोडून स्मूथीझ किंवा मिल्कशेक बनवले जाऊ शकते, किंवा शिरा, केक्स, ब्रेड, पुडिंग इ. मध्ये ठेवली जाऊ शकते. ती बाजारात अनेक गोड पदार्थांच्या रूपात उपलब्ध आहे आणि तुम्हाला तुमच्या अत्यधिक कॉफीला पर्याय म्हणून वापरायचे असल्यास, ते व्यावसायिकरीत्या इंस्टॅंट कॉफी पॅक्सच्या रूपात उपलब्ध आहे. अंजिरांच्या गोड चवीमुळे गोड पदार्थांना ती प्राकृतिक गोडवा देण्यासाठी विशेष असते. तथापी, तुम्ही बाजारातून अंजीर घेत असल्यास, लेबल नीट वाचलेले असल्याची खात्री करा आणि एक्सपायरी डेट व प्रेझर्व्हेटिव्हबद्दलही खबरदार रहा.

सुकवलेले की ताजे अंजीर?

पाणी आणि पाण्यामध्ये विरघळता येणार्र्या काही पोषक तत्त्वांच्या हानीला सोडले, तर सुकवलेल्या आणि ताज्या अंजिराच्या पोषक गुणांमध्ये बरेच काही फरक नव्हे. वास्तविक, अंजीर सुक्या रूपात घेतल्याने बेहत्तर पोषक पूरक तत्त्व म्हणून वापरले जाते. सुक्या अंजिरांमधील फेनॉलिक सामग्री आणि एंटीऑक्सिडेंत गुण ताज्या अंजिरापेक्षा जास्त असतात.

ताजे अंजीर विकत घेणें:

तुम्ही बाझारातून ताजे अंजीर विकत घेणार असल्यास, पूर्ण अंजिरामध्ये काहीही खरचटलेले असू नये आणि असे अंजीर निवडा, ज्यांचा रंग चकाकत असेल. ताज्या अंजीरामध्ये खूप शर्करा असतात, म्हणून विकत घेण्याच्या 2 दिवसांनंतर ते वापरणें बरे असते. तुम्हाला कडवट चव किंवा मोड वाढलेली दिसल्यास अंजीर खाऊ नका. ताजे अंजीर सुरक्षित ठेवणें महत्त्वपूर्ण आहे, कारण ते खूप जटील असतात आणि सहजच खरचटतात.

तुम्ही कच्चे अंजीरही विकत घेऊ शकता आणि खाण्यापूर्वी कक्ष तापमानावर प्राकृतिकपणें ते पिकवू शकतात. पाण्याचा प्रमाण कमी असल्यामुळे, सुकवलेले अंजीर कक्ष तापमानावर थंड आणि कोरड्या जागेवर भंडारित ठेवल्यास कच्च्या अंजिरांपेक्षा अधिक वेळ टिकतात. तुम्ही गरम आणि आर्द्र हवामानात राहत असल्यास, सुके अंजीर शीतपेटीत ठेवणें बेहत्तर असते, जिथे ते  6-8 महिन्यांपर्यंत टिकू शकतात. तथापी, तुम्हाला दुर्गंधी किंवा मोड वाढलेली दिसल्यास, त्यांना फेकून देणें बेहत्तर असते.

आदर्शरित्या, 3-5  किंवा 40 ग्रॅम अंजीर सहप्रभाव न होता घेतले जाऊ शकतात, पण तुमच्या शरिराचे प्रकार, वय आणि लिंग यांप्रमाणें आदर्श मात्रेसाठी तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारणें योग्य असेल.

ताजीतवाणी आणि अधिक स्वस्थ दिसणारी त्वचा मिळण्यासाठी ताक आणि अंजिरांचे पेस्ट स्थानिकरीत्या लावता येऊ शकते.

 • काही लोकांना अंजिराशी नैसर्गिक अलर्जी असते. अंजीर त्याच्या पचनात्मक प्रभावांमुळे बद्धकोष्ठतेच्या उपचारामध्ये खूप प्रभावी आहे, पण अत्यधिक प्रमाणात अंजीर घेतल्याने अतिसार होऊ शकते.
 • तुम्ही कोणत्याही रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्यास, तुमच्या आहारात कोणत्याही प्रमाणात तुमच्या डॉक्टरांशी तपासणी करणें सल्लेशीर आहे, कारण अंजिरांमधील विटामिन के एक नैसर्गिक रक्त पातळ करणारे पदार्थ आहे आणि औषधांच्या प्रभावांना जुडून येऊन रक्त अजून पातळ होऊ शकतो.
 • स्थानिकरीत्या लावल्याने अंजिराच्या पानाने त्वचेची संवेदनशीलता वाढू शकते. सूर्यामध्ये बाहेर येण्यापूर्वी त्वचेवर अंजिरांच्या पानांचे पेस्ट लावण्याचा सल्ला दिला जात नाही।
 • अंजीर तुमच्या शरिरातील रक्तशर्करा कमी करते, म्हणून तुम्हाला मधुमेह असल्यास आणि तुम्ही रक्तशर्करा कमी करण्यासाठी औषधे घेत असल्यास; अंजिराचा उपभोग करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणें उचित राहील.
 • अंजीर नैसर्गिक रक्त पातळ करणारे पदार्थ आहे, म्हणून तुम्ही शस्त्रक्रिया करणार असल्यास किंवा हल्लीच शस्त्रक्रिया झालेली असल्यास, दोन आठवड्यांसाठी अंजीर न घेतलेले चांगले आहे. तुम्ही शस्त्रक्रियांनंतर अंजीर घेणें परत चालू करत शकत असल्याबद्दल डॉक्टरांना विचारावे. मूत्रपिंडातून अतिरिक्त विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी अंजिराचे फळ खूप चांगले आहे, ते ऑक्सेलेट्समध्ये प्रचुर आहे (नैसर्गिकरीत्या होणारे एक प्रकारचे जैवशास्त्रीय यौगिक)  । हे ऑक्सेलेट शरिरातील कॅल्शिअम बांधून ठेवतात, जे मूत्रपिंड आणि अमाशयामधील खड्यांमागील मुख्य कारण असते. म्हणून, अंजीर घेत असतांना मॉडरेशनचे पालन केले पाहिजे.
और पढ़ें ...