केस गळणे - Hair Loss in Marathi

केस गळणे काय आहे?

केसांचे गळणे ही एक अशी स्थिती आहे ज्यात व्यक्तीच्या टाळूवरून केस कमी व्हायला लागतात (किंवा संपूर्ण शरीरावरुन देखील कमी व्हायला लागतात). रोज दिवसात 100 केसांचे गळणे सामान्य आहे कारण त्यांच्या जागी नवीन वाढणारी केसं येत असतात. पण समस्या तिथे उद्भवते जेव्हा गळणाऱ्या केसांचे प्रमाण नवीन येणाऱ्या केसांच्या प्रमाणात जास्त असते. हे जास्त करून  पुरुषांमध्ये बघायला मिळते. जेव्हा केसांचे गळणे अत्याधिक होते, तेव्हा यामुळे टक्कल सुद्धा पडू शकते.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

केसांचे गळणे हे सामान्यतः एक लक्षण आहे जो काही अंतर्भूत रोगांचे प्रतिनिधित्व करतो. केसांचे गळणे याची काही इतर लक्षणे आहेत, ज्यामध्ये:

 • वेगवेगळ्या प्रकारांमध्ये केस गळू शकतात
  • पुरुष किंवा महिला - टक्कल पडण्याचे आकार.
  • टाळूवर संपूर्ण टक्कल पडण्याचे डाग.
  • वेगवेगळ्या आकारात टक्कल पडणे.
  • संपूर्ण शरीरातून केस गळणे.
 • टाळूचे स्केलिंग आणि कोरडेपणा.
 • खाजणारे टाळू.
 • केसांचा कोरडेपणा आणि केसांच्या टोकाचे विभाजन (स्प्लिट एन्ड).

याची मुख्य कारणं काय आहेत?

केसांचे गळणे अगदी सामान्य आहे काही आणि त्याच्याशी अनेक कारणं संबंधित आहेत.काही सामान्य कारणे अशी असू शकतात:

 • आनुवंशिक - कुटुंबाचा केस गळतीचा मजबूत इतिहास केस गळतीची शक्यता वाढवू शकते.
 • हार्मोनल बदल (पुरुषांमध्ये अधिक सामान्य) यामुळे  पुरुषांमध्ये केस गळतीचे प्रकार कानाशेजारी आणि कपाळावर वेगवेगळ्या आकारात बघायला मिळतात.
 • टाळूचा संसर्ग जसे की फंगल संसर्ग.
 • लॅट्रोजेनिक (प्रेरित औषध) - सामान्यतः केमोथेरपी एजंट्स, अँटी-डिप्रेसिव्ह औषधे, इत्यादी सोबत बघायला मिळतात.
 • रेडिएशन थेरेपी.
 • ताण - भावनिक ताण केसांच्या गळतीचे मुख्य कारण आहे.
 • पौष्टिक कमतरता - व्हिटॅमिन ई, जस्त, सेलेनियम इत्यादिंच्या कमतरते मुळे केस गळती होऊ शकते.
 • केसांचा उपचार - केसांच्या रंगांचा, केस सरळ करणाऱ्या एजंट्सचा आणि इतर रासायनिक उपचारांचा नियमित वापर केस गळातीची शक्यता वाढवते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

सामान्यपणे, संपूर्ण वैद्यकीय इतिहास आणि वैद्यकीय तपासणी केसांच्या गळतीचे निदान निश्चितपणे करू शकते. तरी, काही तपासण्या केस गळतीचे कारण माहीत करून घेण्याकरिता मदत करतात आणि थेरपीचे प्रकार जे उपचार करण्यासाठी किंवा परिस्थितीला व्यवस्थापित करण्यात मदत करु शकतात. या तपासणीत हे समाविष्ट आहे:

 • रक्त तपासणी जसे व्हिटॅमिन आणि खनिजे यांची रक्तातील पातळी व त्यांची कमतरता तपासण्यासाठी.
 • पूल टेस्ट आणि लाईट मायक्रोस्कोपी- केसांना सौम्यपणे ओढल्याने त्यांची तानासंबंधीची शक्ती आणि टाळूसोबत किती प्रमाणात जोडलेला आहे हे माहित होते आणि सूक्ष्मदर्शिका चाचणी केसांची घनते सोबत केसाच्या दंडाची रचना तपासण्यासाठी मदत करते.
 • स्कॅल्प (टाळूचे) बायोप्सी - हे संसर्गा चे कारण माहितीकरून घेण्यास मदत करते.

केसांच्या गळतीचे उपचार कारक घटकांवर पूर्णपणे अवलंबून असतो. विशिष्ट परिस्थितींमध्ये, उपचार साध्य करता येत नाही परंतु सहायक उपचारांचा वापर केला जाऊ शकतो. केसांच्या गळातीच्या उपचार पद्धतींमध्ये समाविष्ट आहे:

 • औषधे - पूरक पदार्थ जसे, जस्ता, सेलेनियम, व्हिटॅमिन ई इत्यादी मल्टीव्हिटॅमिन गोळ्या समाविष्ट आहेत. मिनॉक्सिडिल, फिन्स्टरराइड, हार्मोन रिप्लेसमेंट औषधे इ.
 • लेसर थेरपी - टाळूला लेसर किरणांसमोर ठेवल्याने केसांची घनता वाढू शकते.
 • प्रत्यारोपण शस्त्रक्रिया - घनदाट केसं असलेला त्वचेत तुकडा काढला जातो आणि ज्या भागात केस गळती झाली आहे तिथे प्रत्यारोपीत केला जातो.
 • केस विणणे (हेयर विविंग).
ऐप पर पढ़ें