myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

दालचिनी एक सुगंधी मसाला आहे, जो आज जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध आहे. दालचिनीचे कडक गंध आणि चव यामुळे ती गोड आणि आंबट दोन्ही प्रकारच्या पदार्थांसाठी अचूक पदार्थ ठरते. पण हा मसाला स्वयंपाकघराच्या कॅबिनेट्सपर्यंत मर्यादित नाही. आयुर्वेदिक आणि पारंपरिक चिनी औषधी (टीसीएम) दालचिनी तिच्या उपचारक लाभांसाठी खूप वेळ मौल्यवान ठरलेली आहे. पारंपरिक पाश्चात्य औषध प्रणालीसुद्धा या मसाल्याला खूप मानवते. हल्लीच्या शास्त्रीय अभ्यासांप्रमाणें, दालचिनीला लवंगानंतर सर्वोत्तम एंटीऑक्सिडेंट मानले जाते. तुम्हाला जाणून आनंद होईल की या मसाल्याचे खूप लांबलचक आणि समृद्ध इतिहास आहे. दालचिनीचे सर्वांत पूर्वीचे वापर जवळपास 2000-2500 ईसापूर्व मधील आढळले आहे. दालचिनीला यहूदी बायबलमध्ये अभिषेकाचे पदार्थ म्हणून नमूद करण्यात आले आणि तिला इजिप्शिअन लोकांनी ममीकरण पद्धतींमध्ये देखील वापरले आहे. रोममध्ये, दालचिनीला अंत्यसंस्काराच्या दरम्यान मृत शरिरांच्या दुर्गंधीला दूर ठेवण्यास वापरले जाई. वास्तविक पाहता, या मसाल्याचे महत्त्व रोममध्ये एवढे होते की केवळ समृद्ध लोक ते वापरू शकत होते.

तुम्हाला माहीत होते का?

काही इतिहासतज्ञांनुसार, वास्को डि गामा आणि क्रिस्टोफर कोलंबस यांनी मसाले आणि वनस्पती विशेष करून दालचिनीच्या शोधामध्ये आपला प्रवास सुरू केला. हे सत्य आहे की, दालचिनी श्रीलंकेतील स्थानिक मसाला असून पोर्तुगिझांनी त्याचा शोध लावला आणि आजच्या दिवशीही ती खूप महाग राहिलेली आहे. हेच नव्हे, तर ती जगभर स्वयंपाकनीस आणि बेकर यांच्या सर्वांत आवडत्या मसाल्यांपैकी एक आहे. दालचिनी दालचिनीच्या झाडाच्या आतील देठामधून मिळते. ती एक सदाबहार झाड (खूपवेळ टिकणारे) असून मुख्यत्त्वे जगाच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये आढळते. दालचिनीचे झाड 18मी. उंचीपर्यंत वाढू शकते, पण पिकवलेल्या प्रजाती 2-3 मी. च्या आसपास असतात. त्याचे विभिन्न चामड्यासारखी पाने असतात आणि त्यांची समांतर वेंस दोन्ही टोकांवर जोडतात ( तेजपत्त्यासारखे) . दालचिनीची फुले सुंदर पिवळ्या समूहांसारख्या वाढतात आणि दालचिनीचे फळ एक बॅरी असते, जी पिकल्यावर काळी पडते.

दालचिनीबद्दल काही मूलभूत तथ्य:

 • जीवशास्त्रीय नांव: सिनामोमम वेरम/ सिनामोमम झायलॅनिकम
 • कुटुंब: लॉरेसे
 • सामान्य नावे: सिनॅमॉम, दालचिनी
 • संस्कृत नांवदारुसिता
 • वापरले जाणारे भाग:  साल
 • स्थानिक क्षेत्र आणि भौगोलिक वितरण: दालचिनी दक्षिण आशिया खंडातील स्थानिक पदार्थ आहे, पण तिला जगाच्या अधिकतम उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये आढळते. वास्तविक दालचिनी श्रीलंका, मालागासी गणराज्य आणि सेशल्स बेटातून प्राप्त केली जाते. भारतामध्ये तिचे उत्पादन केरळ येथे होते.
 • तासीर: गरम करणारी. वात आणि कफ दोष शांत करते, तर पित्त दोषाला वाढवते. 
 1. दालचिनीचे प्रकार - Types of Cinnamon in Marathi
 2. दालचिनीचे आरोग्य फायदे - Health benefits of Cinnamon in Marathi
 3. दालचिनी कशी वापरावी - How to use cinnamon in Marathi
 4. दालचिनीची सुरक्षित मात्रा - Safe dosage of cinnamon in Marathi
 5. दालचिनीचे सहप्रभाव - Cinnamon side effects in Marathi

दालचिनीचे प्रकार: दालचिनीच्या खूप प्रकारच्या प्रजाती असतात, पण सर्वांत सामान्य अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत: सिलॉन सिनॅमॉन: ज्याला ट्रू सिनॅमॉन असेही म्हटले जाते. ती सर्वाधिक श्रीलंकेमध्ये पिकते आणि खूप महाग आहे. तिचा सुगंध गोड आणि हलका असतो. सिलॉन सिनॅमॉन एकामेकावर एक पोकळ नळीच्या रूपात एकामेकावर गुंडाळलेल्या पातळ कागदाच्या परतींसारखी दिसते आणि तिचे रंग खूप हलके असते. कॅशिआ सिनॅमॉन: उत्पत्तीचे स्थान असल्यामुळे तिला चायनीझ सिनॅमॉन असेही म्हणतात. ते दालचिनीचे सर्वांत सामान्य असे प्रकार आहे. कॅशिआ सिनॅमॉन रंगामध्ये गडद तपकिरी असते आणि तिचा गंध कडक आणि मसालेदार चव असते. या प्रकाराच्या दालचिनीच्या काड्या एकल जाड चादर बनवून एक किंवा दोन्ही बाजूंनी पसरतात. तिचे क्युमॅरिन घटक सिलॉन सिनॅमॉनपेक्षा अधिक असते आणि अधिक प्रमाणामध्ये यकृतासाठी विषारी असते.

दालचिनी पारंपरिक चिनी औषधे, पश्चिमी पारंपरिक वनस्पती आणि आयुर्वेदामधील सर्वांत महत्त्वपूर्ण मसाल्यांपैकी एक आहे. पण आधुनिक वैद्यकशास्त्र तिची आरोग्य बांधणी आणि उपचाराच्या फायद्यांच्या शोधामध्ये खूप मागे आहे. चला पाहू या की आपण या रहस्यमय मसाल्याबद्दल काय जाणतो.

 • पोटाच्या समस्यांपासून आराम देते: दालचिनी अधिकतम पोटाच्या समस्यांना सोडवण्यात मदत करते. तिला पोटफुगी, बद्धकोष्ठता आणी मळमळ यामध्ये आराम मिळण्यासाठी वापरले जाते. दालचिनी पोटातील अल्सर टाळणे आणि भूक सुधारणे यामध्येही खूप उपयोगी आहे.
 • मधुमेहरोधी: दालचिनीमध्ये प्रचुर मात्रेत सक्रिय यौगिके असतात, ज्यांना खूप वैद्यकीय अभ्यासांनी इंसुलिन संवेदनशीलता वाढवून रक्तशर्करा स्तर नियंत्रणात ठेवण्याचे सिद्ध केले आहे.
 • वजन कमी होण्यास वाव मिळते: हे वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहे की दालचिनीमधील सिनॅमलहाइड शरिरात वसा जळण्यास वाव देतो आणि वजन कमी होण्यास मदत करतो. दालचिनी अधिक भूक लागणें आणि अनावश्यक खाणेंही कमी करते .
 • हृदयासाठी चांगले: दालचिनी कॉलेस्टरॉल स्तर कमी करते आणि रक्तनलिकांमधील थक्के जमणें टाळून हृदयरोगाचा धोका कमी करते.
 • मासिक समस्यांपासून आराम देते: वैद्यकीय अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे की दालचिनी घेतल्याने न केवळ मासिक पेटके आणि वेदना कमी करते, पण मासिक धर्माच्या दरम्यान मळमळ टाळण्यातही उपयोगी आहे.
 • पुरळ कमी करते: दालचिनी एक नैसर्गिक दाहशामक आणि एंटीऑक्सिडेंट आहे. फेस मास्कबरोबर मिसळल्याने, ती पुरळ वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करते आणि पुरळमधील जखमही टाळते.
 • मौखिक आरोग्य सुधारते: लवंगाबरोबर दालचिनी तेल पारंपरिक रीत्या दाताचे दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी वापरले जाते. अभ्यास सुचवतात की दालचिनी जिंजिव्हायटिस लक्षणे टाळण्यास आणि कमी करण्यास तेवढेच प्रभावीपणें मदत करतात, जेवढे की व्यावसायिक औषधे.
 1. पोटातील गडबडीसाठी दालचिनी - Cinnamon for stomach upset in Marathi

पोटातील गडबडीसाठी दालचिनी - Cinnamon for stomach upset in Marathi

दालचिनी कोणत्या प्रकारच्या गॅस्ट्रिक समस्येसाठी महत्त्वपूर्ण उपाय मानली जाते, पण पोटाचे आरोग्य आणि कल्याण यासाठी त्याच्या वापराचे मोठे इतिहास आहे. पारंपरिक पश्चिमी वनस्पतीशास्त्र दालचिनीला कार्मिनेटिव्ह आणि स्टॉमकिक म्हणून संबोधित करते. कार्निमेटिव्ह अशी वनस्पती असते, जी पोटफुगी हाताळण्यास मदत करते, तर स्टॉमॅकिक सहजरीत्या जेवण पचवून भूक सुधारते. तसेच, दालचिनीमधील कॅटेचिन मळमळ या स्थितीत उपयोगी असतात. मळमळीच्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी, दालचिनीला सर्वांत सामान्यपणें चहामध्ये वापरले जाते. दालचिनीला नॅच्युरोपॅथी मध्ये लॅक्सेटिव्ह ( बद्धकोष्ठतेतून आराम देणारे) म्हणून वापरले जाते. आयुर्वेदामध्ये दालचिनीला स्टॉमक क्रॅंप्स, अतिसार आणि कॉलायटिसच्या उपचारासाठी वापरले जाते. प्रयोगशाळा अभ्यास डायस्पेप्सिआ (अपचन) च्या उपचारामध्ये दालचिनीच्या कार्यक्षमतेचे सुचवतात. पुढील अभ्यासांचा दावा आहे की दालचिनी असलेला ताक सर्वांत सामान्य अल्सरचे कारणीभूत जिवाणूंच्या हाताळण्यामध्ये उपयोगी आहे, ज्याला हॅलिकॅबायटर पायोरी म्हणतात. तरीसुद्धा, या मसाल्याच्या सर्व पारंपरिक वापरांची पुष्टी करण्यासाठी अजून संशोधनाची गरज असल्यामुळे, तुम्ही डॉक्टरांशी बोललेले सर्वोत्तम असेल.

दालचिनी काड्यांच्या रूपात सर्वांत सामान्यपनें वापरली जाते आणि तिला सिनॅमॉन क्विल्स असे व्यावसायिकरीत्या म्हटले जाते. सिनॅमॉन क्विल्स दालचिनीच्या झाडाच्या आतील सालीचे तुकडे असतात, ज्यांना एकामेकावर गुंडाळून घेऊन एक पोकळ नळी बनवण्यात येते. या पोकळ नळीच्या मग सुकलेल्या दालचिनीच्या बारीक तुकड्यांनी भरले जाते. दालचिनी सालीच्या खूप लहान तुकड्यांना “क्विलिंग” म्हणून वेगवेगळे असे विकले जाते. दालचिनीचे चिप्स, पूड आणि दालचिनीच्या सालीचे तेलसुद्धा बाजारात उपलब्ध आहे.

सुगंधी द्रव्य म्हणून गोड पदार्थ आणि कॅंफेक्शनरीमध्ये व्यापकरीत्या वापरले जाते. मला खात्री आहे की तुम्ही प्रसिद्ध “सिनॅमॉन रोल्स”ला अवश्य चाखले असेल, जी युरोप आणि अमेरिकेमधील एक स्थानिक खाद्यपदार्थ आहे, पण तिला जगाच्या सर्व भागांमध्ये वापरले जाते. इतिहासकारांच्या मते, युरोपच्या काही भागांमध्ये तणावशामक म्हणून वापरले जाते. दालचिनीची गोड गंध सुगंधी बनवण्यासाठी सौंदर्यवर्धक उद्योगामध्ये अजूनही वापरले जाते. दालचिनीच्या एसेंशिअल तेलाचे वापर खूप सामान्य आहे.

तरीही, तुम्हाला तुमच्या स्वतःचे उपाय वापरायचे असल्यास, दालचिनी इंफ्युझ्ड ऑयल, कंप्रेस ( स्थानिक पदार्थ) , टिंक्चर ( मदिरेतील सार) किंवा चहाच्या रूपात (सामान्यपणें दालचिनी पूडाबरोबर) वापरले जाऊ शकते. तरीही, तुम्हाला माहीत नाही की कोणत्या स्वयंपाकघराच्या पेटीमध्ये दालचिनी असेल? तुम्ही अजूनही दालचिनीची काडी पाहिलेली नसल्यास, तुम्ही तिच्या विशिष्ट  ख्रिसमससारख्या सुगंधीला लांबून ओळखू शकता. वास्तविक जनाधारित सर्वेक्षणाचा दावा आहे की दालचिनी अधिकतम हिवाळ्याबरोबर आणि नाताळाच्या मोसमाशी संबद्ध आहे. आणि का नाही. ते ख्रिसमस केक्स, कुकीझ आणि ख्रिसमस ट्री सजावटींमध्ये वापरले जाणारे एक प्राथमिक गोड पदार्थ आहे.

दालचिनी चहाचे एक स्वादिष्ट कप बनवण्याची एक सहज पद्धती आहे:

 • केतलीमध्ये पाणी गरम करा.
 • उकळत्या पाण्यामध्ये एक दालचिनीची काडी टाका आणि अंदाजे 15-20 मिनिटे हळू-हळू तापू द्या.
 • बर्नर बंद करा आणि दालचिनीला 15 मिनिटे भिजू द्या.
 • छाननी करा आणि प्या.

आदर्शरीत्या, एक काडी सिलॉन सिनॅमॉनने 1-2 कप चहा बनते.

आदर्शरीत्या, ½-1 चहाचा चमचा दालचिनी ठराविक काळावधीसाठी घेतले जाऊ शकते, पण अधिक सहप्रभाव होत नाहीत. दालचिनीमध्ये क्युमॅरिन असते, जे यकृतासाठी विषारी असू शकते, म्हणून माफक घेणें आवश्यक आहे. तुमच्या शरिराच्या प्रकारासाठी दालचिनीची आदर्श मात्रा सुनिश्चित करण्यासाठी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेणें सर्वोत्तम असते.

 1. दालचिनीचे एक नैसर्गिक ऊष्मादायक प्रभाव असते, म्हणून आवश्यक मात्रेपेक्षा अधिक दालचिनी घेतल्याने पोटात खाज होऊ शकते.
 2. दालचिनीमध्ये क्युमॅरिन नावाचे एक घटक असते, जे अधिक असल्याने यकृताला क्षती होऊ शकते.
 3. काही लोकांना दालचिनीची आंतरिक अलर्जी असते. अभ्यास दाखवतात की दालचिनीमधील सिनॅमॅल्डिहाइड अलर्जीकारक ( अलर्जीचे कारणीभूत घटक) आहे आणि त्यामुळे संवेदनशील लोकांच्या तोंडातील चट्टे  बरे होतात.
 4. दालचिनी एक नैसर्गिक हायपोग्लॅसिमिक पदार्थ (रक्तशर्करा कमी करणारे) आहे, म्हणून तुम्हाला मधुमेह असल्यास आणि तुम्ही मधुमेहरोधी औषधे घेत असल्यास, तुमच्या आहारात दालचिनी घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना विचारणें योग्य राहील.
 5. दालचिनी एक नैसर्गिक रक्त पातळ करणारे पदार्थ आहे, म्हणून तुमच्यावर शस्त्रक्रिया झालेली असल्यास किंवा काही दिवसांनी करवून घेणार असल्यास, काही वेळेसाठी दालचिनी न घेणेंचे योग्य राहील.
 6. पातळ नसलेले दालचिनी तेल त्वचेमध्ये खाज आणणारे असे समजले जाते. म्हणून तुम्ही संपूर्ण शरिरावर हे तेल लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
और पढ़ें ...