myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

जसे तुम्हाला आधीच माहीत आहे, एलो वेराचे उगम “ऋग्वेद”मधून झाले आहे, ज्याचे अर्थ आहे खूप संभावना.

आता कोरफड प्रत्येक घरात एक सुपरफूड आणि खूप लोकांसाठी सौंदर्य रहस्य आणि “रहस्यमयी रोप” म्हणून पोचलेली आहे. वास्तविकरीत्या, तिला भारतात घृतकुमारी असे म्हटले जाते. आयुर्वेदिक संशोधकांनुसार, तिला संस्कृतमध्ये  “कुमारी” म्हणतात, कारण महिलांमध्ये रजोचक्राचे नियामन करण्यासाठी तिचे सहायक गुणधर्म आहेत आणि तसेच हे रोप दोषरहित त्वचेच्या देणगीकडे संकेत करत असल्यामुळे वाढत असतांना दिसत नाही. आयुर्वेद किंवा पश्चिमी औषध काहीही असो, औषधाची प्रत्येक पारंपरिक प्रणालीमध्ये या रोपाची एक विशेष जागा आहे.

कोरफड एक सुवासिक रोप आहे (मऊ,रसमय). त्याचे जाड मांसळ पाने आणि देठ मुख्यत्त्वे पाणी साठवण्यासाठी वापरले जातात. आयुर्वेदामध्ये, एलोवेराचे आतडे आणि यकृत यावर लाभकारी प्रभाव यांचे वर्णन केले गेले आहे. प्रसिद्ध प्राकृतिकतावादी आणि लेखक पिनी द एल्डर यांच्यानुसार, कोरफड कुष्ठरोगाच्या चट्ट्यांच्या उपचारासाठीही वापरले जाऊ शकते. हे औषध भारतीय उपमहाद्वीपामध्ये न केवळ प्रसिद्ध आहे, तर तज्ञांनी प्राचीन मिस्री कागदपत्रांमध्ये त्याचे विस्तृत विवरण शोधून काढले आहे. वास्तव, त्याला मिस्राच्या रहिवाशांनी “अमरत्त्वाचे रोप” असेदेखील म्हटले आहे. प्रसिद्ध मिस्त्री राणी क्लिओपॅट्रा हिने तिच्या सौंदर्य कारणांसाठी वापर केलेले म्हटले जाते.

तुम्हाला माहीत होते का?

कोरफड हे नाव अरबी शब्द “अलोह” मधून येते, ज्याचे अर्थ  “चकाकदार कडवट पदार्थ” आणि “वेरा” एक लॅटिन शब्द आहे, ज्याचे अर्थ आहे “सत्य”.

एलोवेराबद्दल काही मूळभूत तथ्य:

 • वनस्पतिशास्त्रीय नाव: एलो बार्बाडेनिस मिलर
 • कुटुंब: एस्फोडिलेक (लिलिआसेस)
 • सामान्य नाव: एलोवेरा, बर्न प्लांट, घीकुमारी, कुमारी.
 • संस्कृत नाव: घृतकुमारी
 • वापरले जाणारे भाग: पाने
 • स्थानीय प्रदेश आणि भौगोलिक वितरण: एलोवेरा मूळ आफ्रिका येथील आहे, पण वेळेबरोबर ते स्थानिक भूमी सोडून जगाच्या अधिकतर कोरड्या क्षेत्रांत पसरले आहे ज्यामध्ये मध्यपूर्व आणि भारत सामील आहे. भारतात ते राजस्थान, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरात येथे सापडते.
 • ऊर्जादायक: थंड केले जाणें
 1. कोरफडचे आरोग्य फायदे - Health benefits of Aloe Vera in Marathi
 2. कोरफड रोप आणि ते कसे वापरले जाते - Aloe vera plant and how it is used in Marathi
 3. एलो वेराची मात्रा - Aloe vera dosage in Marathi
 4. कोरफडचे सहप्रभाव - Side effects of aloe vera in Marathi

कोरफड भाजणें आणि कातडीच्या समस्यांसाठी सर्वांत सामान्यपणें वापरले जाऊ शकते. तुमच्यापैकी काही लोकांना आधीच माहीत आहे की एलो वेरा संभावनांचे एक “लहानसे चमत्कार” आहे. एलोवेराचे वापर आणि कार्य शिकून घेऊ या.

 • वयवाढ प्रलंबित करणें: कोरफड एंटीएजिंग त्वचा क्रीम आणि लोशनसाठी मुक्तपणें वापरले जाते. ते तुमच्या कातडीला आर्द्रीकृत बनवते आणि त्वचा पुनर्निर्माणास वाव देते, ज्याने एजिंगची प्रथम लक्षणे उदा. सुरकुती आणि बारीक रेषा कमी होतात.
 • जखम बरी होण्यास वाव मिळते: कोरफड सर्व प्रकारच्या जखमांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. अध्ययनाच्या शृंखलांमध्ये, त्याला त्वचा दुरुस्ती आणि कट,बर्न, सनबर्न आणि विकिरण बर्न यांमध्ये प्रभावी असल्याचे सूचित केले गेले आहे.
 • पोटाच्या समस्यांमध्ये आराम मिळणें: एलोजेल आणि लॅटेक्स हे गॅस्ट्रोइंटेस्टिनल परिस्थिती उदा. जीईआरडी, दाहशामक पोटाचे विकार आणि बद्धकोष्ठता यांमध्ये सुधारासाठी उपयोगी असण्यासाठी दावा केला गेला आहे. तथापी, अपरिष्कृत उपभोगामुळे अतिसार होऊ शकते.
 • मौखिक आरोग्यासाठी उत्तम: एलो जेल मुळे प्लाक निर्माण करणारे जिवाणू मारण्यासाठी आणि गिंगिवायटीझ टाळण्यासाठी वापरले जाऊ शकते. एलो जेल अनुप्रयोग तोंडाच्या अल्सरविरुद्धही उपयोगी असल्याचे दिसून आले आहे, आणि तुमच्या आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही.
 • नैसर्गिक एंटीऑक्सिडेंट आणि जिवाणूरोधी: कोरफड फ्री रॅडिकल हानी आणि जिवाणू संक्रमणामुळे होणारी हानी कमी करते. याने वयवाढ प्रक्रिया प्रलंबित न होता स्वतःला निरोगी आणि अंगाच्या कार्यांना वाव मिळण्यास उपयोगी पडते.
 • रक्तशर्करा कमी करणें: एलोजेल हायपोग्लायसेमिक पदार्थ म्हणून विस्तृतरीत्या अध्ययन केले गेले आहे आणि  अधिकतर अध्ययनांनी मधुमेहात त्याची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. अंतिम चरणाचे अभ्यास सध्या मात्रा निर्धारित करण्यासाठी आणि उपचारात्मक वापरासाठी सुरक्षा निर्धारित करण्यासाठी चालू आहेत.
 • लांब आणि लचकदार केस: कोरफड तुमच्या डोक्याला जलीकृत ठेवते आणि पोषण देते. ते तुमच्या केसांचे परिस्थितीकरण करते आणि स्काल्प पीएचमध्ये संतुलन आणते. या सर्व गुणधर्मांमुळ केसवाढीस वाव मिळून केस पांढरे होणें हळू होते.
 • कॉलेस्टरॉल कमी होते: पोषण विज्ञान आणि व्हिटामिनोलॉजीच्या पत्रिकेत प्रकाशित संशोधनामुळे कळले आहे की एलो जेल यकृतातील कोलेस्टरॉल उत्पादन ३०% कमी होते. हे प्लाक निर्माण आणि एथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी करते.
 • कर्करोगाचा धोका कमी करणे: कोरफड व्हिटामिन आणि झिंक सारख्या एंटीऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहे, ज्यामुळे कर्करोग कोशिकांची वाढ हळू होते. त्याने गाठ बनणें टळते. या औषधाची कर्करोगरोधी गतिविधी समजण्यासाठी अध्ययन अजूनही सुरू आहे.
 1. त्वचेसाठी कोरफड जेलचे फायदे - Aloe vera gel benefits for skin in Marathi
 2. पोटाचे संक्रमण आणि बद्धकोष्ठतेसाठी एलो वेरा - Aloe vera for stomach infections and constipation in Marathi
 3. निरोगी हिरडे आणि दातांसाठी एलो वेरा - Aloe vera for healthy gums and teeth in Marathi
 4. एंटीऑक्सिडेंट आणि जिवाणूरोधी म्हणून कोरफड - Aloe vera as an antioxidant and antibacterial in Marathi
 5. मधुमेहासाठी एलो वेरा - Aloe vera for diabetes in Marathi
 6. केसांसाठी कोरफडचे फायदे - Aloe vera benefits for hair in Marathi
 7. एंटीट्यूमर एजेंट म्हणून एलो वेरा - Aloe vera as an anti-tumor agent in Marathi
 8. कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोरफड - Aloe vera for lowering cholesterol in Marathi

त्वचेसाठी कोरफड जेलचे फायदे - Aloe vera gel benefits for skin in Marathi

बझारामध्ये विविध त्वचा प्रकारांसाठी अनेक प्रकारचे एलो वेरा क्रीम आणि एंटीएजिंग लोशन उपलब्ध आहेत. पण, ते किती प्राकृतिक आणि प्रामाणिक आहेत, हे तपासणें महत्त्वाचे आहे. निरोगी त्वचेसाठी सोपे आणि विश्वसनीय उपचार तुम्ही शोधत असल्यास, एलोवेरा जेल नैसर्गिक रूपात वापरणें सल्लेशीर आहे. प्राकृतिक एलोवेरा जेल या महाग क्रीमच्या फायद्यांसोबत येते आणि त्याचे कोणतेही सहप्रभाव नाही. अध्ययन दाखवतात की तुमच्या आहारात एलो वेरा जोडल्याने स्ट्रेच मार्क आणि वयवाढीचे इतर परिपक्वतेपूर्वीची लक्षणे कमी करण्यात महत्त्वाचे प्रभाव आहेत. टॉपिकलरीत्या वापरले गेल्याने, एलो वेरा याचे त्वचेवर प्राकृतिक आर्द्रीकारक आणि संप्रेरक प्रभाव असते. एलो वेरा मुख्यत्वे तुमच्या त्वचेला आर्द्रीकृत करते आणि आर्द्रीकृत त्वचा एक निरोगी त्वचा असते आणि त्याची इच्छा सर्वांनाच असते. नियमित कोरफड वापरल्याने कातडी आर्द्रीकृत होते आणि त्वचेच्या कोशिका वाढतात व जलद संयोजित होऊन त्वचेची लवचिकता सुधारते.

वयवाढरोधी गतिविधींशिवाय,  कोरफड जेलचे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदे आहेत.

 • जलद जखम बरी होणे: एलो वेरा लोककथांमध्ये जखम बरी करण्यासाठी सर्वोत्तम औषध समजले जाते. वैश्विक स्तरावर या गुणधर्मामागील यंत्रणा समजण्यासाठी विस्तृत संशोधन केले गेले आहे आणि असे समजण्यात आले आहे की जेलचे काही घटक आहेत (एक वाढ हार्मोन), ज्याने फायब्रोब्लास्टशी जोडले जाते (त्वचेच्या कोशिका नवीन कातडी आणि जखम बरे करण्यात मदत करते) आणि या प्रमाणें जखमेभोवती त्वचेच्या कोशिका वाढण्यास मदत होते. मौखिक आणि टॉपिकल वापरासाठी उपचाराचे गुणधर्म समानरीत्या लाभकारी मानले गेले आहे.
 • भाजलेले बरे होण्यात प्रभावी: एलोवेरा जेल पहिल्या आणि दुसर्र्या अंशात भाजल्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांद्वारे विहित केले गेले आहे. हे जेल प्रभावित क्षेत्रावर थेट लावले जाते. अध्ययनात दावा केला गेला आहे की एलोवेरा वेसलीन गॉझपेक्षा भाजल्याच्या जखमा बरी करण्यात अधिक प्रभावी आहे. अध्ययनात हे ही दाखवले गेले आहे की कोरफड द्वारे जखम बरी होण्याची औसत वेळ औसत १२ दिवस सापडले गेले आणि तेच करण्यासाठी व्हॅसलीन गॉझला १८-२० दिवस जातात.
 • सनबर्न उपचार: तुम्हाला माहीत आहे का ही एलोवेरा टॅन्ड कातडीसाठी नैसर्गिक त्वरित उपचार आहे?  टॅंड त्वचेतून आराम मिळण्यासाठी डोक्यात येणारे पहिले घरगुती उपचार म्हणजे कोरफड. आधीच निर्धारित त्वचा बरी करण्याचे फायदे सोडले, तर एलो जेलच्या टॉपिकल प्रयोगाने सूर्याने भाजलेल्या कातडीवर आरामदायक प्रभाव होते आणि कोणतेही सहप्रभाव होत नाही. म्हणून पुढच्या वेळी सूर्याखालील कातडीचे रेड पॅच मिळालेले असल्यास, त्वरीत आराम मिळण्यासाठी थोडे एलो जेल मिसळा.
 • विकिरणाचे सहप्रभाव कमी करणे: रुग्णांच्या सर्वेक्षणावर आधारित प्रमाण सांगते की एलोएरा कीमोथेरपी  रुग्णांवरील विकिरण बर्न्सच्या उपचारासाठी प्रभव होते. पुढील संशोधनांचा दावा आहे की एलो जेल अधिक प्रभावी आहे आणि एलो आधारित क्रीमपेक्षा बर्नचे उपचार जलद होते.

पोटाचे संक्रमण आणि बद्धकोष्ठतेसाठी एलो वेरा - Aloe vera for stomach infections and constipation in Marathi

किती वारंवार तुम्हाला पोटाच्या समस्या येत आहेत? तुम्हाला हार्टबर्नही झालेले आहे का? यामुळे संक्रमणाच्या लक्षणांद्वारे दाह झालेले पोट किंवा जीईआरडी (गॅस्ट्रोईसोफीगल रिफ्लक्स रोग) होऊ शकते. दाहकारक पोटाच्या रोगाच्या उपचारासाठी एलो वेराच्या प्रभावितेसाठी हल्लीच्या अभ्यासात आढळले आहे की एलो वेरा आयबीएसच्या उपचारात उपयोगी होऊ शकते. तसेच, बद्धकोष्ठतेवरील उपचारासाठी एलो लॅटेक्स वापरणें सुचवले जाते, पण ते खूप उत्तम लॅक्सेटिव्ह आहे. तथापी, रस किंवा लॅटेक्सच्या रूपात एलो वेरा वापरल्यापूर्वी डॉक्टरांकडून कृपया तपासून घ्या की, एलो रसाच्या उपभोगाने अधिक अतिसाराची प्रकरणे आलेली आहेत.

निरोगी हिरडे आणि दातांसाठी एलो वेरा - Aloe vera for healthy gums and teeth in Marathi

आम्हा सर्वांना निरोगी हिरडे आणि ताकदवान दातांची इच्छा असते, कारण चांगले मौखिक आरोग्य निरोगी व प्रकाशमान कातडीसाठीही महत्त्वाचे आहे. एंटीबॉयटिक प्रतिरोधी रोगांच्या वाढत्या संख्येमुळे, चांगल्या मौखिक स्वच्छतेसाठी हे एक नैसर्गिक पर्याय आहे. आयुर्वेदामधील हल्लीच्या संशोधनांचा दावा आहे की एलो वेरा जेल काही सहप्रभाव न होता दाताचे प्लाक आणि जिंजिवायटीस कमी करण्यात खूप प्रभावी आहे. ते जिवाणू मारण्याद्वारे असे करते, जे अशा मौखिक समस्यांसाठी जवाबदार आहे. तसेच, प्रमाण मिळालेले आहेत की एलो जेलच्या प्रयोगाने तोंडाचे अल्सर जलद आणि प्रभावीपणें बरे होते.

एंटीऑक्सिडेंट आणि जिवाणूरोधी म्हणून कोरफड - Aloe vera as an antioxidant and antibacterial in Marathi

हल्लीचे संशोधन दाखवते की एलो वेरा याचे एंटीऑक्सिडेंट आणि जिवाणूरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेच्या जिवाणूजन्य संक्रमणांना लढण्यात मदत होते. पारंपरिकरीत्या, ते एक्ने, डॅंड्रफ आणि इतर सामान्य जिवाणूजन्य त्वचा संक्रमणांच्या उपचारात वापरले जाते. तथापी, या क्षेत्रात अधिक संशोधनाची गरज आहे. म्हणून अशा प्रकारच्या त्वचा परिस्थितीसाठी एलो वेरा वापरण्यापूर्वी तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टराचा सल्ला घेणें महत्त्वाचे आहे.

अभ्यासातून पुढे सुचले की एलो वेराची प्रकाश रासायनिक रचना हृदयरोग, मधुमेह, आणि मज्जोन्मूलक रोगांची लक्षणे कमी करण्यात खूप उपयोगी आहे.

मधुमेहासाठी एलो वेरा - Aloe vera for diabetes in Marathi

कोरफड जेलच्या मधुमेहरोधी गुणधर्मावर विस्तृत संशोधन केले गेले आहे आणि तीन विभिन्न अभ्यासांमध्ये असे आढळले की कोरफड रसाचे उपयोग मधुमेहरोधी रुग्णांमध्ये रक्तशर्करा कमी करण्यात महत्त्वपूर्ण प्रभाव आहे. तथापी, अभ्यास शेवटच्या परीक्षणकाळात असल्याने नियमित व प्रभावी उपचारासाठी सुरक्षितता आणि मात्रेच्या परीक्षणात आहेत.

 (अधिक पहाः मधुमेह)

केसांसाठी कोरफडचे फायदे - Aloe vera benefits for hair in Marathi

एलोवेराचे आर्द्रीकारक प्रभाव न केवळ त्वचेवर प्रभाव पाडतात, तर डोक्याची कातडी आणि केसांनाही उपयोगी आहे. कंडिशनर म्हणून वापरल्याने, केसांचे आरोग्य आणि कातडीचे पीएच संतुलन राखण्यात ते मदत करते, ज्यामुळे केसगळती कमी होऊन केस चकाकदार होतात. संशोधन दाखवतात की एलोवेरा जेल जीवनसत्त्व आणि एंझाइमचे चांगले स्त्रोत आहे, जे हेअर फॉलिकलच्या पोषणात साहाय्य करून जलद केसवाढ सुलभ करतात.

एंटीट्यूमर एजेंट म्हणून एलो वेरा - Aloe vera as an anti-tumor agent in Marathi

एलो जेल आणि साराच्या संशोधकांच्या समूहाद्वारे केलेल्या ट्यूमरजनक गुणधर्मांच्या परीक्षणामध्ये, मौखिक व टॉपिकल मिश्रण ट्यूमरजनक कोशिकांची वाढ प्रलंबित करण्यात प्रभावी मानले गेले आहे. यांपैकी एक अभ्यासामध्ये, एलो वेरा रोपाचे रासायनिक सुरक्षा गुणधर्माचे कारण एंटीऑक्सिडेटिव्ह एजेंट मानले गेले आहे, जसे की जीवनसत्त्व आणि एंझाइम आणि काही खनिज जसे की सेलेनिअम आणि झिंक. प्रभावी ट्यूमररोधी औषध म्हणून या रोपाच्या विकासाची अधिक प्रभावी पद्धत विकसित करण्याची आणि कर्करोग उपचाराचे तुळनेने स्वस्त पर्याय म्हणून तिला उपलब्ध करण्याची अधिक प्रभावी पद्धत शोधली जात आहे.

कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोरफड - Aloe vera for lowering cholesterol in Marathi

कोरफड जेलवर गहन संशोधन केले गेले आणि हे दाखवण्यात आले की ते “खराब” किंवा कमी घनत्त्वाचे कॉलेस्टरॉल (एलडीएल) शरिरातून कमी करते आणि “चांगले” किंवा उच्च घनत्त्वाचे कॉलेस्टरॉल (एचडीएल) वाढवते. खराब कॉलेस्टरॉल काढल्याने एथेरोस्क्लेरोसिससारख्या रोगांचा कमी धोका होऊन (आर्टरीमध्ये वसा साचणें) निरोगी हृदयास वाव मिळतो. तसेच, एलडीएल कॉलेस्टरॉलच्या कमी स्तरामुळे शरिराचे वजन अधिक सहजरीत्या घटते. पोषणविज्ञान आणि जीवनसत्त्वशास्त्राच्या पत्रिकेत प्रकाशित संशोधनामुळे दिसून आले आहे की एलो वेराचे उपभोग यकृताचे कॉलेस्टरॉल उत्पादन २५-३०% कमी करते.

 (अधिक पहाः उच्च कोलेस्टरॉल उपचार)

कोरफडचे विविध प्रकारचे वापर आहेत, पण सर्वांत महत्त्वाचे ते त्वचा आणि आतड्या येथील फायद्यांसाठी वापरले जाते.

कोरफडमधून दोन प्रमुख वस्तू प्राप्त होतात:

 • जेल: एक स्पष्ट आणि गंधरहित पदार्थ आहे, जे पानाच्या आतील भागामधून मिळते.
 • लॅटेक्स किंवा रस: पानाच्या बाहेरील भागामधून मिळणारे पिवळे पदार्थ.

लॅटेक्स लॅक्सेटिव्ह म्हणून वापरले जाते (पोट साफ करण्यासाठी), म्हणून नियमित उपयोगाचा सल्ला दिला जाऊ शकत नाही, पण अधिक वारंवार जेल वापरले जाऊ शकते आणि पानाच्या या भागाचे त्वचा आणि आरोग्याला अधिकतर फायदे आहेत.

पानामध्ये छिद्र पाडून जेल थेट रोपातून मिळवता येते. तथापी, पानाचे कच्चे लॅटेक्स किंवा रोपाचे संपूर्ण पान वापरणें सल्लेशीर नाही, कारण ते शरिराला संभवपणें हानीकारक ठरू शकते.

कोरफड जेल आणि रस बझारात पॅश्चराइझ्ड स्वरूपात मिळते (तुम्ही बझारात पॅश्चराइझ्ड जेल शोधत असल्यास, शब्द “फ्लॅश पॅश्चराइझ्ड” शोधून काढणें हितकर आहे, कारण या प्रकारचे पॅश्चराइझेशन जेलला त्याचे औषधीय फायद्यांवर प्रभाव न होता स्टर्लाइझ करते)

जेल आणि रसाच्या थेट वापराखेरीज, त्याने पेय आणि सौंदर्य उद्योगामध्येही जागा मिळवली आहे. वाणिज्यिक उद्योग त्याला दूध, चहा, क्रीम, कंफेक्शनरी, पावडर (आइसक्रीम, ताक आणि  लस्सी), फेस वाश, लोशन आणि इतर त्वचा उत्पादांच्या रूपात वापरले आहे. एलोवेराच्या सॉफ्ट जेल कॅप्स्यूल बझारात उपयोग आणि इतर वापरांसाठी उपलब्ध आहे.

तुम्हाला माहीत आहे का की कोरफड खूप उत्तम वायुशोधक आहे? नासाद्वारे केलेल्या संशोधनानुसार, ते असे एक रोप आहे, जे हवा स्वच्छ ठेवण्यास आणि आजूबाजूला अधिक प्राणवायु पुरवण्यास साहाय्य करते.

एलोवेराचे रोप घरी वाढवणें

कोरफड एक हार्डी रोप आहे (जे कडक हवामानावर जगू शकते) आणि बाहेर व आत अधिक काळजी न देता दोन्ही ठिकाणी वाढते (आतील रोपांची वाढ बाहेरच्या रोपांपेक्षा हळू असते), कारण त्याला योग्य ड्रेनेज दिले जाते. ते १२-२७ डिग्री सेंटीग्रेड तापमान परिधीमधून ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल क्षेत्रांमध्ये वाढते.

तुम्ही थंड क्षेत्रात राहत असल्यास, त्याला दिवसा सूर्याखाली ठेवणें आणि संध्याकाळी घरी आणणें सर्वोत्तम आहे.

कोरफड लीफ कटिंग्झ किंवा ऑफशूट यांद्वारे वाढवले जाऊ शकते (छोटी रोपे मूळ रोपापासून स्वतः वाढतात). तथापी, बागवान सुचवतात की त्याला लीफ कटिंग म्हणून ऑफशूटमधून वाढवणें बेहतर असते, कारण लीफ कटिंग वापरणें आणि वाढवणें थोडे अवघड असते.

रोप लावणें :

 • हे तपासण्यासाठी की मुळा कुठे होत्या ऑफशूटच्या मुळापासून थोड्या प्रमाणात माती साफ करणें.
 • स्वच्छ चाकूने, छोटे रोप मुख्य रोपापासून वेगळे करणें, ज्याने निश्चित होईल की त्यात मुळा आहेत.
 • हे नवीन रोप नवीन मडक्यात सुसज्ज मातीत लावणें.

एलो रोपासाठी ड्रेनेज खूप महत्त्वाचे आहे आणि ते वाढवण्यास आणि राखण्यास सोपे असले तरी, योग्य ड्रेनेज नसल्याने रोप मरू शकते.

एलोवेरा जेल घरी कसे बनवावे?

सर्वोत्तम भाग म्हणजे, कोरफड घरी अधिक कठिण न जाता बनवता येते. तुमचे स्वतःचे एलो जेल प्राप्त करण्यासाठी, एलो रोपामधून एक पान कापा आणि त्याला शेवटी एक  कापलेल्या टोकासह ठेवा. पान त्याचे पिवळे तरळ पदार्थ सोडणें सुरू करेल. ड्रेनिंग बंद झाल्यानंतर पान स्वच्छ करा. चाकूने पानात एक कापा बनवा आणी बाहेरील त्वचा सोलून काढा. एकदा हे थर साफ केल्याने, तिथे एक स्पष्ट पारदर्शक जेल उरेल. तुम्ही त्याला थेट वापरू शकता किंवा भविष्यकाळासाठी फ्रीझरमध्ये साठवून ठेवू शकता. हे जेल आठवड्यापर्यंत फ्रीझरमध्ये उरते.

अधिक सहप्रभावांशिवाय टॉपिकलरीत्या एलो जेल लावल्याने (रोपाला प्राकृतिकरीत्या अलर्जिक असलेले लोक सोडून). त्वचेच्या क्रीम, लोशन, पेय इ. ची मात्रा उत्पादामध्ये उपस्थित एलोवेराच्या प्रमाणावर अवलंबून राहील. आदर्शरीत्या, रिकामेपोटी एक आउंस किंवा दो चहाचे चमचे एलो जूस घेणें सुरक्षित समजले जाते. म्हणून, आहार किंवा त्वचेच्या काळजीच्या नियमामध्ये एलो वेरा जोडण्यापूर्वी, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला घेणें योग्य असेल.

 • एलो लॅटेक्स  नियमित वापरल्याने पोटाच्या समस्या झाल्याचे दिसून आले आहे.
 • काहीलोक एलो वेरासाठी अतिरिक्त संवेदनशील असून तुमच्या डॉक्टराकडे कोणत्याही रूपात एलो वेरा घेणें चांगले असेल.
 • एलो जेल १२ वर्षांखालील मुलांना तोंडावाटे दिले जाऊ नये, कारण त्याने पोटदुखी आणि अतिसार होऊ शकते.
 • गरोदर महिलांसाठी ते सुरक्षित समजले जात नाही, कारण त्याने मिस्कॅरिएज आणि जन्मदोषांचे खूप कमी घटना आलेल्या आहेत.
 • खुल्या ऊनात बाहेर जाण्यापूर्वी एलो वेरा लावल्याने सनबर्न होऊ शकते.
 • तुम्हाला आधीच औषधे विहित केलेली असल्यास, आहारात एलो वेरा जोडण्यापूर्वी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला घ्या, कारण ते औषधाच्या सहप्रभावांवर हस्तक्षेप करू शकते.
Medicine NamePack SizePrice (Rs.)
Himalaya Anti Dandruff ShampooHIMALAYA ANTI DANDRUFF SHAMPOO220.5
Planet Ayurveda Aloe VitalsPlanet Ayurveda Aloe Vitals1215.0
Baidyanath KumariasavaBaidyanath Kumariasava Liquid133.0
Himalaya Diaper Rash CreamHIMALAYA BABY DIAPER RASH CREAM 20GM57.6
Himalaya Aloe & Cucumber Refreshing Body LotionHimalaya Aloe & Cucumber Refreshing Body Lotion 135.0
Himalaya Clarina Anti-Acne KitHimalaya Clarina Anti Acne Kit229.5
Himalaya Deep Cleansing Apricot Face WashHimalaya Deep Cleansing Apricot Face Wash117.0
Himalaya Dryness Defense Protein ShampooHimalaya Dryness Defense Protein Shampoo207.0
Himalaya Extra Moisturizing Baby SoapHIMALAYA NOURISHING BABY SOAP 75GM36.0
Himalaya Clarina Face WashHIMALAYA HERBAL LEMON OIL CLEAR FACEWASH (L)108.0
Himalaya Gentle Baby WipesHIMALAYA GENTLE BABY WIPES 24S71.1
Himalaya Gentle Daily Care Protein ConditionerHIMALAYA GENTLE DAILY CARE PROTEIN SHAMPOO 700ML360.0
Baidyanath PanchasavaBaidyanath Panchasava Syrup103.5
Patanjali Activated Carbon Facial FoamPatanjali Activated Carbon Facial Foam54.0
Patanjali Aloe VeraPatanjali Aloe Vera Juice Plain180.0
Patanjali Aloe Vera Kanti SoapPATANJALI ALOEVERA KANTI BODY CLEANSER SOAP 150GM25.2
Patanjali Aloe Vera Moisturizing CreamPatanjali Aloevera Moisturizing Cream67.5
Patanjali Beauty CreamPatanjali Beauty Cream63.0
Patanjali Crack Heal CreamPatanjali Crack Heal Cream54.0
Patanjali Boro Safe CreamPatanjali Borosafe Antiseptic Cream40.5
Patanjali Orange Aloevera Face WashPatanjali Orange Aloevera Face Wash40.5
Patanjali Aloe Vera GelPatanjali Aloe Vera Gel72.0
Patanjali Hair ConditionerPatanjali Protein Hair Conditioner 100g54.0
Patanjali Herbal Shaving CreamPatanjali Herbal Shaving Cream49.5
Patanjali Kesh KantiPATANJALI KESH KANTI ALOEVERA HAIR CLEANSER SHAMPOO 450ML153.0
Patanjali Body LotionPatanjali Saundarya Body Lotion 90.0
Patanjali Saundarya Face WashPatanjali Saundraya Orange Peel, Neem, Tulsi and Aloe Vera Face Wash 100g81.0
Planet Ayurveda Radiant Skin Hair Nails FormulaPlanet Ayurveda Radiant Skin Hair Nails Formula1215.0
और पढ़ें ...

References

 1. Amar Surjushe, Resham Vasani, and D G Saple. ALOE VERA: A SHORT REVIEW. Indian J Dermatol. 2008; 53(4): 163–166. PMID: 19882025
 2. Kulveer Singh Ahlawat and Bhupender Singh Khatkar. Processing, food applications and safety of aloe vera products: a review. J Food Sci Technol. 2011 Oct; 48(5): 525–533. PMID: 23572784
 3. Visuthikosol V et al. Effect of aloe vera gel to healing of burn wound a clinical and histologic study.. J Med Assoc Thai. 1995 Aug;78(8):403-9. PMID: 7561562
 4. Vinay K. Gupta, Seema Malhotra. Pharmacological attribute of Aloe vera: Revalidation through experimental and clinical studies. Ayu. 2012 Apr-Jun; 33(2): 193–196. PMID: 23559789
 5. Langmead L1, Makins RJ, Rampton DS. Anti-inflammatory effects of aloe vera gel in human colorectal mucosa in vitro. Aliment Pharmacol Ther. 2004 Mar 1;19(5):521-7. PMID: 14987320
 6. Soyun Cho et al. Dietary Aloe Vera Supplementation Improves Facial Wrinkles and Elasticity and It Increases the Type I Procollagen Gene Expression in Human Skin in vivo. Ann Dermatol. 2009 Feb; 21(1): 6–11. PMID: 20548848
 7. Fatemeh Nejatzadeh-Barandozi. Antibacterial activities and antioxidant capacity of Aloe vera. Org Med Chem Lett. 2013; 3: 5. PMID: 23870710
 8. Rajendra Kumar Gupta et al. Preliminary Antiplaque Efficacy of Aloe Vera Mouthwash on 4 Day Plaque Re-Growth Model: Randomized Control Trial. Ethiop J Health Sci. 2014 Apr; 24(2): 139–144. PMID: 24795515
 9. G Sujatha, G Senthil Kumar, J Muruganandan, T Srinivasa Prasad. Aloe Vera in Dentistry. J Clin Diagn Res. 2014 Oct; 8(10): ZI01–ZI02. PMID: 25478478
 10. Neda Babaee, Ebrahim Zabihi, Saman Mohseni, Ali Akbar Moghadamnia. Evaluation of the therapeutic effects of Aloe vera gel on minor recurrent aphthous stomatitis. Dent Res J (Isfahan). 2012 Jul-Aug; 9(4): 381–385. PMID: 23162576
 11. Yongchaiyudha S1, Rungpitarangsi V, Bunyapraphatsara N, Chokechaijaroenporn O. Antidiabetic activity of Aloe vera L. juice. I. Clinical trial in new cases of diabetes mellitus.. Phytomedicine. 1996 Nov;3(3):241-3. PMID: 23195077
 12. Ghannam N, Kingston M, Al-Meshaal IA, Tariq M, Parman NS, Woodhouse N. The antidiabetic activity of aloes: preliminary clinical and experimental observations.. Horm Res. 1986;24(4):288-94. PMID: 3096865
 13. El-Shemy HA1, Aboul-Soud MA, Nassr-Allah AA, Aboul-Enein KM, Kabash A, Yagi A. Antitumor properties and modulation of antioxidant enzymes' activity by Aloe vera leaf active principles isolated via supercritical carbon dioxide extraction. Curr Med Chem. 2010;17(2):129-38. PMID: 19941474
 14. Saini M1, Goyal PK, Chaudhary G. Anti-tumor activity of Aloe vera against DMBA/croton oil-induced skin papillomagenesis in Swiss albino mice.. J Environ Pathol Toxicol Oncol. 2010;29(2):127-35. PMID: 20932247
ऐप पर पढ़ें